काहि दिवसांपूर्वी एका टॅक्सी सर्व्हिसची घोषणा करण्यात आली होती - G taxi. हि टॅक्सी सेवा 'ट्रान्सजेन्डर्स' चालवणार आहेत आणि आज अजून एक बातमी वाचली. अतिशय आशादायक बातम्या आहेत ह्या दोन्हीही :)
समाजाने, बहुतांशवेळा कुटंबानेही नाकारलेल्या ह्या माणसांना अशा कामांमुळे समाजामधे ताठ मानाने जगायला मिळेल हि खूप चांगली गोष्ट आहे.
LGBT वर्गात मोडणा-या व्यक्तींना खडतर प्रयत्न करत स्वत:चं वेगळं अस्तित्व आणि ते पण समाजाचा एक महत्त्वाचा भाग आहेत हे सिद्ध करावं लागणार आहे. अजूनही त्यांच्या बाबतीत अस्पृश्यतेची भावना आपल्यामधे आहे जि ह्या बदलांमुळे कमी व्हायला नक्कीच मदत होईल अशी आशा आहे.
Wednesday, February 17, 2016
Friday, February 5, 2016
चपटी
आॅफिस संपल्यावर घरी जातांना आमची बस एका वस्तीसमोरुन जाते. तुरळक घरं आणि शेतं दिसतात. घराच्या अंगणात, शेतामधे काहि बायका-पुरुष काम करतांना दिसतात आणि त्यांच्या अवतीभोवती त्यांची छोटी मुलं खेळत असतात. जवळजवळ रोजचंच आहे हे दृश्य पण आज वेगळं काहीतरी दिसलं आणि मनात अगदी चर्र झालं :(
एक छोटी मुलगी खेळत बसली होती आणि तिच्या खेळण्या होत्या एक चेपलेलं स्टीलचं वाडगं आणि देशी दारूच्या दोन रिकाम्या बाटल्या!!
त्या मुलीच्या अंगावर जेमतेम एक मळका कपडा होता पण तिच्या खेळात ति मग्न होती. त्या निरागस जिवाला ह्या गोष्टीची पुसटशी जाणिवही नव्हती की ति कशाशी खेळत आहे :(
अशा कितीतरी निष्पाप, निरागस मुलांचं आयुष्य त्या दारूने नासवलं आहे अाजवर आणि अजूनही तिचं कार्य अव्याहतपणे चालूच आहे!!
हातावर पोट असणाऱ्या माणसांना दारूची चैन कशी काय परवडते?? पोरांच्या अंगावर घालायला कपडे आणू शकत नाही पण दारु सोडणार नाहि!! बायकोला मार-हाण करुन तिच्या कष्टांची कमाई ओरबाडून नेणार पण दारु मात्र न-चुकता पिणार!! गरिबी आणि दारुचं असं कसं विचित्र समीकरण आहे रे देवा :(
Subscribe to:
Posts (Atom)