कॅप्टन तानिया शेरगिल या पहिल्या महिला आहेत ज्यांनी Army Parade Day च्या कार्यक्रमामधे all men contingent चं नेतृत्व केलं आणि नवा इतिहास रचला 👏👏
यासोबतच अतिशय महत्वपूर्ण अशा प्रजासत्ताक दिनाच्या पूर्ण परेडचं नेतृत्व देखील त्या करणार आहेत 👩✈️
She will serve as The Parade Adjutant on the occasion of Republic day 26th January 2020
ही बातमी वाचली आणि ऊर अभिमानाने भरून आला 😊 😊
प्रजासत्ताक दिनी त्या सर्व परेडचं नेतृत्व करुन फक्त स्वतःचं एकटीचं किंवा त्यांच्या कुटुंबाचं नाही तर कदाचित माझ्यासारख्या अगणित मुलींचं स्वप्नं जणू पूर्ण करणार आहेत आणि पुढच्या पिढीतल्या असंख्य तानिया किंवा प्रियंकासारख्या मुलींना त्या वाटेवर चालायला प्रेरीत करणार आहेत.
तुम्ही त्यांचे व्हिडिओ क्लिप्स बघा आर्मी-डे परेडचे whatta grace in her actions, passion in her eyes marvelous 👌🙌🙌
स्वातंत्र्यदिन आणि प्रजासत्ताक दिनाच्या परेडचं मला लहानपणापासून प्रचंड आकर्षण!
त्यामुळे शाळेत असतांना MCC मधे सहभागी झाले आणि कॅप्टन होऊन या दोन्ही दिवशी माझ्या ट्रूपचं नेतृत्व दरवर्षी केलं.
स.भु.शिक्षण संस्थेच्या मोठ्ठ्या ग्राऊंडवर परेडची प्रॅक्टिस करतांना जणू काही दिल्ली परेडची प्रॅक्टिस करत आहे असं मला सतत वाटत राहायचं 😊 प्रचंड मजा यायची आणि आपण खूप जबाबदारी असणारी भूमिका निभावत आहोत याचा प्रत्यय पावलागणिक यायचा.
पुढे ११वीत गेल्यावर मी NCC मधे नाव नोंदवलं. खरं तर माझं science होतं पण तरीही NCC च्या शिस्तीमुळे सगळे लेक्चर्स, प्रॅक्टिकल्स करुन सुद्धा परेडसाठीचा सराव आणि इतरही अनेक गोष्ट सहज साध्य करता आल्या.
१२वी मधे गेल्यावर एके दिवशी आम्हांला दोन 'सिनियर्स' भेटायला आल्या. भारताचा झेंडा असलेलं लाल रंगाचं ब्लेझर घालून आल्या होत्या. त्या दोघीजणी नुकत्याच झालेल्या प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी NCC च्या मुलींच्या ट्रूपमधे होत्या!!
त्या क्षणी माझ्यासाठी त्या दोघीही सेलिब्रेटीजपेक्षा कमी नव्हत्या 😊 😊
त्यांच्याकडून आम्हांला प्रजासत्ताक दिनाच्या दिमाखदार सोहळ्याचं वर्णन तर ऐकायला मिळालंच पण परेड ची तयारी कोणत्या काठिण्यपातळीवरची असते याचं शब्दशः चित्र समोर उभं राहिलं. जणू काही आर्मी-ट्रेनिंगचं!
त्या क्षणापासून आमच्या ट्रूपमधल्या प्रत्येक मुलीचं एकच ध्येय होतं - rigourous practise. जेणेकरून प्रजासत्ताक दिनाच्या परेडसाठी निवडल्या जाणाऱ्या संघामधे सहभागी होता यावं!!
पण..
मला मात्र ते स्वप्न अर्धवटच सोडून काही वेगळे निर्णय घ्यावे लागले..दुर्दैवाने NCCशी असलेली नाळही तुटली 😔😔
खंत वाटते क्वचित कधीतरी ..माझं पहिलं-वहिलं स्वप्नं मी असं निर्दयीपणे संपवायला नको होतं 😓