काल आॅफिसच्या बसमधे चढतांना समोर एकजण होता. त्याच्या एका हातात जिम(gym) साठी वापरतात तशी भलीमोठी डफल बॅग होती दुस-या हातामधे शेकर कम बाॅटल होती आणि पाठीवर आॅफिसची सॅक. आत जाऊन त्याने समोरच्या सीटवर सगळ्या बॅग्स आदळल्या आणि शेजारी स्वत:ला!
मी पलिकडच्या रांगेतल्या सीटवर बसतांना त्याचा आवाज कानावर आला, 'हं बाबा मी निघालो आहे आत्ता आॅफिसमधून, तासाभरात पोहोचेन घरी. हो,हो प्रोटीन शेक आत्ताच संपवला आहे मी. माझ्यासाठी आता ४ अंडी उकडून ठेव आणि ग्रीन सॅलड करुन ठेव, ओके सीयू,बाय.'
हे संभाषण ऐकल्यावर कोण बरं असेल हा, ह्या विचाराने जरा व्यवस्थितच बघावं म्हणून मान तिरकी केली. सुखवस्तू घरातला गोरा-गोमटा आणि बहुतेक तरी जंकफुड खाल्ल्यामुळे आलेलं बाळसं असलेला गोल चेहऱ्याचा पण वुलवरिन/धोनी स्टाईल हेअरकट असलेला, कदाचित नुकताच कॅम्पस मधून आमच्या आॅफिसमधे जाॅईन झालेला मुलगा दिसला.
वरकरणी बघता मला तरी तो '१ जानेवारी रिसोल्यूशन सिंड्रोम' कॅटेगरी मधला वाटला. पण त्याचा डायट प्लॅन (निदान जितका मी ऐकला तितका) ऐकल्यावर मला जरा गम्मतच वाटली :D जिम सुरु केलं रे केलं की लग्गेच लोक असा काही डाएट प्लॅन आखतात की ते सगळं खाऊन ह्यांचं आजवर कमावलेलं वजन अगदी दोन दिवसातच कमी होणार आहे :D काय काॅन्फिडन्स आहे यार!!:D :D
No comments:
Post a Comment