Saturday, November 28, 2015

धुकंच धुकं :) :) :)

आज कोथरुडमधे सूर्योबाचं पहिलं किरण ८.४५मिनीटाने दिसलं तरी पण धुक्याचं वलय आहेच :) काय वर्णावी आजची सकाळ..अहाहा धुकंच धुकं :) :) :) :) समोरची इमारत स्पष्टपणे दिसत नव्हती इतकं धुकं :) :) खिडकी उघडली तर घरामधे भरभर शिरून खोलीतसुद्धा धुकं :D :D :D सवयीप्रमाणे मी टेकडीवर जायला निघाले तर बाहेरही दाट धुक्याची चादर होती.जणू ढग उतरून जमिनीवर अंथरले आहेत असंच वाटत होतं.त्या ढगांधून वाट काढत काढत टेकडीवर पोहोचले, तिथे तर पांढ-याशुभ्र ढगांची गर्दीच झालेली दिसली :D :D :D धुकं जरी दाट होतं तरी अगदी उबदार वाटत होतं,थंडीचा मागमूसही नाही :) :) :) जवळपास तासाभराने थोडी हवा जाणवायला लागली आणि धुक्याचे पुंजके जरा विरळ व्हायला लागले.मग हळूहळू पूर्व दिशेला गोल-गरगरीत अगदी भाकरीसारखा पांढराशुभ्र एक गोळा दिसायला लागला तो सूर्योबा होता :D :D :D :D बिचारा अगदीच केविलवाणा वाटत होता, ढगांच्या दुलईने त्याचं तेज जणू शोषून टाकलं होतं.. आत्ता जवळजवळ दोन तासाने सूर्योबा आपला तेजोमय अंगरखा घालून अवतरला आहे :) :) :) खरंच फार वेगळा आणि सुखद अनुभव होता आजच्या उबदार ढगांच्या सहवासाचा :) :) :)

Wednesday, November 25, 2015

संस्कार

काल माझ्या सोसायटी मधे राहणारी दोन शाळकरी मुलं आली होती. त्यांच्या शाळेमधे रेनवाॅटर हार्वेस्टिंग चा प्रोजेक्ट करणार आहेत त्याकरता त्यांना पैसे गोळा करायला सांगितलं आहे. ती मुलं कुपन्स घेऊन आली होती आणि जेंव्हा लकी-ड्राॅ होईल तेंव्हा तुम्हाला कदाचित बक्षिस लागू शकतं. मी ते कुपन्स घेतले आणि मला माझ्या लहानपणीच्या काही गोष्टी आठवल्या :) :) :)

आमच्या शाळेमधे आम्हांला असंच एक काम दिलं जायचं.प्रत्येकाला एक कागद देऊन सांगितलं जायचं की एक आठवडाभर तुम्ही शेजारी-पाजारी राहणा-या काका,काकूंना मदत करायची आणि कामाच्या स्वरूपानुसार त्यासाठी १रू.,२रू किंवा ५रू. घ्यायचे.

इयत्ता ४ किंवा ५वी मधे असतांना बहुतेक हे केलं असावं मी. आजकालच्या शाळांमधे असे उपक्रम होतात की नाही मला माहित नाही.

पैसे मिळावे ह्याकरता दुस-यांना मदत करावी ह्याहीपेक्षा दुस-यांना मदत करण्यात खूप छान वाटतं ही भावना त्या वयात रूजली गेली.:) :)

असाच एक अजून महत्त्वपूर्ण संस्कार शाळेने आमच्यावर केला - आर.डी.

इयत्ता ५वी पासून ते १०वी पर्यंत दर महिन्याला एक ठराविक रक्कम पोस्टात ठेवायची.आमच्या शाळेमधेच एक बाई हे काम करायच्या.खूप साधी गोष्ट होती ही, पण प्रत्येकाने बचत केलीच पाहिजे हा संस्कार तेंव्हा मनावर बिंबवला गेला :) :) :)

अशा छोट्या-छोट्या गोष्टीतून शाळकरी वयात जे काही शिकवलं गेलं ते आज फार महत्त्वाचं ठरतंय.:) :) :)


Monday, November 23, 2015

एल.आय.सी.

आज पुण्यात कोसळणा-या पावसाने रस्त्यांना नद्यांचं रूप दिलंय. अशा पावसामधे सुखात घरी बसून वाफाळेल्या काॅफीचा सुगंध अनुभवण्याच्या ऐवजी मी हिंजेवाडी मधून निघून थेट स्वारगेटला पोहोचले वेळ अर्थातच दोन तास लागला आणि त्यामुळे एक गम्मत झाली.

