इहलोकातील 'स्वर्ग'
कोणालाही हेवा वाटेल अशा ठिकाणी मला सध्या राहायचं भाग्य लाभलं आहे...
आमच्या सदनिकेला एक डझन अर्थात १२ श्वानांचं पथक रक्षक म्हणून लाभलं आहे..हे पथक रक्षण करण्यासोबतच आम्हाला सदनिकेत येताना व जाताना escort करतं अगदी साग्रसंगीत पद्धतीने. तसच हे रक्षक आम्हा रहिवास्यानकरीता रोज रात्री मैफ़ल सजवतात निरनिराळ्या रागांची आणि जर चुकून कोणाला ह्या मैफ़लीत झोप लागलीच तर भल्या पहाटे आपल्या सुमधुर आवाजात उठवायचं महान कामही करतात जेणेकरुन आमची office ची दांडी वाचते ( पण जाग्रणामुळे office मधे वाट लागते.)
परीसर तर इतका रम्य आहे की, सतत अगदी २४ तास आमच्या कानावर संगिताचा वर्षाव सुरु असतो, जवळच असलेल्या highway च्या क्रुपेने!!
सदनिकेसमोरच एक सुंदर इमारत आहे ज्याकडे बघुन लहान मुलांना आहट, phoonk2 अशा गोष्टींचं भय अजिबात वाटणार नाही.
चला आता घरात जाउया,
घरामधली हवा इतकी खेळकर आहे की, ती एक क्षणही आमच्यासाठी थांबत नाही, नळ तर इतके सेवातत्पर आहेत की, एखादा नळ उघडलात तर बाकी सगळ्या नळातलं पाणी देखील ह्याच नळातून तुमचं स्वागत करायला धावत येतं!!
मी राहत असलेल्या घरातील सर्वचजण अतीशय निसर्गप्रेमी आहेत त्यामुळे विजबचत, ध्वनीप्रदुषण टाळणे, जीवनावश्यक वस्तूंचा काटेकोरपणे ( कंजूषपणे ) वापर करणे अशा सवयी सर्वांना आहेत.
विजबचतीसाठी आम्ही अगदी गरज असेल तेंव्हाच दिवे लावतो ( म्हणजे जर कोणी अंधारात धडपडलाच तरच दिवे लागतो.) water heater हा प्रत्येकी अर्धा बादली गरम पाण्यासाठीच वापरला जातो.ध्वनीप्रदुषण टाळण्यासाठी घरामध्ये संभाषण अतीशय कमी वेंळा केलं जातं आणि मोठ्यांदा हसणे, बोलणे इथे वर्ज्य आहे.
घरातल्या मुख्य व्यक्तिच्या मते प्रत्येकी १च जोडी चप्पल व २ किंवा फ़ार फ़ार तर ३ जोडी कपडे असावेत जेणेकरुन जागेचा व सामानाचा अपव्यय टळेल.
जीवनावश्यक गोष्टी उदाहरणार्थ मीठ; बाजारात जर कधी त्याची तंगी निर्माण झाली तर आपली पंचाईत नको व्हायला म्हणून ते वापरलच जात नाही आणि अगदी रोज आमच्याकडे देवाचा नैवेद्य ( मीठ नसलेलं ) जेवण वाढलं जातं...
तर अशा इहलोकीच्या स्वर्गात मी राहते...anybody would like to join??
हे सगळं वाचून तुम्हाला वाटेल की, मला वेड लागलय....पण, खरच जेंव्हा आपण अशा छान छान परीस्थितीत राहतो, मनाला मुरड घालून चालत राहतो तेव्हा कळते किंमत आईच्या हातच्या जेवणाची, घराची...
घर...जिथे रोज संध्याकाली हसतमुखाने स्वागत करायला आपलं कुटुंब वाट बघत असतं...जर कधी अडचण आलीच तर ढाल बनून संरक्षण करायला देखिल तेच पुढे येतं!!
खरच स्वत:चं घर, कुटुंब हाच इहलोकातील 'स्वर्ग' !!
या ब्लॉग वरील लिखाण कॉ्पीराईट प्रोटेक्टेड आहे, कुठेही पब्लिश करण्यापूर्वी लेखिकेची परवानगी घेणे आवश्यक आहे.

priyanka.. its too good yaar.. i cant stop laughing.. ekdum zakas jamalay vidamban... ;-)
ReplyDeleteekhadya kaslelya lekhakapekshahi chan jhalay ha lekh.. ekhi line boring nahiye.. its awesome..
Its too good yaar, "Tumhala tar Swarg Sukh laabhalay bhoowari!!!"
ReplyDeletePrachi kadun khup eklay gharabaddal, tuzya blog madhe "Ganapatiche Wahan or aapli rojchi garaj" that's right "MOUSE" missing ahe jyane tumhala pahate 2:30 AM to 4:00 AM paryant local traincha experience karun dila (like train pakadanyasathi chi dhavapal), ani what about "BAND DARAWAZA"?(sliding door)
Khup chhan lihilas agadi mazya manatala....
ReplyDeleteaga pan mouse baddal rahilach jyanni aaplyala LONG JUMP, HIGH JUMP ani RUNNING ch prashikshan dila agadi sakali 2:30 wajata ekhyadya tatpar COACH sarakh(CHAK DE India aathawala)....
Ani tya nantar cha shwanancha to RAAG BHAIRAVI aaahaaa!!!!!!
Shirshak ani shewat khup awadala!!!
A ajun ek asa blog!!!!
Ekdam Jahkaas...Marathivar Prabhutva changla aheee!!
ReplyDeleteWow, Felt like Reading Evry Blog Two Times...
Tu IT Madhye kaaay karte ahee please change to Sahitya...Change Change Change....Atleast IT can walk smoothly...:-)
Good One Keep It up...Rgds Praveen Prabhu
Hello Priyanka....
ReplyDeleteha..ha..Bhari Varnan kela aahes tuzya Gharabaddal....
Ekdum pu.la.chi aatvan zali vachtana...
tuza इहलोकीचा 'स्वर्ग' vachlyavar aamhi kiti sukhi aahot yachi janiv hote aahe....
Great Blog...Keep on Writing... V.Nice...
-Harshad Joshi
धन्यवाद धन्यवाद :)..mazi tulna agadi P.L. wagerenshi kelyabaddal..pan te jasa suchla tasa e-kagdawar utrawla aahe..
ReplyDelete"घर म्हणजे घर म्हणजे घर असतं
ReplyDeleteज्यांना घरी राहायला मिळतं त्यांचं किती बरं असतं
आपल्यासारख्यांचं काही खरं नसतं
आपल्या हाती शिळा पाव.. तर त्यांच्या ब्रेड वर रोज बटर असतं !!"
...
आशा करतो कि इतकी वाईट परिस्थिती नाही म्हणून.. असच सुचलं म्हणून लिहिलं आहे हे..
पण खरच खुप छान जमुन आलाय ब्लॉग.. मस्तच!!
हे उपहासात्मक लिहिणं म्हणजे पुण्यामधे ५ वर्षे राहण्याचा परिणाम वाटतं ;)
आता वाचकांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत.. असच लिहित राहा.