Saturday, June 27, 2020

कै च्या कैच

दोन आठवड्यापूर्वी सूर्याचं एक किरण दिसत नाही म्हणून केलेली माझी तक्रार सूर्यदेवाने इतकी मनावर घेतली की गेला आठवडाभर अगदी आग ओकायला सुरूवात केली 🤦 पार २९° से. पर्यंत पोहोचला पारा!

बरं बाहेर जाऊ शकत नाही आणि घरात इतकं उकडतं की शेवटी एक पिल्लूसा टेबल फॅन आणावा लागला! फॅन चालू केल्यावर मी सगळ्यात आधी काय केलं असेल तर त्याच्या समोर 'आssssssss' असा आवाज काढून बघितला 😜 पण आमच्या लहानपणीच्या सिन्नी फॅनसारखा ह्याने रिप्लाय नाही दिला 😟

मला अजून आठवतं आम्हाला सवय होती त्या टेबलफॅनला चालू करुन त्याच्यासमोर मोठ्ठा आ वासून आवाज काढायची आणि त्याची बटनं खटाखटा दाबून वेगवेगळ्या स्पीडमधे स्वतःचा चिवित्र आवाज ऐकायची 😂😂 कै च्या कैच 😁😁

Saturday, June 20, 2020

दैवदुर्विलास

भर उन्हाळ्यात दिवसेंदिवस सूर्याचं दर्शन होऊ नये हा केवढा दैवदुर्विलास 😞

सोळा तासांचा दिवस, सकाळी उठल्यावर बाहेर करडा रंग साचलेलं भकास वातावरण असतं आणि रात्री झोपायला जातानाही तेच 😒

ढगाळ वातावरणामुळे उकडायला लागलं म्हणून खिडकी उघडली की इतकी रोगट हवा आत येते की सर्दी-पडसं झालंच म्हणून समजा!

घराला खिडक्या पुष्कळ आहेत पण जिथे नजर जाईल तिथे फक्त 'करडा'च रंग भरलेला दिसतो. हिरवी झाडं सुध्दा पान न-हलवता स्तब्ध उभी असतात स्टॅच्यू करुन ठेवल्यासारखी! त्यांचं असं निर्विकार उभं राहणं उलट त्रासदायक वाटतं मला कधीकधी 😓

भरीतभर घरात बसून काम करावं लागतंय त्यामुळे तर उत्साह वाटावा म्हणून रोज काय कारण शोधयचं??

उग्गाच नाही ह्या देशामधे प्रत्येकी ४ माणसांपैकी १ डिप्रेशन मधे जगतो! मला तर वाटतं हे असलं घाणेरडं वातावरणच मुख्य कारण आहे, त्याखालोखाल बाकीच्या कारणांचा नंबर लागेल!!

उन्हाळा आहे ना मग सूर्याचं दर्शन व्हायलाच हवं इतकं साधं-सोपं-सरळ आहे नं, पण नाही!!
'टिप्पीकल ब्रिटिश वेदर' आहे गं बाई हे 😫😫