एशियाड मधून रात्रभर प्रवास केल्यावर एकदाचं पणजी दिसलं..अगदी कष्टाने डोळे उघडले आणि खिडकीबाहेर डोकावले तर अहाहा...काय सुंदर दृश्य दिसलं..रस्त्याच्या दोन्ही बाजूला हिरवीगार झाडं..मस्त काळाशार स्वच्छ रस्ता आणि टवटवीत रंगांच्या भिंती असलेली घरं...मी तर पाहताक्षणीच प्रेमात पडले गोव्याच्या..
पुण्याच्या गारठवणा-या थंडीच्या मानाने इथे असणारं आल्हाददायक वातावरण मनाला खूपच भावलं :) तिथे असणारे २६ की काय समुद्रकिनारे वगैरे सगळं आहेच छान पण सगळ्यात जास्त मला काय आवडलं तर तिथे असणारी शांतता आणि घरं..
निदान पणजीमधे तरी सकाळी १० पर्यंत अजिबात वर्दळ दिसली नाही म्हणून मी शांततेबद्दल नमूद केलं.
गोवा टुरिझमच्या बसमधून उत्तर-गोवा आणि दक्षिण-गोवा बघतांना घरांमधली विविधता पाहतांना खूप गम्मत वाटत होती.प्रत्येक घर निराळं..घराभोवती ४ झाडांची का होईना पण छोटीशी बाग आणि त्यामधे नारळाची झाडं तर असणारच असणार..घरांचे रंगही असे की शहरामधे तो रंग कोणी घराला लावायचा विचारही करणार नाही पण, त्या घरांना मात्र ते उठून दिसत होते..म्हणजे एखादी सावळी पण नाकी-डोळी निटस असणा-या मुलीला तुम्ही कोणत्याही रंगाची साडी नेसवा ती सुंदरच दिसेल तसं काहीसं...आणि ह्यासोबतच घराच्या अंगणामधे तुळशी-वृदांवन किंवा ख्रिस्ती लोकांचा क्रॉस..कौतुक ह्याचही वाटलं की छोटीशी बंगली जरी बांधलेली होती तरी तिचा आकार-उकार अगदी एखाद्या वास्तूरचनाकाराच्या रचनेतून आल्यासारखा..काही काही घरांवर कोंबडा लावलेला दिसला, त्याचं कारण म्हणजे पोर्तुगीज लोकांमधे असं मानलं जायचं की ज्याच्या घरावर कोंबडा तो अगदी सधन-श्रीमंत :)
दक्षिण-गोवा फिरतांना पोर्तुगीज कसे राहत असत ह्याचा नमूना म्हणून एका घराची सैर घडवली जाते,गोवा सरकारने संग्रहालय करून त्यातली जवळपास प्रत्येक गोष्ट जपली आहे.तिथे देण्यात येणा-या माहितीनुसार कोंबडा हा पोर्तुगीजांमधे राष्ट्रीय पक्षी मानला जात असे.
पुढे एक ख्रिस्ती धर्मस्तळ बघितलं जिथे ४०० वर्षांपासून एका संताचा देह पेटीमधे ठेवलेला आहे.दर दहा वर्षांनी ती पेटी खाली आणून लोकांना दर्शन घेण्याकरता ठेवली जाते.माहिती देणा-याने असं सांगितलं की तो मानवी देह कोणत्याही रासायनिक प्रक्रियेविना आजही जसाच्या तसा आहे. आम्हांला दुरूनच ती पेटी दिसली त्यामुळे खरंच तसं काही आहे की नाही ते माहित नाही, असो. ते धर्मस्थळ आतून सजविण्यासाठी ख-या सोन्याचा उपयोग केला आहे.आमच्यासारखे बरेच पर्यटक तिथे असल्यामुळे तिथे असणा-या शांततेचा अनुभव घेता नाही आला.
पुढे आम्ही अजून एका ख्रिस्ती धर्मस्थळाला भेट दिली.तिथे असणा-या सगळ्या मूर्त्यांवर मात्र फक्त रडवेला, कारूण्य असणारा भाव दिसला.
मला ते फारसं पटलं नाही, म्हणजे आपल्या मंदिरांमधे गेलं की कसं मस्त प्रसन्न वाटतं गोल-गरगरीत गणू बाप्पाला बघितल्यावर किंवा हसतमुख चेह-याच्या,टपोरे सुंदर डोळे असणा-या देवीला बघितल्यावर तसं त्यांच्या धर्मस्थळात गेल्यावर मन उदास झालं..
बाकी आमच्या गोवा सफरीमधे संध्याकाळी नदीकाठी असणा-या क्रूझची सफर पण होती.खूप अपेक्षेने गेलो होतो पण सगळ्या फोल ठरल्या, विशेष काही बघता नाही आलं आणि वेळ वाया गेला..
गोव्याची शॉर्ट अॅण्ड स्वीट ट्रीप आटपून आम्ही परत पुण्याला निघालो तेंव्हा रस्त्यात एका ठिकाणी बस थांबली आणि पोलिस आत शिरले. सगळी जनता झोपेत होती पण तरीही त्यांनी सगळ्यांना बॅग्स उघडून दाखवायला सांगितल्या. त्यांच्या अपेक्षेप्रमाणे एका मुलाकडे 'गोव्याचा बाटलीबंद माल' सापडलाच, त्याने गोव्यातून घेतलेलं परमिट पण दाखवलं पण पोलिस म्हटले ते परमिट फक्त मर्यादित सीमेपर्यंत लागू आहे!! पोलिसांनी त्या पोराकडून सगळा माल जप्त केला आणि आमची बस पुढे निघाली.खरं तर परमिट देऊन असा काही नियम लागू करणं ही फसवणूक आहे पण....
असो, गोव्यासारख्या रम्य ठिकाणाची ओळख उशीरा का होईना पण झाली ह्यामुळे २०१३ची सांगता अगदी सुंदर झाली :)

No comments:
Post a Comment