पुण्यात होणारा भुरभुर पाऊस मला खुप आवडतो ☺अगदी नाजुकतेने पावसाच्या लहरी आसमंतातुन जमिनीवर आच्छादल्या जातात.आजुबाजुचा परिसर काही क्षणात साॅफ्ट टोन फिल्म मधे टर्न होतो 😍😍सगळं धुसर अन धुंद दिसायला लागतं.नजर फिरवाल तिकडे डोंगरांवरची हिरवी मखमल मनाला सुखावत राहते.ना प्रखर प्रकाश ना पावसाळी ढगांचा काळोख एक वेगळाच करडा-पांढरा रंग सगळीकडे भरून उरलेला असतो 😊वारा शांत होऊन कुठल्यातरी कोप-यात पहुडलेला असतो पण हवाहवासा गारवा मात्र अंगावर क्वचित शहारा उठवतो.चुकुन एखादा पक्षी हवेत तरंगत जातांना दिसतो.संथ लयीत पडणा-या पावसामुळे रस्त्यावरून पाण्याचे ओघळ वहायला लागतात.खिडकीच्या काचेवर असंख्य जलबिंदू जमा होतात आणि त्यातून बाहेरचं जग एकदम जादुई भासायला लागतं 😊😊