Wednesday, April 7, 2010

इहलोकातील 'स्वर्ग'

इहलोकातील 'स्वर्ग'

कोणालाही हेवा वाटेल अशा ठिकाणी मला सध्या राहायचं भाग्य लाभलं आहे...
आमच्या सदनिकेला एक डझन अर्थात १२ श्वानांचं पथक रक्षक म्हणून लाभलं आहे..हे पथक रक्षण करण्यासोबतच आम्हाला सदनिकेत येताना व जाताना escort करतं अगदी साग्रसंगीत पद्धतीने. तसच हे रक्षक आम्हा रहिवास्यानकरीता रोज रात्री मैफ़ल सजवतात निरनिराळ्या रागांची आणि जर चुकून कोणाला ह्या मैफ़लीत झोप लागलीच तर भल्या पहाटे आपल्या सुमधुर आवाजात उठवायचं महान कामही करतात जेणेकरुन आमची office ची दांडी वाचते ( पण जाग्रणामुळे office मधे वाट लागते.)

परीसर तर इतका रम्य आहे की, सतत अगदी २४ तास आमच्या कानावर संगिताचा वर्षाव सुरु असतो, जवळच असलेल्या highway च्या क्रुपेने!!

सदनिकेसमोरच एक सुंदर इमारत आहे ज्याकडे बघुन लहान मुलांना आहट, phoonk2 अशा गोष्टींचं भय अजिबात वाटणार नाही.

चला आता घरात जाउया,
घरामधली हवा इतकी खेळकर आहे की, ती एक क्षणही आमच्यासाठी थांबत नाही, नळ तर इतके सेवातत्पर आहेत की, एखादा नळ उघडलात तर बाकी सगळ्या नळातलं पाणी देखील ह्याच नळातून तुमचं स्वागत करायला धावत येतं!!

मी राहत असलेल्या घरातील सर्वचजण अतीशय निसर्गप्रेमी आहेत त्यामुळे विजबचत, ध्वनीप्रदुषण टाळणे, जीवनावश्यक वस्तूंचा काटेकोरपणे ( कंजूषपणे ) वापर करणे अशा सवयी सर्वांना आहेत.

विजबचतीसाठी आम्ही अगदी गरज असेल तेंव्हाच दिवे लावतो ( म्हणजे जर कोणी अंधारात धडपडलाच तरच दिवे लागतो.) water heater हा प्रत्येकी अर्धा बादली गरम पाण्यासाठीच वापरला जातो.ध्वनीप्रदुषण टाळण्यासाठी घरामध्ये संभाषण अतीशय कमी वेंळा केलं जातं आणि मोठ्यांदा हसणे, बोलणे इथे वर्ज्य आहे.

घरातल्या मुख्य व्यक्तिच्या मते प्रत्येकी १च जोडी चप्पल व २ किंवा फ़ार फ़ार तर ३ जोडी कपडे असावेत जेणेकरुन जागेचा व सामानाचा अपव्यय टळेल.

जीवनावश्यक गोष्टी उदाहरणार्थ मीठ; बाजारात जर कधी त्याची तंगी निर्माण झाली तर आपली पंचाईत नको व्हायला म्हणून ते वापरलच जात नाही आणि अगदी रोज आमच्याकडे देवाचा नैवेद्य ( मीठ नसलेलं ) जेवण वाढलं जातं...

तर अशा इहलोकीच्या स्वर्गात मी राहते...anybody would like to join??

हे सगळं वाचून तुम्हाला वाटेल की, मला वेड लागलय....पण, खरच जेंव्हा आपण अशा छान छान परीस्थितीत राहतो, मनाला मुरड घालून चालत राहतो तेव्हा कळते किंमत आईच्या हातच्या जेवणाची, घराची...

घर...जिथे रोज संध्याकाली हसतमुखाने स्वागत करायला आपलं कुटुंब वाट बघत असतं...जर कधी अडचण आलीच तर ढाल बनून संरक्षण करायला देखिल तेच पुढे येतं!!

खरच स्वत:चं घर, कुटुंब हाच इहलोकातील 'स्वर्ग' !!

IndiBlogger - The Indian Blogger Community



या ब्लॉग वरील लिखाण कॉ्पीराईट प्रोटेक्टेड आहे, कुठेही पब्लिश करण्यापूर्वी लेखिकेची परवानगी घेणे आवश्यक आहे.
Protected by Copyscape Online Plagiarism Check

Monday, November 16, 2009

कुठे तरी हे थांबायला हवं...

