सहा महिन्यांचा परदेशदौरा करून घरी आले आणि बाबांनी भलीमोठी यादी माझ्यासमोर ठेवली. यादी कसली विचारा, हं बरोब्बर! ती यादी होती 'यंदा कर्तव्य असणा-या मुलांची'! मी मनातल्या मनात डोक्यावर हात मारून घेतला आणि स्वतःला आठवण करून दिली की हम्म अजून आपला नवरा शोधायचा
राहिला आहे,मी विसरलेच होते
हूह! तर मी ती यादी हातात घेतली आणि लॅपटॉप उघडून एकेका मुलाचं प्रोफाईल बघायला सुरूवात केली.जे जे ठीक वाटले त्यांच्या नावावर टीक करून यादी निकालात काढली.
प्रत्येकवेळेस जे तंत्र वापरतो ते यावेळेस नको हा एक विचार मनात आला आणि मी सगळ्यात आधी ऑनलाईन प्रोफाईल मधे टाकलेला माझा 'टीपीकल' फोटो बदलून मला चांगला वाटलेला साडीतला एकच फोटो लावला
त्यानंतर ठरवलं की डोळे बंद करून कुठल्यातरी एका प्रोफाईलवर क्लीक करायचं आणि त्यालाच फक्त मेल पाठवायचं.पण पूर्वानुभवानुसार जर उत्तर आलंच नाही तर किती वेळ थांबायचं, म्हणून जास्तीत जास्त ३आठवडे वाट बघायची आणि पुढच्या मुलाच्या प्रोफाईलकडे वळायचं असं ठरवलं.
मग ठरवल्याप्रमाणे मी एक प्रोफाईल सलेक्ट केला आणि त्याला मेल पाठवून दिलं.
दोन दिवसातच त्या मुलाच्या वडीलांचा घरी फोन आला.त्यांनी माझी पत्रिका अमूक गुण जुळते असं सांगितलं आणि पुढचा काय विचार आहे असं विचारलं.
बाबांना सांगितलेलं असल्यामुळे बाबांनी,'मुलांना एक-दोनदा भेटू द्या म्हणजे कळेल आपल्याला',असं सुचवलं.मुलाचे वडील लगेच तयार झाले.मुलाचा फोन नंबर घेऊन बाबांनी मला त्याच्याशी संपर्क करायला सांगितला.
मी परत एकदा शुक्रवारची निवड केली आणि मुलाला संपर्क करून कुठे भेटायचं,किती वाजता भेटायचं ते ठरवलं.ह्या मुलाने कोणत्याही अंतराचं मोजमाप न-देता,आढेवेढे न-घेता ठरलेल्या वेळेला भेटायचं कबूल केलं.मला थोडं आश्चर्य वाटलं पण हायसंही वाटलं
संध्याकाळी ६वाजताची वेळ ठरली होती आणि मला ५.५५वा. त्या मुलाचा मेसेज आला की,मी ठरलेल्या ठिकाणी आलो आहे तू आल्यावर फोन कर.
मी वेळेत पोहोचले आणि त्याला फोन केला.आमची भेट झाल्यावर मॉलमधे असणा-या एका कॉफीशॉपमधे आम्ही जाऊन बसलो.
कॉफीशॉपमधे गेल्यावर मेन्यू कार्ड समोर आलं.
त्याने मला विचारलं की इथे कोणती कॉफी चांगली मिळते? मी पहिल्यांदाच आलो आहे त्यामुळे माहित नाही.
मला ते ऐकून थोडी मजा वाटली.मी मेन्यू कार्ड हातात घेऊन माझ्या माहितीतली कोणती कॉफी दिसते का ते बघितलं पण मलाही सापडेना तेंव्हा कॉफीशॉप च्या माणसानेच मदत केली
आमच्या गप्पा सुरू झाल्या एकामधून दुसरा, दुस-यातून तिसरा असे विषय निघत गेले आणि फक्त 'अर्धा तास भेटूया' असं ठरवून आलेली मी दीडतासाने फोन वाजल्यावर भानावर आले!
एकमेकांना बाय करून,घरच्यांशी बोलून निर्णय कळवूयात असं म्हणून आम्ही निघालो.
मी स्वतःशीच विचार करत होते की काय झालं आज दीड तास वेळ कसा निघून गेला कळालंच नाही
खूप दिवसांनंतर दोन मित्र भेटल्यावर जशा मनमोकळ्या अगदी मनापासून गप्पा होतात तसं काहीसं वाटलं.
आज पहिल्यांदा मी ह्या मुलाला भेटले आणि तरी इतक्या गप्पा का कराव्याश्या वाटल्या आणि तेही कोणत्याच आडकाठीशिवाय? आजपर्यंत इतक्या मुलांना भेटले पण असं कधीच झालं नाही मग आजच का?
