आज दोन वर्षांनी मी मुंबईत आले आणि त्याला भेटायची तीव्र इच्छा झाली. पण आॅफिसच्या कामाला लगेच जुंपून घ्यावं लागलं..तरी अधुन मधून वेळ मिळाला की त्याची आठवण डोकं वर काढत होती...२००८ साली आमची ख-या अर्थाने ओळख झाली नरीमन पाॅईंटला..आणि त्यानंतर मैत्रीचं रुपांतर प्रेमात व्हायला वेळ नाही लागला...मला नाही माहित त्याचं माझ्यावर प्रेम आहे की नाही पण मी मात्र त्याच्यासाठी वेडी झाले..पण तो लबाड नेहमीच मला एखाद्या प्रियकरासारखा भेटत राहिला... वर्षामागून वर्ष सरत होती, आमच्या भेटी-गाठी घडत होत्या आणि अचानक मला मुंबई सोडायचा निर्णय घ्यावा लागला पण जातांना भेट पण होउ नाही शकली त्यामुळेच की काय ह्यावेळेस फारच हुरहूर वाटत होती.. सकाळी आॅफिसला जाण्याआधी भेटावं म्हटलं तर तो आधीच निघून गेलेला असणार आणि संध्याकाळी भेटावं म्हटलं तर त्याला निघायला कदाचित उशीर होत असणार..काय करावं ह्या विचारांमधे असतांनाच मी आज जरा लवकर आॅफिसबाहेर पडले आणि...आणि तो समोरून आला..घोंघावणा-या वा-यावर स्वार होऊन आला..विजांच्या लखलखाटात त्याचं सहस्त्रधारांनी नटलेलं रुप मी बघतचं राहिले.आमच्या पहिल्या भेटीत जसा रौद्र पण मोहक होता अगदी तसाच आजही होता..इतक्या वर्षांपासून राहिलेली भेट आज जणू पूर्ण करायला.. फक्त मला भेटायला आला होता तो..माझा प्रियकरच जणू मला सहस्रधारांनी कवेत घ्यायला आला होता.. मधल्या काळात राहिलेल्या सगळ्या गप्पा आम्ही दोघांनी हातात हात घालून नाचत-बागडत पूर्ण केल्या :) :) खूप खूप मज्जा केली आणि परत असंच लवकर भेटायचं ठरवून एकमेकांना अलविदा केलं 😊
Thursday, July 30, 2015
अविस्मरणीय भेट

Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment