शुक्रवार म्हणजे आम्हा 'आय.टी.' कामगारांसाठी अत्यंत आवडता दिवस. सकाळी डोळे उघडल्यावर आधी हा विचार येतो की चलाs आज ह्या आठवड्यातलं शेवटचं लवकर उठणं! उद्या आणि परवा मस्त उशीरापर्यंत झोपता येईल :) :) ह्या विचारासरशी एकदम एनर्जी येते आणि दिवसाची सुरूवातच मस्तss होते :D
आमच्या आठवडयाचा हा शेवटचा दिवस त्यामुळे सकाळपासूनच कसं हलकं हलकं वाटत असतं. त्यातच फाॅर्मल्स नाही तर जीन्स किंवा तत्सम कॅज्युअल्स घालायला परवानगी असते म्हणजे दुधात साखरच :D
आॅफिस कॅन्टीन मधे सगळे रंगीबेरंगी आणि हसरे चेहरे दिसत असतात. त्यातही मुली विशेष तयार होऊन आलेल्या असतात. लेटेस्ट फॅशनचे सगळे ट्रेन्ड्स बघायला मिळतात. अगदी कानातल्यापासून ते पायातल्या जूती-चप्पल पर्यंत सगळ्या प्रोडक्ट्सची व्हरायटी बघायला मिळते.
पण कुठल्याही मुलीने केलेली ही स्वतःला सजवण्याची कसरत तेंव्हाच फळाला येते जेंव्हा एखादी दुसरी मुलगी, हो हो मुलगीच तिच्याकडे वळून फक्त भुवई उंचावून दाद देते!!:D :D :D :D
बास! फिर तो वो लडकी-'आज मै ऊपर, आसमां निचे' वगैरे वगैरे मधेच तरंगत राहते
Friday, January 12, 2018
Wednesday, January 3, 2018
डाएट प्लॅन
काल आॅफिसच्या बसमधे चढतांना समोर एकजण होता. त्याच्या एका हातात जिम(gym) साठी वापरतात तशी भलीमोठी डफल बॅग होती दुस-या हातामधे शेकर कम बाॅटल होती आणि पाठीवर आॅफिसची सॅक. आत जाऊन त्याने समोरच्या सीटवर सगळ्या बॅग्स आदळल्या आणि शेजारी स्वत:ला!
मी पलिकडच्या रांगेतल्या सीटवर बसतांना त्याचा आवाज कानावर आला, 'हं बाबा मी निघालो आहे आत्ता आॅफिसमधून, तासाभरात पोहोचेन घरी. हो,हो प्रोटीन शेक आत्ताच संपवला आहे मी. माझ्यासाठी आता ४ अंडी उकडून ठेव आणि ग्रीन सॅलड करुन ठेव, ओके सीयू,बाय.'
हे संभाषण ऐकल्यावर कोण बरं असेल हा, ह्या विचाराने जरा व्यवस्थितच बघावं म्हणून मान तिरकी केली. सुखवस्तू घरातला गोरा-गोमटा आणि बहुतेक तरी जंकफुड खाल्ल्यामुळे आलेलं बाळसं असलेला गोल चेहऱ्याचा पण वुलवरिन/धोनी स्टाईल हेअरकट असलेला, कदाचित नुकताच कॅम्पस मधून आमच्या आॅफिसमधे जाॅईन झालेला मुलगा दिसला.
वरकरणी बघता मला तरी तो '१ जानेवारी रिसोल्यूशन सिंड्रोम' कॅटेगरी मधला वाटला. पण त्याचा डायट प्लॅन (निदान जितका मी ऐकला तितका) ऐकल्यावर मला जरा गम्मतच वाटली :D जिम सुरु केलं रे केलं की लग्गेच लोक असा काही डाएट प्लॅन आखतात की ते सगळं खाऊन ह्यांचं आजवर कमावलेलं वजन अगदी दोन दिवसातच कमी होणार आहे :D काय काॅन्फिडन्स आहे यार!!:D :D
Monday, January 1, 2018
Resolution
Resolution म्हणजे Resolution बरं का!!
आज १ जानेवारी म्हणून व्यायाम/ जाॅगिंग/ सायकलिंग ला सुरूवात करायची म्हणजे करायचीच!!
तर असा संकल्प केलेले आरंभशुर आज ब-याच ठिकाणी दिसले. माझ्या भागामधले जवळपास सगळे जिम्स खचाखच भरलेले दिसले, माझ्या शेजारी राहणारं एक कपल नव्या को-या सायकल्सवर फिरायला बाहेर पडलेलं दिसलं आणि कहर म्हणजे एक पोरगा नव्या टी-शर्टचा प्राईसटॅगही न काढता जाॅगिंग करतांना दिसला :D :D :D
Resolution आहे बाबा! केलंच पाहिजे :D
Subscribe to:
Posts (Atom)