रविवारी दादरला ब्लॉगर्स मेळावा होता कांचन ताईने आयोजित केलेला, मी पहिल्यांदाच त्यात सहभागी होणार होते...तिथे गेले, कार्यक्रम अगदी छान, अनौपचारिक पध्दतीचा होता, १-२ आजोबा, २-४ काका भेटले.अगदी घरातलं एखादं कार्य आहे असच मला वाटत होतं, सरतेशेवटी महेंद्र काकांनी लकी ड्रा घोषित केला आणि त्यात चक्क माझं नाव आलं!?! मला तर एक क्षण कळालच नाही, तुम्हांला वाटेल काय वेडी मुलगी आहे इतकं काय गोंधळायचं, पण जेंव्हा अनपेक्षित पणे असा सुखद क्षण समोर येतो तेंव्हा मला असचं काहिसं होतं....त्यानंतर मी नामकाकांना भेटले, मला त्यांच्या ई-पुस्तकांबद्दल जाणून घ्यायचं होतं..काकांनी माझ्या ब्लॉग बद्दल चौकशी केली आणि अगदी दुस-याच दिवशी मी लिहीलेले जितके पण ब्लॉग्स होते त्यांबद्दल प्रतिक्रिया कळवली, मला खुप छान वाटलं पण नामकाका फक्त त्यावरच नाही थांबले तर त्यांनी माझा एक ब्लॉग एका ई-पुस्तकासाठी टाकायचं ठरवलं होतं आणि माझी परवानगी (खरं तर माझ्यासाठी पर्वणीच होती) मागितली होती, मी काय लगेच हो म्हणाले आणि अगदी अर्धा तासाच्या आत काकांनी मला एक मेल केलं ज्यात माझ्या ब्लॉग नंतर त्यांनी मंजिरीच्या कवितांबद्दल सांगितलं होतं....ते मेल वाचल्यावर मला तर काय करू नि काय नाही असं झालं....मी रविवारी ब्लॉगर्स मेळाव्याला गेले काय आणि आज माझा ब्लॉग ई-पुस्तकासोबत प्रसिद्ध होतो काय...अगदी स्वप्नागत वाटत होतं मला हे सगळं!!!
त्यानंतर मी अगदी भराभर माझ्या आई, बाबा, ताईला, मित्र-मैत्रिणींना ह्याबद्दल कळवलं...लगेच सगळ्यांचे अभिप्राय यायला सुरूवात झाली, कोणी मेलवरून सांगितलं तर कोणी फोन केले तर कोणी चॅट वरून पिंग केलं.....मी अगदी हवेत तरंगत होते काहि क्षण....पण नंतर अगदी जड जड वाटायला लागलं...लहानपणी शाळेत कोणत्याही स्पर्धेत बक्षिस मिळालं की घरी येउन आईला मिठी मारून सगळं सांगायची सवय होती मला ज्याची आज तिव्रतेने आठवण झाली आणि अगदी एकटं एकटं वाटायला लागलं...राहून राहून कोणितरी प्रत्यक्ष भेटून आपल्याशी बोलावं असं वाटायला लागलं......पण पर्याय नव्हता, मग स्वत:ला उठवलं आणि वपुंच्या पुस्तकांच्या कुशीत जाउन बसले!
या ब्लॉग वरील लिखाण कॉ्पीराईट प्रोटेक्टेड आहे, कुठेही पब्लिश करण्यापूर्वी लेखिकेची परवानगी घेणे आवश्यक आहे.
वा वा.. अभिनंदन !!
ReplyDeleteपहिल्यांदाच भेट देतोय ब्लॉगला, पुर्ण वाचून काढतो :) :)
अभिनंदन! आता स्वतःची साईट होणार, म्हणजे ब्लॉग च्या मागे असलेले ब्लॉगस्पॉट हे नाव निघून जाईल. नांव ठरवलं की नाही साईटचं?
ReplyDeleteकाही अडचण आली तर मला किंवा राजेला पिंग कर फेसबुक वर.
अभिनंदन!
ReplyDeleteधन्यवाद :-)
ReplyDelete