Friday, February 5, 2016

चपटी

आॅफिस संपल्यावर घरी जातांना आमची बस एका वस्तीसमोरुन जाते. तुरळक घरं आणि शेतं दिसतात. घराच्या अंगणात, शेतामधे काहि बायका-पुरुष काम करतांना दिसतात आणि त्यांच्या अवतीभोवती त्यांची छोटी मुलं खेळत असतात. जवळजवळ रोजचंच आहे हे दृश्य पण आज वेगळं काहीतरी दिसलं आणि मनात अगदी चर्र झालं :(

एक छोटी मुलगी खेळत बसली होती आणि तिच्या खेळण्या होत्या एक चेपलेलं स्टीलचं वाडगं आणि देशी दारूच्या दोन रिकाम्या बाटल्या!!

त्या मुलीच्या अंगावर जेमतेम एक मळका कपडा होता पण तिच्या खेळात ति मग्न होती. त्या निरागस जिवाला ह्या गोष्टीची पुसटशी जाणिवही नव्हती की ति कशाशी खेळत आहे :(

अशा कितीतरी निष्पाप, निरागस मुलांचं आयुष्य त्या दारूने नासवलं आहे अाजवर आणि अजूनही तिचं कार्य अव्याहतपणे चालूच आहे!!

हातावर पोट असणाऱ्या माणसांना दारूची चैन कशी काय परवडते?? पोरांच्या अंगावर घालायला कपडे आणू शकत नाही पण दारु सोडणार नाहि!! बायकोला मार-हाण करुन तिच्या कष्टांची कमाई ओरबाडून नेणार पण दारु मात्र न-चुकता पिणार!! गरिबी आणि दारुचं असं कसं विचित्र समीकरण आहे रे देवा :(

No comments:

Post a Comment