Thursday, July 25, 2019

#मुक्कामपोस्टUK - कौतुक

सध्या यूरोपमधे सूर्योबा प्रचंड आग ओकत आहे. रोजचं तापमान बघितलं तर मनात विचार येतो '२१°/२२°/३०°/३२°' ह्याला 'बापरेss कित्ती वाढली आहे उष्णता' 😳 असं म्हणायला खुळेच आहेत हे लोक असं वाटतं 😜 आपल्या तिकडे ४२ तर अगदी नेहमीचं झालंय ना 😒 पण जिथे वर्षातल्या १२ महिन्यांपैकी बहुतेक महिने थंडी असते किंवा पाऊस पडतोच अशा वातावरणात वाढलेल्या आणि राहणाऱ्या लोकांना खरंच त्रासदायक आहे. आणि म्हणूनच ट्रेनस्टेशनला आणि ट्रेन मधे पण पाण्याच्या बाटल्या वाटत आहेत कर्मचारी,हो फुकटच वाटत आहेत. तसंच ब-याच स्टेशन्सला 'प्रवासात पाणी सोबत असू द्या', आशयाच्या पाट्या पण लावलेल्या आहेत. खरंच किती कौतुकास्पद आहे ही कृती!! #मुक्कामपोस्टUK

Wednesday, July 24, 2019

#मुक्कामपोस्टUK - क्यूट आजी

आज्ज्या ह्या प्रचंड गोड असतात 😊 😊 माझी आजी तर अर्थात आहेच क्यूट 😘 वयोमानानुसार तिला हल्ली नीट बोलता येत नाही पण तिचे डोळे अजूनही हसतात आम्हांला भेटल्यावर, आमचा आवाज ऐकल्यावर..
हां तर मी हे सांगत होते की, आत्ता माझ्या शेजारच्या रांगेत एक अशीच क्यूट आजी बसलेली आहे. व्यवस्थित कापलेले सोनेरी केस, गोरा गोरा रंग, त्या रंगाला आणि वयाला साजेशी वेशभूषा, हातात सुरेख घड्याळ आणि एक छानशी पर्स. ट्रेन निघाल्यावर त्या आजीने पर्स उघडली आणि हळूच अगदी छोटूसा मोबाईल हातात धरला, बाहेर नाही काढला हं. पर्समधेच ठेवत शांतपणे एक एक अक्षर शोधून कोणाला तरी मेसेज केला आणि बंद करुन अगदी काळजीपूर्वक परत आत ठेऊन दिला. ती आजी मेसेज करतांना स्वतःशीच छान हसत होती 😊 😊 #मुक्कामपोस्टUK