Tuesday, November 19, 2019

#आठवणी_लहानपाणाच्या # ग्रिटींग कार्ड्स

यूके ला आल्यापासून बघितलेली साधारण कोणतीही गोष्ट असू देत त्याबद्दल सहजच एक विचार मनात येतो,'अरे! हे तर आपल्याकडे पण आहे अगदी असंच!' मग लक्षात येतं की त्यांच्याकडूनच आपल्या देशात जसंच्या तसं आलेलं आहे 😜 . पण आताशा काही गोष्टी आपल्या भोवतालातून लोप पावल्या आहेत ज्या इथे अजूनही तितक्याच सहजपणे दिसतात आणि वापरल्या जातात. मी इथे आल्यावर ज्या ज्या गावांमधे फिरले किंवा ट्रेनस्टेशनला गेले तिथे हमखास ग्रिटींग कार्ड्स ची दुकानं दिसली. अर्थपूर्ण भाषेतली, साध्या-सोप्या भाषेतली, एक ओळ किंवा अगदी दोनच शब्द लिहिलेली अगदी सुंदर, सुबक तर काही मिश्कील अशी असंख्य कार्ड्स सजवलेली दिसतात.
मी नुकतीच आले होते आणि ३१ मार्चला यूके मधे 'मदर्स डे' होता त्यानिमित्ताने कार्ड्सनी दुकानंच्या दुकानं सजलेली दिसली.प्रत्येक कार्ड हातात घेऊन वाचावंसं वाटत होतं मला तर.
हे सगळं बघतांना नकळत लहानपणात शिरले. मला सगळ्यात पहिले ग्रिटींग कार्ड्स कुठे दिसले असतील तर माझ्या मावशीच्या घरी.वेगवेगळ्या निमित्ताने तिला किंवा काकांना जी काही ग्रिटींग कार्ड्स मिळायची त्यातली सुंदर कार्ड्स मावशी एकाला एक स्टेपल करुन त्याची सुरेखशी माळ बनवायची आणि बेडरूमच्या एका कोप-यात लावायची. मला एक कार्ड अजूनही आठवतं, त्यामधे बर्फाळ प्रदेशातल्या एका घराचा परिसर होता. फार वेगळंच वाटायचं मला ते कार्ड 😀 त्यात असणारं कौलारू घर त्याभोवती पांढराशुभ्र बर्फ आणि त्यात एक काटेरी झाड पण.
इथे आल्यावर बर्फ प्रत्यक्ष बघायचा योग अजून तरी नाही आला पण कौलारू घरं आणि तसं काटेरी झाड पुष्कळदा बघायला मिळतं.
तर, पुढे शाळेत असतांना मैत्रिणींना ग्रिटींग कार्ड्स बनवून द्यायला सुरूवात केली. काही दिवसांनी आर्चिज आणि हाॅलमार्क ह्या दोन ग्रिटींग कार्ड्स स्पेशल गॅलरीजचा शोध लागला आणि जनू खजिन्याची गुहाच सापडली असं झालं मला 😊
त्या गॅलरीज मधे जायचं वेगवेगळी कार्ड्स चाळायची,क्वचित एखादं आवडलं की त्याच्या पाठी असलेल्या बारकोडवरती असणारी त्याची किंमत बघायची.
पुढे जर कधी प्रसंग आला तर आणि बजेट असेल तर मग असं खास बघून ठेवलेलं कार्ड विकत घ्यायचं आणि प्रयत्नपूर्वक अलंकारिक अक्षरात ज्याला द्यायचं त्याचं नाव आणि from लिहून त्याखाली फर्राटेदार सही ठोकायची 😄 😄 😄 कै च्या काही 😜
पुढे काॅलेज ला आल्यावर तर ग्रिटींग कार्ड्सची वेगळी कॅटेगरीच ओपन झाली..हो हो करेक्ट आहे तुमचा गेस ;) गर्लफ्रेंड, बाॅयफ्रेंड ला देण्याची कार्ड्स समोर ठळकपणे दिसायला लागली. त्या कार्ड्समधे असणारे टेडीज आणि बॅकग्राऊंडचे पेस्टल शेड्स मला प्रचंड आवडायचे 😍 😍 ब-याचदा काही कार्ड्सवर चमकी पण लावलेली असायची. मग अशी कार्ड्स हाताळली की आपोआप हात, गाल आणि क्वचित बॅग चमकायला लागायची 😜 .
गुडलक कॅफेच्या समोर एक मोठ्ठी आर्चिज गॅलरी आहे, तिकडे गेलं भटकायला की त्या दुकानात जाणं हा माझा नित्यनियम होता किंबहुना तिथे जायचं म्हणून कित्येकदा मी हाॅस्टेलपासून पायपीट करत तिकडे गेले आहे. तिथे जाण्याचं मुख्य कारण अर्थातच ग्रिटींग कार्ड्स चाळणं होतं आणि दुसरं म्हणजे तिथे आत गेलं की एसीचा सुखद आणि सुगंधित गारवा अंगावर झेलता यायचा. अगदी वेगळ्या विश्वात आल्यासारखं वाटायचं मला 😍 😍
पण माझ्या काॅलेजमधे किंवा ग्रुपमधे विशेष कार्ड्सी चलती नव्हती त्यामुळे कोणासाठीही किंवा अगदी खास कोणासाठी सुद्धा मी कार्ड्स विकत घेतले नाही.
पुढे आय.टी. विश्वात आले, आॅफिस चालू झालं आणि आॅफिसला 'राम-राम' ठोकणा-यांचे सेंड-आॅफ्स पण अनुभवले, तिथे परत एकदा कार्ड्सची भेट व्हायला लागली. तोवर तळहातावर मावणा-या कार्डचं वय वाढून अगदी ताड-माड वाढल्याचं दिसलं😄 चांगली हातभर लांब अशी कार्ड्स आणायची आणि त्यावर प्रत्येकाने जो/जी सोडून जात आहे त्याच्यासाठी दोन-चार ओळी लिहायच्या 😊 काही वर्षांनी मलाही मिळालं असं भलंमोठ्ठ कार्ड 😁 😁
त्यानंतर ब-याच कंपन्यांमधून उड्या मारत मी बाहेर पडले पण कार्ड्स चा चार्म तोवर उतरला होता.
यूके ला येण्याआधी माझ्या टीम मधल्या एकाचं लग्न होतं तेंव्हा मात्र मी आवर्जून छानसं एक कार्ड आणून त्या जोडप्याला दिलं,ब-याच वर्षांनी संधी मिळाली त्यामुळे दिल गार्डन गार्डन हो गया था 😊
यूकेच्या संस्कृती मधे समोरच्याचे आभार 'कित्ती मानू आणि किती नाही' असा भाव असतो लोकांचा, मग त्याकरता असं छानसं कार्ड देणं ही खचितच वाखाणण्यासारखी गोष्ट आहे असं वाटतं मला.
#खट्टामिठ्ठा #मुक्कामपोस्टUK

