Saturday, March 20, 2021

खळ्ळखट्याक

  अरे थांब 😳
थांब थांब थांssssss😵😵😵😵
म्हणेपर्यंत
तो सोनेरी नक्षी असलेला, सुबक ठेंगणा कप ☕
माझ्या हातातून जो सुटला तो गिरक्या घेत, कोलांटउड्या मारत काही क्षणात जमिनीवर जाऊन
खळ्ळकन फुटला!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!😖😖😖😖😖😖
बिच्चारा!!!😕
हा कितवा कप माझ्या हातातून निसटून फुटला याची गणतीच नाही 😢😰
काचेचं कोणतंही भांडं असू देत, चहाचा कप, बशी, प्लेट्स्, ग्लासेस, बरणी काय वाट्टेल ते! त्याला एकदा का माझ्या हाताचा स्पर्श झाला की त्याचे दिवस भरत आलेच म्हणून समजा 😜
ती भांडी मी धुवायला घेतली की पहिल्या किंवा दुस-या वेळेसच आणि अगदीच एखादं भांडं दणकट आणि नशिबवान निघालं तर तिसऱ्या खेपेपर्यंत कसं-बसं टिकतं पण त्यानंतर? 🤫
अंहं!! त्याचा अंत ठरलेलाच म्हणून समजा 😁 😝😝
माझ्या नव-याने २०१६ला युकेला आल्यावर काही काचेच्या वस्तू घेतल्या होत्या, घरी येतांना त्या सगळ्या एका मित्राकडे ठेवल्या आणि २०१८ला परत आल्यावर घेतल्या. पहिला दिवसच अपवाद असेल(कारण त्यादिवशी भांडी घासायचं काम पडलं नाही) दुस-या दिवशी मी त्यातला एक ग्लास फोडूनच शुभारंभ केला 😄 😄 😄
म्हणजे बघा, भारतात घरात काम करायला येणाऱ्या मावशींना आपण, 'काचेची भांडी जरा जपून स्वच्छ करा', अशी विनंतीवजा धमकी देतो पण माझ्या बाबतीत माझ्या घरी येणाऱ्या मावशी किंवा इथे आता नवरा बजावतो 😜
माझं आणि काचेच्या भांड्यांचं काय शडाष्टक आहे कोणास ठाऊक, माझ्या घरात तर आमची खडाजंगी सुरु असतेच पण इतरांच्या घरी गेल्यावरही माझा हा गुण काही लपत नाही🙄
आतापावेतो मी ओळखीतल्या एका भाभींच्या आवडीच्या, वर्षानुवर्षे जपलेल्या डिनर सेटला नजर लावली आणि एका मैत्रिणीच्या घरी पण खळ्ळखट्याक करून ठेवलं 🙈🙈
पुलंनी जसे विविध 'ग्रहयोग' शोधून काढले तसाच काहिसा 'काचेची भांडी फोडणे' योग माझ्या पत्रिकेत आहे की काय, अशी आता माझी खात्रीच पटायला लागली आहे!
तुमच्यापैकी कोणाच्या पत्रिकेत आहे का हो असा काही चिवित्र ग्रहयोग 😳🤔
#चिवित्र_ग्रहयोग_या_सदरांतून