अहाहा किती सुरेख, नेत्रसुखद चित्र आहे नं..
बघितल्या क्षणी त्या चित्रातल्या मुलीसारखं सायकलवर स्वार होऊन हुंदडायची इच्छा झाली 😊
आल्हाददायक वा-याच्या झुळकांवर स्वार होऊन तरंगत लहरत पिसासारखं हलकं होऊन निरुद्देश भटकावंसं वाटलं..
उन्हाच्या स्वच्छ प्रकाशाने मेंदूला चिकटलेली जळमटं झाडून टाकावीशी वाटली..
निसर्गाच्या सानिध्यात स्वतःचं अस्तित्व जाणवूच नये इतपत स्वतःला विसरून जावंसं वाटलं..
Thursday, July 16, 2020
Monday, July 13, 2020
विटंबना
कोरोना झालेल्या रुग्णांची संख्या चिंताजनक आहेच पण ज्यांचा या रोगामुळे मृत्यू होतो, त्यांच्या देहाची जी विटंबना होत आहे 😞ही बाब जास्त धक्कादायक आहे!
फक्त भारतातच नाही तर जगभरात अशा मृतदेहांना हाॅस्पिटल ते स्मशानभूमी पर्यंतचा करावा लागणारा खडतर प्रवास विषन्न करणारा आहे.
म्हणजे कोरोनामुळे जिवंत असतांना ज्या यातना भोगल्या त्या तर आहेतच पण मेल्यावरही सुटका नाही अशी गत होऊन बसली आहे!!!
या सर्वाचा जाब नेमका कोणाला विचारणार सद्य परिस्थितीत हे सांगणं कठीण आहे पण,
निदान आपल्या हलगर्जीपणा मुळे इतरांना करोनाचा प्रादुर्भाव होणार नाही इतकी जबाबदारी तर आपण स्वतः घेउच शकतो!
बघा जमलं तर आचरणात आणा!
Subscribe to:
Posts (Atom)