Sunday, October 27, 2019

स्वयंपाक ;)

माझा आणि स्वयंपाक करण्याचा संबंध तसा आत्ता आत्ता म्हणजे लग्नानंतर आला. सुरूवात अगदीच जुजबी म्हणजे वेगवेगळ्या भाज्या करण्यापासून केली. त्यानंतर भाताचे थोडेफार प्रकार मग पाव भाजी, मिसळ पर्यंत मजल मारली पण पोळी 😳 😳 😳
पोळी करणं म्हणजे अगदी १०/१२वीच्या परिक्षेपेक्षा पण अवघड काम वाटायचं मला 😢
Fast forward to 2019 in UK - मी pure vegitarian असल्यामुळे बाहेर खाण्याचे पर्याय अज्जिबातच नाही तेंव्हा निदान स्वतः साठी तरी कच्ची-पक्की का होईना पोळी लाटायला सुरुवात केली. आॅफिस चालू झालं तसा आमच्या दोघांचा रोजचा भाजी-पोळी डबा बनवणं चालू झालं त्यामुळे अगदी दोन्ही वेळेला पोळी बनविण्याची आणि एकूणच स्वयंपाक करायची सवय व्हायला लागली.
मग आला 'चैत्र पाडवा' आमच्या घरी 'पुरणा-वरणाचा' नैवेद्य!!
बरं आजवर सासूबाईंनी सगळा भार सांभाळलेला त्यामुळे माझ्यावर फक्त पु.पो. वर ताव मारायची जबाबदारी असायची 😜
पण आता यूके मधे कसं करु 😳 😳 😳 😳
आमच्या मातोश्रींना काॅल करुन परिस्थिती 'गंभीर' आहे ची कल्पना दिली आणि!! नेहमीप्रमाणे माझ्या आईने 'अगं सोप्प आहे, मी सांगते तसं कर होईल सगळं व्यवस्थित', असा शाॅल्लिड काॅन्फिडंस दिला मग काय बघायलाच नको, त्यानंतर तर मी एकदा काय दोनदा काय तीsssन वेळेस पुरणाची पोळी बनवली 😄 😄 😄 😄
कधीकाळी साधी पोळी सुध्दा धड न-बनवता येणारी मी इतकी तरबेज झाले की अगदी पु.पो. सुध्दा सहज बनवू शकले 😁 😁
मला वाटतं पु.पो. बनविणे म्हणजे एका अर्थाने स्वयंपाकामधे PhD मिळवण्यासारखं आहे!!
Fast forward to Pune दिवाळी २०१९ - लक्ष्मीपुजनासाठी आमच्याकडे अनारसे असतात नैवेद्याला, 'अ ना र से!!!!' 😳😞😞
अर्थातच मी आईकडे धाव घेतली! आईने याही वेळेस मला धीर दिला आणि एकदम सोप्पी पध्दत सांगितली, आणि महाराज 'अनारसे' झाले की हो तय्यारsssss 💃💃💃💃
आमची आई ग्रेट म्हणजे ग्रेट म्हणजे अशक्यच ग्रेट आहे स्वयंपाकाच्या बाबतीत 😘 😘 😘
आज तिच्यामुळे मी स्वयंपाकामधे डब्बल PhD होल्डर झाले 😄 😄 😄 😄 😄
बघा बघा फोटो बघा माझ्या गोंडस-खुसखुशीत अनारश्यांचा 😍 😍 😍