Sunday, August 2, 2015

मुहूर्त

आज फ्रेंडशिप डे आहे.सकाळपासून मला पुष्कळ मेसेजेस आले, तुम्हाला पण आले असतील नं..तर एक मजा म्हणून हा दिवस साजरा करायला काहीच हरकत नाही,नाहीतरी सेलेब्रेट करायला आपल्याला हल्ली कोणतंही कारण चालतं काय..
शाळेत असतांना खुप धमाल यायची ह्या दिवशी :) सगळ्या मैत्रिणी एकमेकींना फ्रेंडशिप बॅंण्डस बांधायचो.कधी स्वत: बनवलेले असायचे तर कधी विकत आणलेले..
हा रविवार संपल्यानंतर कोणाच्या हातावर किती दिवस किती बॅंण्डस टिकतात ह्याची पण नोंद ठेवली जायची :)

साधारण १०वी नंतर ब-याच जणींचे मार्ग वेगळे झाले..पुढे मग करियर, लग्न आपसुक ह्या गोष्टी घडत राहिल्या पण फेसबुकने सगळ्यांना एकत्र आणलं :) :)

खरं तर सच्च्या मित्राला असं सांगावं नाही लागत की तू माझ्यासाठी किती महत्त्वाचा आहेस ते..एकमेकांना ते व्यवस्थित माहित असतं आणि मग वर्ष वर्ष जरी भेट नाही झाली तरी एखाद्या वादळी रात्री फक्त एका 'हॅलो' मधे तिला/त्याला सगळं कळून जातं..
मग लटका राग बाहेर पडतो..एकमेकांची खिल्ली उडवली जाते..
शाळा-कॉलेजच्या-आॅफिसच्या दिवसांधले खमंग किस्से बाहेर येतात..भौतिक अंतर पुसल्या जातं आणि जणू एकमेकांसमोर बसून गप्पा चालू आहेत ह्या अावेशात किती वेळ निघून जातो कळत पण नाही..
काही वेळाने गप्पांचा पूर ओसरला की 'ह्या वेळेस नक्की भेटू',असं वचन एकमेकांना देत फोन ठेवला जातो..
ह्या एका फोनमुळे पुढचे कित्येक महिने पुरेल इतकी उर्जा मनाला मिळते आणि प्रत्यक्ष भेट ...तशीच राहून जाते.. :)

असा मित्र/मैत्रिण तुम्हाला असेल नं..आणि कित्येक दिवसात फोनपण झाला नसेल..मग आज नक्की बोला मुहूर्त चांगला आहे :) :) :)

Happy friendships day 2 allll

No comments:

Post a Comment