Thursday, March 15, 2012

वपू सांगे वडिलांची कीर्ती



अगदी  मनाला  चटका  लावणारं  पुस्तक  आहे ,.पुं ची  तगमग शब्दागणिक  जाणवते, स्वत:  च्या  वडिलांना  ते  वेळेत  ओळखू  शकले नाहीत्यांना  जेव्हां  आवशकता  होती  तेव्हां  .पुमदत  करू  शकले  नाही  ह्या  सगळ्याची  खंत  त्यांनी  व्यक्त  केली  आहे.
 तसच  वडिलांच्या  कष्टाला  -मिळालेल्या  मोबादल्याबद्दलचा  रागही   त्यांनी  व्यक्त  केला  आहे.
 .पुं च्या  नेहमीच्या  साध्या-सरळ  भाषेतून  त्यांनी  अण्णा (श्रीपुरुषोत्तम श्रीकाळे)  आपल्यासमोर  उभे  केले  आहेतखरतर   .पुं.नि  स्वगतच  केलं  आहे  ह्या  पुस्तकातहे  चरित्र  वगैरे   अजिबात  नाहीं ..अगदी  कोणी  रोजनिशी  लिहित  ना  तसे  फक्त  प्रसंग , एकातून -दुसरा  अन  तिथून  पुढे  असं  मांडलं  आहे  सगळ, तरीही  अपूर्ण  वाटतं  काहीतरी ....पु  अजूनही शोधत आहेत  अण्णा ना   हेच  जाणवत  राहत ..
अण्णा  हे   खूप  मोठे  कलाकार  होतेच   पण  त्याहीपेक्षा  खूप  मोठ्या  मनाचा  माणूस  होतेकोणत्याही  परीस्थित  डगमगता  त्यांनी  आयुष्याचा  खडतर  प्रवास  अगदी  हसतमुखाने  पूर्ण केला ,एक  स्थितप्रज्ञच जणू.
एका  मुलाने  स्वत: च्या  वडिलांना  शोधण्याचा केलेला  हा  प्रामाणिक  प्रयत्न   वाचनीय आहेच ..



या ब्लॉग वरील लिखाण कॉ्पीराईट प्रोटेक्टेड आहे, कुठेही पब्लिश करण्यापूर्वी लेखिकेची परवानगी घेणे आवश्यक आहे.
Protected by Copyscape Online Plagiarism Check

No comments:

Post a Comment