एल.आय.सी. हाऊसिंग फायनान्स आॅफिसमधे मला एक चेक जमा करायचा होता पण उशीर झाला. थोडा नाही तर तब्बल एक तास उशीर झाला. मुसळधार पाऊस कोसळतच होता पण त्यातून वाट काढत एकदाची आत पोहोचले. रिसेप्शन काऊंटरला पोहोचले तेंव्हा नखशिखांत भिजलेली होते.

तिथे एक मॅडम बसल्या होत्या May I Help You? असा गोंडस सवाल करणारा बोर्ड घेउन. मी त्यांना माझा चेक दाखवणार तितक्यात त्यांनी नजरही वर न-करता मला सांगितलं काउंटर बंद झाला आहे मी चेक घेणार नाही. मी त्यांना विनंती केली पण त्यांनी तोंड फुगवून परत तेच वाक्य माझ्यावर फेकलं!!

मी त्यांना सगळी परिस्थिती सांगितली की मी कित्त्ती दुरूssन आले होते तेही अशा पावसात पण अंहं बाई एकदम ढिम्म!!

मग माझा सौजन्यपूर्ण आवाज चढला आणि पुढच्या काऊंटर कडे वळून इथे मुख्य साहेब कोण म्हणून विचारलं तर त्यांनी मला विचारलं की काय काम आहे. मग मी चेक दाखवून 'जमा करून घेता का प्लीज' असं विनवलं. त्यांनी एका दुस-या मॅडमला विचारलं आणि मला सोपा पर्याय दिला. पाचएक मिनिटात माझं काम झालं पण :)

पण तितक्यात एका माणसाचा आवाज आला तोही माझ्यासारखा एक लाचार कस्टमर होता एल.आय.सी. चा आणि त्यालाही असंच 'वेळ संपली.उद्या या' उत्तर तोंडावर मारलं गेलं होतं. त्याने आवाज चढवल्यावर मगासच्याच मॅडम ज्यांनी मला मदत केली त्यांनी त्यालाही मदत केली.

एल.आय.सी. च्या आॅफिसमधे मला कायम असाच विचित्र अनुभव आला आहे आजवर!! कायम तुच्छतेने बोलणारे लोक, काहिही मदत मागितली तरी को-या चेह-याने आणि निर्लज्जपणे छापील उत्तरं तोंडावर मारणार.म्हणजे समोरचा माणूस मूर्ख आहे आणि त्याला मदत न-करणं हेच त्यांचं तिथल्या खुर्चीवर बसून करायचं एकमेव काम आहे!!

त्यामुळेच आज माझं काम झालं तेंव्हा मी ठरवलं आणि ब्रँच मॅनेजरला भेटायला गेले.त्या माणसाला मी फक्त इतकंच सांगायला गेले होते की समोरच्या माणसाचं निदान आधी ऐकून घ्या आणि मग तुमचे नियम सांगा ना, तर तो माणूस लगेच आवाज चढवून ओरडायलाच लागला. मग लक्षात आलं की ह्या माणसाशी बोलण्यात अजिब्बातच अर्थ नाही!!

ह्या लोकांना फीडबॅक चा अर्थच नाही समजत काय करणार,असो,शेवटी मी तिथून बाहेर पडले मला मदत केलेल्या मॅडमना मोठ्ठं थँक्यू म्हणून :)

अशा प्रसंगांमुळे सरकारी आणि खाजगी संस्थाकडून मिळणा-या सेवेबाबतचा फरक परत एकदा तीव्रतेने जाणवला :(


Saturday, November 21, 2015

फॅन

ब-याच दिवसांनी शनिवारची सकाळ अनुभवायला मिळाली.

टेकडीवर जाऊन बसले पण सूर्योबाचं आगमन झालं नव्हतं. रोजच्या मानाने आज जरा उशीर होतोय असं वाटलं.आकाशात ढग दिसत होते अजूनही पण थंडीच्या मोसमाची बोचरी हवा नव्हती.सगळं वातावरण अगदी शांत, स्तब्ध..भवतालचा निसर्ग एका मंद लयीत श्वास घेत होता.

पाच-एक मिनिटात पूर्वेकडेची करडी छटा जरा उजळल्यासारखी झाली आणि दाट ढगांच्या दुलयीआडून एक छोटुसा किरण बाहेर आला :) :) मग पांघरून थोडंसं बाजूला करून गुलाबी-लालसर गोळा वरती डोकावला..पण आज दुलईतून बाहेर येण्याची इच्छा दिसत नव्हती सूर्योबांची मग काय परत ढगाआड लपून बसले :D :D पण दुस-याच क्षणी जणू जादू झाली आणि ढगांचं आवरण पूर्णतः बाजूला होऊन लख्ख प्रकाश सर्वत्र पसरला..बहुतेक सूर्योबाच्या आईने फॅन बंद केला होता ;) :D :D