Wednesday, March 21, 2012

स्वत:विषयी - अनिल अवचट

ह्या  पुस्तकामध्ये  अनिल  अवचट ह्यांनी त्यांच्या  आयुष्यात  घडलेल्या  काही   ठळक  घटनांबद्दल   मांडलं  आहे , त्यांच्या म्हणण्यानुसार हे आत्मचरित्र नक्कीच नाहि पण ह्या
प्रमुख घटनांमुळे त्यांचं आयुष्य कसं बिघडलं आणि  पुन्हा  कसं   घडलं  हे   नमूद केलं आहे. त्यांच्या  हातून  झालेल्या  चुका  त्यांनी  अगदी  प्रांजळपणे  मांडल्या  आहेत .अवचटांनी    स्वत:शीच    
मारलेल्या   गप्पा  आपल्याला  त्यांच्या  आयुष्यात  घडलेल्या    महत्वाच्या  
घटनांची  सफर  करून  आणतात; शाळकरी  वय  (दहावी), तारुण्याच्या   उंबरठ्यावर   आयुष्य  सर्वार्थाने  बदलणारी   डॉक्टरकी (डॉक्टरकी ), स्वकीयांपासून  दुरावून स्वहिमतीवर मांडलेला  संसार   (नानापेठआणि  
घराला  पुर्नार्थ  देणा-या   दोन  चिमण्यांचM  संगोपन  (संगोपन )  ह्या  
दीर्घ -लेखांमधून  साधे -सरळ  अनिल  अवचट  आपल्यासमोर उभे  राहतात .
खूप  वेगळ्या  पद्धतीने  अवचट ह्यांनी त्यांची  ओळख  ह्या  पुस्तकातून  करून  दिली  आहेएखाद्या  माणसाच्या  जडण -घडणीमध्ये  आजूबाजूला  असणारे  सजीव -निर्जीव  घटक  कसे   कारणीभूत  असू  शकतात  आणि  त्या  गोष्टींचा  किती  खोलवर  
परिणाम  आपल्या  मनावर  होतो   ह्याची  अनुभूती   वाचताना  नक्कीच  येते .



या ब्लॉग वरील लिखाण कॉ्पीराईट प्रोटेक्टेड आहे, कुठेही पब्लिश करण्यापूर्वी लेखिकेची परवानगी घेणे आवश्यक आहे.
Protected by Copyscape Online Plagiarism Check

Thursday, March 15, 2012

वपू सांगे वडिलांची कीर्ती



अगदी  मनाला  चटका  लावणारं  पुस्तक  आहे ,.पुं ची  तगमग शब्दागणिक  जाणवते, स्वत:  च्या  वडिलांना  ते  वेळेत  ओळखू  शकले नाहीत्यांना  जेव्हां  आवशकता  होती  तेव्हां  .पुमदत  करू  शकले  नाही  ह्या  सगळ्याची  खंत  त्यांनी  व्यक्त  केली  आहे.
 तसच  वडिलांच्या  कष्टाला  -मिळालेल्या  मोबादल्याबद्दलचा  रागही   त्यांनी  व्यक्त  केला  आहे.
 .पुं च्या  नेहमीच्या  साध्या-सरळ  भाषेतून  त्यांनी  अण्णा (श्रीपुरुषोत्तम श्रीकाळे)  आपल्यासमोर  उभे  केले  आहेतखरतर   .पुं.नि  स्वगतच  केलं  आहे  ह्या  पुस्तकातहे  चरित्र  वगैरे   अजिबात  नाहीं ..अगदी  कोणी  रोजनिशी  लिहित  ना  तसे  फक्त  प्रसंग , एकातून -दुसरा  अन  तिथून  पुढे  असं  मांडलं  आहे  सगळ, तरीही  अपूर्ण  वाटतं  काहीतरी ....पु  अजूनही शोधत आहेत  अण्णा ना   हेच  जाणवत  राहत ..
अण्णा  हे   खूप  मोठे  कलाकार  होतेच   पण  त्याहीपेक्षा  खूप  मोठ्या  मनाचा  माणूस  होतेकोणत्याही  परीस्थित  डगमगता  त्यांनी  आयुष्याचा  खडतर  प्रवास  अगदी  हसतमुखाने  पूर्ण केला ,एक  स्थितप्रज्ञच जणू.
एका  मुलाने  स्वत: च्या  वडिलांना  शोधण्याचा केलेला  हा  प्रामाणिक  प्रयत्न   वाचनीय आहेच ..



या ब्लॉग वरील लिखाण कॉ्पीराईट प्रोटेक्टेड आहे, कुठेही पब्लिश करण्यापूर्वी लेखिकेची परवानगी घेणे आवश्यक आहे.
Protected by Copyscape Online Plagiarism Check