Thursday, December 31, 2020

२०२० : एक सिंहावलोकन

 

२०२० साल हे सगळ्यांसाठीच चिवित्र गेलं पण माझ्यासाठी तर अगदीच roller coaster ride होती!
म्हणजे बघा १ जानेवारी २०२०ला मी बेरोजगार झाले होते, सगळं जग नवीन वर्षाचं स्वागत करत असतांना मी मात्र 'आता पुढे काय'? ह्या विचारांच्या गोंधळात २०२०मधे पाऊल ठेवलं!!
जानेवरी मधे युके मधे कोणीही लवकर जागं होत नाही त्यात भरीतभर ब्रेक्झिट झालेलं त्यामुळे नोकरीचं मार्केट सुस्तचं होतं. होता होता फेब्रुवारी पण संपला पण काहीच चिन्ह दिसेनात!
नव-याने मदत केली आणि थोडी शिल्लक जमा होती म्हणून घराचे हफ्ते आणि बाकी खर्च निभावले पण नोकरी नसल्यामुळे जबरदस्त डिप्रेशन आणि फ्रस्ट्रेशन यायला लागलं! अभ्यास, नोकरीसाठी तयारी, घरातील कामं, काही काही करावंसं वाटेना 😢
फक्त आला दिवस कोणीतरी नोकरीसाठी काॅल करेल याच विचारात जायला लागला.
मार्च उगवला पण एकही काॅल आला नाही, आता तर मी दिवसेंदिवस फक्त रडण्यात घालवायला सुरूवात केली 😭 घरी परत जाऊन नोकरी शोधावी हा विचार जोर धरायला लागला पण नव-याला एकटं सोडून जावंसंही वाटेना!
बरं माझ्या ओळखीतल्या जितक्या म्हणून मुली/बायका होत्या त्या सगळ्यांना नविन वर्षात पटापटा नोक-या मिळाल्या त्यामुळे आपल्यालाही आज न उद्या नोकरी मिळेलच असा पिटुकला आशेचा काजवा मनात चमकत होताच 😐
पण! हा पण काही पिच्छा सोडेचना!!
ओळखीतल्या होत्या नव्हत्या त्या सगळ्यांना रेझुमे पाठवला, नुसतंच बसून नको राहायला म्हणून माझ्या टेक्नॉलॉजी मधल्या परिक्षा देत सुटले पण कसला उपयोग होईल तर शप्पथ!!😖😖
आता बास, घरीच जायचं आणि नोकरी शोधायची हा विचार पक्का करतच होते की एका कंपनीतून काॅल आला, पहिला इंटरव्ह्यू झाला-चांगला झाला, दुसरा झाला तोही पास झाले आणि आता तिसरा इंटरव्ह्यू चा काॅल येईलच म्हणेतो एक आठवडा गेला- २ गेले- एक महिना गेला पण 😤😤
आणि एके दिवशी जादूची कांडी फिरवल्यासारखं झालं आणि तिसरा इंटरव्ह्यू होऊन मला नोकरीची आॅफर एकदाची मिळाली 💃💃
नोकरी दुसर-या गावात होती म्हणून तिकडे रहायला जागा शोधायला सुरूवात केली, तीनच दिवस झाले जेमतेम आणि कोरोनाने आॅफिसमधे शिरकाव केला आणि 'वर्क फ्राॅम होम' चा फतवा काढला गेला.
मी एकदम खुश झाले😄 आयुष्यात पहिली नोकरी लागल्यापासून असणारं स्वप्न, 'घरुन काम करायला मिळावं', हे आता पूर्ण होतांना दिसायला लागलं 😜
एक महिना मस्त गेला, घरुन काम करायचं, ट्रेनचा प्रवास नाही की पहाटे लवकर उठणं नाही 😄
पण घरात बसून काम करणं तेही धड डेस्क नसतांना हे काही सोपं नाही 🤪
अचानक मला पाठदुखीचा त्रास सुरु झाला, थोडे व्यायाम प्रकार करुन बघितले पण विशेष फरक वाटेना. पाठदुखी वर उपाय शोधेतो muscle pain चालू झालं. रोज वेगळ्या ठिकाणी दुखायला लागलं. एक-दोन आठवडे हा त्रास कसा घालवावा याचा विचार करतो न करतो तोच migrain चा जबरदस्त त्रास चालू झाला! डोकं इतकं प्रचंड दुखायचं की मला काही म्हणजे काही सुचायचं नाही! भिंतीवर डोकं आपटायची इच्छा व्हायची नाहीतर दोन्ही हातांनी घट्ट धरून ठेवावसं वाटायचं पण किमान दोन तास ते कमाल २४तासा पर्यंत डोकंदुखीची मजल गेली 😖😖😖
बरं डाॅक्टर कडे जावं म्हणाल तर कोरोनाचा लाॅकडाऊन चालू झालेला. शेवटी पेनकिलरचा आधार घेत घेत कसंबसं दोन-तीन महिने असह्य त्रास सहन करत करत अचानकच एक दिवस डोकं दुखणं बंद झालं!! 😌
आज नुसता विचार केला तरी अंगावर काटा येतो इतका भयानक त्रास त्या दिवसांमधे झाला 😡
देव करो अन कोणाला हा आजार नको व्हायला!!🙏
आजवर मी इतक्या पेनकिलर्स कधी घेतल्या नसतील जितक्या त्या दोन-तीन महिन्यांमधे घ्याव्या लागल्या मला 😢 😭
आजारपणातून बाहेर पडत पडत आळशीपणाने मला जकडलं! 😱
आॅफिसचं आणि घरातलं काम करुन इतका कंटाळा यायला लागला की व्यायामाला मी दूर ढकलायला सुरूवात केली! अगदीच बंद करुन टाकला व्यायाम असं नाही झालं, पण सातत्य राहिलं नाही आणि तोंडावरचा ताबा पण सुटला!
या सगळ्याचा व्हायचा तो परिणाम झालाच शेवटी! मी गुटगुटीत दिसायला लागले 😜
तशात दिवाळी महिन्यावर येऊन ठेपली आणि आम्हांला घरी जायचे वेध लागले पण हाय रे कोरोना! अगदी ऐन वेळेवर युके मधे दुसरा लाॅकडाऊन लागला आणि दिवाळी सुद्धा आम्ही युकेतच साजरी केली!
दिवाळीच्या फराळावर ताव मारल्यावर मात्र मी आळस झटकून अगदी शिस्तबद्ध पद्धतीने व्यायाम-आहार-झोप यांचं गणित बांधलं आणि महिन्याभरात दोन किलो वजन उतरवलं 😘 😘
तर आज ३१डिसेंबर च्या दिवशी मी स्वतःला, स्वतःकडून शाबासकी देत छान छान पदार्थ खाऊन हा आनंद साजरा करणार आहे 😊 😊
अर्थात अजून वजन पूर्णपणे आटोक्यात आलेलं नाहीए त्यामुळे उद्यापासून परत सगळं रेजिम सुरु!
या मग मस्त गरमागरम क्रिस्पी पोहा पॅटीस खायला 😍
आणि हो Happy New Year
#31st2020celebration
#मुक्कामपोस्टUK