माझ्या आई, बाबांच्या लहानपणी जर कोणी बीडि ओढताना दिसलं तर मोठे लोक समजावून सांगत की ही सवय किती वाईट आहे ते!! ते जसे मोठे झाले तसं काहिंनी बीडि, सिगरेट ओढुन बघितली, त्यात त्यांना आनंद वाटला आणि त्यांची ती सवय बनली!

आताच्या काळात तर सर्रास धुम्रपान करतात लोकं, त्यात कॉलेज मधे जाणार्‍या मुलांचं आणि मुलींचं प्रमाण सगळ्यात जास्त आहे.. दुर्दैवाने शाळेतली मुलं सुद्धा त्याच वळणावर जात आहेत..

सिगरेट का ओढायची ह्याचं बहुतेकांना कारण पण माहीत नसेल..

कोणासाठी ती फॅशन आहे..कोणासाठी तो टाईमपास आहे.. कोणासाठी, ती सवय, डोक्याचा ताण कमी करायचं साधन आहे..मात्र जास्तीत जास्त लोकांची आज ती गरज बनलीए..

आधी उत्सुकता म्हणून सिगरेट ओढुन बघितली जाते आणि मग तिचं सवईत रुपांतर कधी होतं ते त्या व्यक्तीला पण कळत नाही..

सगळे जन कानी-कपाळी ओरडून सांगत असतात की smoking is injurious to health..पण काही फरक पडत नाही..उलट ती सवय असणार्याच्यां अश्या प्रतिक्रिया असतात की, एका दिवशी तर वरती जायचच आहे ना मग एक दिवस अजुन कमी झाला तर काय फरक पडणार आहे!!

मैत्रीण,आई,बायको किंव्हा सगळ्यात जवळच्या व्यक्तीने किती जरी सामजाउन सांगितलं तरी जास्तीत जास्त थोडे दिवस ह्या लोकांची सवय बंद होते पण कायमची नाही!!

आजकाल मुली सगळ्याच क्षेत्रात मुलांसोबत खांद्याला खांदा लाउन लढतायेत, मग स्मोकिंग
च्या फील्ड मधे कश्या काय मागे राहतील!! गेल्याच महिन्यात रीडर'स डाइजेस्ट मधे
भारतातलं मुलींचं स्मोकिंग चं प्रमाण वाढल्याचा वाचलं..

जे लोक स्मोक करतात त्यांना स्वत:ची काळजी नसतेच पण दुसर्‍याची पण नसते..passive smoking is dangerous than active smoking!!

गेल्यावर्षी 2 ऑक्टोबर ला एक नवा फतवा निघाला की, सार्वजनिक ठिकाणी जर धूम्रपान केलं तर दंड होईल..
पण आपल्या इथे प्रत्येक नियमाचे जसे 3-13 वाजतात तसंच ह्या पण नियमाचं झालं..
नियम निघाल्याच्या दुसर्‍याच दिवसापासून त्याला धाब्यावर बसवल गेलं..
पाट्या लावल्या गेल्या सगळ्या ऑफिसेस, माल्स, हॉटेल्स मधे पण त्यानेही धूम्रपान करणार्‍या व्यक्तींना कुठे रोख बसला नाही..

एक बाळबोध विचार असा येतो मनामधे की, सरकार तंबाखूच्या पदार्थांवर बंदी का नाही आणत..
त्याच्या विक्रीतून जितका पैसा मिळतो तो एका बाजूला खूप जास्त असेल पण तरुण, कर्तुत्ववान पिढीचं त्याच्यामुळे होणार नुकसान त्या बदल्यात किती तरी पटीने जास्त आहे!!

पण हे सगळं कुठेतरी थांबायलं हवं!!

ज्या व्यक्तिंना व्यसन आहे त्यांनी कुठेतरी हा विचार करायला हवा की, क्षणिक सुखाच्या आहारी जाउन पूर्ण आयुष्य वाया घालवण्यात काही अर्थ नाही, यापेक्षा स्वत:वर जर थोडा ताबा ठेवला तर कदाचीत अश्या व्यसनांपासून सहज मुक्तता मिळू शकते.

देव अश्या लोकांना नीट विचार करण्याची बुद्धि देवो इतकीच आशा आपण ठेउ शकतो.


या ब्लॉग वरील लिखाण कॉ्पीराईट प्रोटेक्टेड आहे, कुठेही पब्लिश करण्यापूर्वी लेखिकेची परवानगी घेणे आवश्यक आहे.
Protected by Copyscape Online Plagiarism Check