मी सज्ज आहे लढायला!👊 मास्क लाऊन!😷 डोळ्यांवर चष्मा चढवून!😎 हातात स्प्रे घेऊन!💨 मी सज्ज आहे लढायला या चिक्कट, जंतूंनी लदबदलेल्या बुरशीचा नायनाट करायला!!😠 मी सज्ज आहे लढायला!👊💪🤜🤛 ते आज नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती आहे नं तर जरा स्फुरण चढलं आहे म्हणून, बाकी काही नाही 😜 हां तर आज आहे आमच्या घरात 'फवारणी डे', तसा तो दर तीन - चार आठवड्यांनी असतोच. आमच्या घरातच असण्याचं खास काही कारण नाही कारण यूकेमधल्या बहुतांश घरांमधे विशेषतः जी ३०-४० वर्षं जुनी आहेत अशा घरांमधे हा कार्यक्रम असतोच असतो! आपल्याकडे शेतातल्या पिकांवर रोग पडला की कसं जालीम औषध फवारावं लागतं तसंच, इथेही घरामधे उगवणाऱ्या या किळसवाण्या-चिकट-काळ्याशार बुरशीला घालवायला जालीम-जहाल औषधाची फवारणी करावीच लागते! आणि एकदा करुन भागत नाही तर सातत्याने करावी लागते 😰😩 श्शीsss बुरशी 🤮 आणि ती ही घरात 😳🤔 असं वाटलं असेल नं तुम्हांला वाचल्यावर 😕 पण हो युकेमधे बाहेर उगवणाऱ्या बुरशीपेक्षा घरात उगवणारी बुरशीच जास्त आढळते! बरं ही बुरशी अतिशय उपद्रवी आणि आरोग्याला त्रासदायक असते.जर हिचा वेळीच नायनाट केला नाही तर साध्या सर्दीचं निमित्त होऊन तिचं रूपांतर दीर्घकाळ आजारात होतं, तसंच श्वसनाचे वेगवेगळे आजारही जडतात! त्यामुळेच अगदी डोळ्यात तेल घालून पहारा ठेवावा लागतो मला! कारण, आम्ही राहतो ते घरही असंच जुनं आहे. दिसायला एकदम टकाटक आहे बरं, पण एकदा का 'हिवाळा' सुरु झाला की मग या घराचे 'असली रंग' दिसायला लागतात!🤦 कसं आहे की, युके मधे थंडी चालू झाली की घरामधे हिटर लावावा लागतो त्यामुळे घर आतून ऊबदार होतं पण भिंती बाहेरून गारेगारच असतात.त्यामुळे या गरम-गारच्या नादात भिंतींचे कोपरे बाष्पीभवनाचे बळी पडतात आणि मग 'काळीशार' बुरशी ज्याला इथल्या भाषेत mold म्हणतात ती तरारून उगवते!🤮🤮 मग त्यावर वेगवेगळे उपाय करुन तिला घालवावं लागतं. पण ही बुरशी महाबिलंदर! एका ठिकाणी फवारणी करुन घालवली की काही दिवसांतच नविन ठिकाणी हिचा पसारा वाढायला लागतो!😤 म्हणजे रोज सकाळी उठलं की मला नवीनच ठिकाणी या चिवित्र प्रकाराचा प्रत्यय येतो 🤕😵 या घरता माझा पहिला हिवाळा होता तेंव्हा मला हा प्रकार नवीनच होता, मग हळूहळू याबद्दल माहिती मिळाली आणि गुगलबाबाच्या नुस्ख्यांना अजमावून पण, पश्चाताप होऊन शेवटी सुपरमार्केटच्या शेल्फा धुंडाळून एक जालीम औषध मला सापडलंच! मात्र, ते इतकं जहाल आहे की फवारणी करतांना PPE किटच घालावं लागतं!!😰 पण एकदा का मी सज्ज झाले की मग, घरात ज्या ज्या म्हणून कोपऱ्यात गुलाबी-करडे-काळे डाग असतील त्या त्या ठिकाणी फवारा उडवायला सुरूवात करते आणि बुरशीचा नायनाट करते! ही हा हा हा💪💪🧛 पण हाय रे कर्मा!🤦 परत काही दिवसांतच ती काळीकभिन्न बुरशी तिचे हातपाय पसरत नवीनच ठिकाणी उगवते आणि मी माझं गळालेलं अवसान गोळा करत, सज्ज होते शत्रूचा नायनाट करायलाssss 😠👊💨 मी सज्ज आहे लढायला.. #मुक्कामपोस्टUK
