एखादा नकार तर येणारच हा विचार करून बाबा तर केंव्हाच पुढची स्थळं शोधत होते.मग मीही स्वतःला रिफ्रेश केलं पुढच्या 'खोज'मोहिमेसाठी
बाबांनी काढलेल्या लिस्टमधल्या ब-याच जणांना आम्ही संपर्क केला त्यातल्या अर्ध्या लोकांनी उत्तर दिलं नाही, ज्यांनी उत्तर दिलं त्यांनी 'नोकरी करणारी मुलगी नको' अशी *कंडिशन नंतर कळविली त्यामुळे तेही निकालात निघाले.राहता राहिले दोन जण.
त्यातला एकजण बँगलोरमधला असल्याने त्याच्याशी फोनवर बोलायचं ठरलं. ठरवलेल्या वेळी त्या मुलाने मला मोबाईलवर फोन केला.मला आता थोडीफार सवय झाली होती त्यामुळे ठरावीक प्रश्नांनी मी सुरूवात केली अन जुजबी माहिती शेअर झाली. त्याही मुलाने साधारण सारखेच प्रश्न विचारले.नंतर त्याने पार्टनर बद्दलच्या अपेक्षा सांगायला सुरूवात केली.
मुलगी दिसायला अगदी सुंदरच हवी,( म्हणजे तुला सामान्य मुलगी नाही ऐश्वर्या नाहीतर कटरिना ऑर करिनाच हवीये )
केस लांब असले तर वेल अॅण्ड गूड पण अगदीच बॉयकट / बॉबकट नसावा( टीपीकल डिमाण्ड ).
तिला चष्मा नकोच कारण आमच्या घरात आम्हांला कोणाला चष्मा नाहीये यूनो,सो..( हे काय आहे?? घरात कोणाला चष्मा आत्ता नाहीये पण उद्या लागणार नाही ह्याची काय गॅरंटी?? अन चष्मा असणं काय असाध्य रोगाचं लक्षण आहे का?? काय रे देवा ही कसली अपेक्षा )
तिने टाईमपास म्हणून नोकरी केली तर चालेल पण मी ऑफिसमधून घरी येण्याआधी ती घरी असायला हवी ( हे भगवाssन! मग तिला नोकरी कशाला करू देतो बाबा )
मला खाण्याची खूप आवड आहे तेंव्हा तिने रोज मला नवनविन पदार्थ करून खाऊ घालायला हवेत.
मी मधेच म्हटलं, पण जर तिला स्वयंपाकच येत नसेल तर??
त्यावर तो म्हटला मग मी कदाचित तिला नापसंत करेन!! ( ग्रेट यार म्हणजे ह्या पोराला करिना कपूरसारखी हिरोईन + नव-याची दारात वाट बघणारी तुलसी + ताज होटेलची शेफ एकत्रितपणे हवीये!! )
ह्या अपेक्षा ऐकून मी विचारलं की हे सगळं असलेली मुलगी भेटली पण जर तुमचा स्वभाव जुळलाच नाही तर?
त्यावर लगेच तो उत्तरला, स्वभाव काय, मुलींना नविन ठिकाणी सगळंच जुळवून घ्यावं लागतं त्याप्रमाणे तिने माझ्या स्वभावासोबत अॅडजस्ट करून घ्यायला पाहिजे!!
मी ह्याउपर काही बोलूच शकले नाही
त्याने स्वतःच्या अपेक्षांची लिस्ट कंटिन्यू केली.पाचएक मिनीटाने ते सांगून संपल्यावर तो म्हणाला मी आत्ता काही महिन्यांकरता यू.एस.ला जाणार आहे त्यानंतर भेटू मग आपण, मी येईन तुला भेटायला. अच्छा, ठेवतो मग मी आता, अन फोन बंद!!
काय माणूस आहे हा! स्वतःच्या अपेक्षांची घोडागाडी दौडवून पार आमचं लग्न ठरल्यासारखं मला भेटायला येतो म्हटला अन फोन बंदपण करून टाकला!! मला आत्ताच त्याने बोलू दिलं नाही,माझं म्हणणं ऐकूनही घेतलं नाही तो पुढे मला कशी वागणूक देईल?? अन त्याच्या अपेक्षा बघता मी तरी त्याला सूट होणारी नव्हते!!
आश्चर्य एकाच गोष्टीचं वाटलं की आजच्याही काळातील तरूण आपली बायको पिक्चरमधल्या हिरोईनसारखी असावी अशी अवास्तव अपेक्षा ठेवतात??? सीक यार

आजच्या काळात देखील अशा अपेक्षा असलेले मुलगे !! ........... खूप shocking आहे. :( आणि adjustments फक्त मुलींनीच करायच्या ? ही मानसिकता कळतच नाही.
ReplyDeleteपुढच्या पोस्ट्स ची वाट पाहत आहे. :)
प्रतिक्रियेसाठी धन्यवाद deepsy :)
ReplyDeleteपुढील भाग प्रकाशित करण्यात आला आहे.