कदाचित तो पण खूप गप्पा मारतो म्हणून झालं असेल का? पण माझं मन इतकं आनंदाने का फुलून गेलं आहे, काय असं वेगळं घडलं? मला तो आवडला आहे का? ओह गॉड
पण परत विचार आला की इतक्या घाईघाईने मी निर्णयाप्रत नको पोहोचायला.घरी जाऊन विचार करू, ताईशी बोलू मग खरं उत्तर कळेल.
घरी आले आणि आधी ताईला फोन केला.आम्ही भेटलो तेंव्हापासून ते आम्ही काय अन कशाकशावर चर्चा केली ते सगळं इत्थंभूत सांगितलं.
ताई शांतपणे ऐकत होती, शेवटी तिने फक्त एकच विचारलं,तुझं अॅनालिसीस काय आहे त्या मुलाबद्दल? आणि मी सहजपणे बोलून गेले,'ताई, इतक्या निर्मळ मनाचा आणि निरागस मुलगा मला पहिल्यांदाच भेटला आहे'.
ताई अगदी मनापासून हसली आणि म्हटली,'तेरी तो घंटी बज गयी बेटाssss, आय थिंक ज्या सहजतेने तुम्ही आज गप्पा केल्या त्यावरून तुम्हांला दोघांनाही पुढे जायला हरकत नाही'.
मी तर उडालेच ते ऐकून
मी परत एकदा तिला विचारलं,'खरंच तुला असं वाटतंय?'
ताई म्हटली, 'घाई नाही आपल्याला. तुम्ही हवं तर अजून दोन-तीन वेळेस भेटा. जर, तुझं मत आता सांगितल्या पेक्षा वेगळं झालं तर परत आपण विचार करू, हम्म
मी ताईशी बोलून फोन ठेवला पण का कोण जाणे मनामधे असाही विचार आला की,कदाचित तो मुलगा असंच सगळ्या मुलींशी वागत असेल.त्यामुळे जरी मला तो आवडला तरी त्याचं मत काय असेल? तो म्हटला की घरी गेल्यावर कळवेन पण जर त्याने नकार दिला तर? परत माझंच मन मला जागं करत म्हटलं,अगं तो स्वतः म्हटला ना की त्याला अजून एक-दोन वेळेस भेटायला आवडेल म्हणून.
मग परत वाटलं, आता त्याचा फोन येईपर्यंत नकोच विचार करायला.
असं ठरवलं खरं पण माझं मन काही त्याचा विषय सोडायला तयार होईना.रात्रीसुध्दा दोन मिनीटामधे झोपणारी मी संध्याकाळच्या भेटीचा प्रसंग आळवत पडले होते ..रात्री कधी झोप लागली ते कळालं नाही पण दुस-या दिवशी आईने उठवलं तेंव्हा सकाळचे ११ वाजले होते!!
आईने उठवलं आणि माझ्या चेह-यावरून अगदी प्रेमाने हात फिरवत म्हटली,'त्या मुलाचा थोड्यावेळापूर्वी फोन आला होता.त्याला आणि त्याच्या घरच्यांना सगळं आवडलं आहे.त्याने परत एकदा भेटायला हरकत नाही असं सांगितलं.'
मी तर एकदम खाड्कन जागीच झाले ते ऐकून आणि आईकडे बघतच राहिले. मी स्वप्न तर बघत नाही ना म्हणून स्वतःला चिमटा पण काढून बघितला. पण हो आई खरंच माझ्यासमोर बसली होती आणि अगदी कौतुकाने हसत होती
मी लगेच ताईला फोन करून ही आनंदाची बातमी सांगितली.आम्ही परत भेटल्यावर काय बोलायला हवं ह्याची चर्चा केली आणि तासाभराने त्या मुलाला रविवारी भेटायची वेळ ठरवायला फोन केला.
...पुढे आम्ही दोन-तीन वेळेस भेटलो. खूप खूप गप्पा मारल्या. नोकरी,पगार, एकमेकांची स्वप्नं,स्थायिक होण्याचं शहर, आई-बाबा-कुटुंब,नविन नातं आणि अजून भरपूर काही.
भेटीनंतर प्रत्येक वेळेस मी माझं मत तपासून बघत होते पण ते बदललं नाही.
मग काय एके दिवशी आई-बाबा आणि मी त्या मुलाच्या घरी गेलो लग्नाची बोलणी करायला आणि
फायनली माझं लग्न ठरलं
तर अशी ही साठा-उत्तरांची 'नवराखोज' कहाणी पाचा-उत्तरी सफळ संपूर्ण झाली
समाप्त