भर उन्हाळ्यात दिवसेंदिवस सूर्याचं दर्शन होऊ नये हा केवढा दैवदुर्विलास 😞
सोळा तासांचा दिवस, सकाळी उठल्यावर बाहेर करडा रंग साचलेलं भकास वातावरण असतं आणि रात्री झोपायला जातानाही तेच 😒
ढगाळ वातावरणामुळे उकडायला लागलं म्हणून खिडकी उघडली की इतकी रोगट हवा आत येते की सर्दी-पडसं झालंच म्हणून समजा!
घराला खिडक्या पुष्कळ आहेत पण जिथे नजर जाईल तिथे फक्त 'करडा'च रंग भरलेला दिसतो. हिरवी झाडं सुध्दा पान न-हलवता स्तब्ध उभी असतात स्टॅच्यू करुन ठेवल्यासारखी! त्यांचं असं निर्विकार उभं राहणं उलट त्रासदायक वाटतं मला कधीकधी 😓
भरीतभर घरात बसून काम करावं लागतंय त्यामुळे तर उत्साह वाटावा म्हणून रोज काय कारण शोधयचं??
उग्गाच नाही ह्या देशामधे प्रत्येकी ४ माणसांपैकी १ डिप्रेशन मधे जगतो! मला तर वाटतं हे असलं घाणेरडं वातावरणच मुख्य कारण आहे, त्याखालोखाल बाकीच्या कारणांचा नंबर लागेल!!
उन्हाळा आहे ना मग सूर्याचं दर्शन व्हायलाच हवं इतकं साधं-सोपं-सरळ आहे नं, पण नाही!!
'टिप्पीकल ब्रिटिश वेदर' आहे गं बाई हे 😫😫
No comments:
Post a Comment