Saturday, January 23, 2021
Saturday, January 9, 2021
#notoplastictoothbrush
१,०००,०००,००० = १००करोड टूथब्रश 'दरवर्षी' कच-याच्या डब्यात जातात!! 😳😳😳 ही आकडेवारी गुगलने जगातील सर्वात प्रगत देशाची आहे असं सांगितलं आहे! मी-तुम्ही अगदी लहानपणी वापरलेला पहिला-वहिला छोट्टूसा टूथब्रश आठवतोय का?😕 तो आजही ३०-३५-४० वर्षं झाली कच-याच्या ढिगात अगदी तस्साच पडून आहे!🤪 कारण प्लास्टिक चे टूथब्रश हे अमरत्व घेऊन जन्माला आलेले असल्याने कच-याच्या ढिगाची शान वाढवायला तिथेच पडून राहतात!🤦 एक साधा टूथब्रश, जो आपण वापरून खराब झाल्यावर कच-याच्या डब्यात टाकून देतो अगदी सहजपणे, तो पूर्णपणे रिसायकल होत नाही! याबद्दल अनेक पोस्ट्स तुम्ही वाचल्या/बघितल्या असतील पण यावर उपाय काय याचा विचार केला का कधी??🤔 पर्यावरण संवर्धनासाठी झटणाऱ्या लोकांचं म्हणणं आहे की २०२१ पासून सुरु झालेलं हे दशक मानवजातीसाठी शेवटची संधी आहे 'आपलं घर-एकमेव पृथ्वी' वाचवायला!!😐 अकाली पाऊस-अमेझाॅनच्या जंगलातला वणवा-कोरोना ये सब तो ट्रेलर्स है - जागो!! वरना पिक्चर बहोत डरावनी होगी!!!😰 नमनाला घडाभर तेल जाळून झालं, हां तर मुद्दा हा आहे की, आपण सर्वजण एक सवय जर बदलू शकलो तर आपोआप पर्यावरण संवर्धनाला फायदा होईल! तुमचा प्लास्टिकचा टूथब्रश बदला आणि बांबूचा टूथब्रश विकत घ्या! नाही नाही मी कोणत्याही कंपनीची जाहिरात करत नाही! मी गेले ६ महिने स्वतः बांबूचा टूथब्रश वापरत आहे.प्लास्टिकच्या ब्रशसारखाच हा ब्रश असतो, वापरायला काहीच अडचण येत नाही! मुख्य म्हणजे याची किम्मत फार अवास्तव नाही आणि लहान-मोठ्या सर्वांसाठी पर्याय उपलब्ध आहेत. भारतामधे बांबूचं साहित्य बनवणारी bambooindia.com ही कंपनी मला सापडली तुम्ही त्यावरून आॅर्डर करु शकता किंवा 'यात वेगळा रंग नाही का?' असा प्रश्न विचारणा-यांनी अजून पर्याय शोधावेत.😜 आता तुम्ही म्हणाल, बांबूचा टूथब्रश खरंच पूर्णपणे रिसायकल होतो का? तर याचं उत्तर १००% हो, असं फक्त काहीच कंपन्यांच्या बाबतीत म्हणता येईल. कारण, बांबूचा टूथब्रश बनवणा-या बहुतांश कंपन्या, सध्यातरी 'टूथब्रश ब्रिसल्स्-ब्रशचे दात' हे प्लास्टिक पासून बनवत आहेत.त्यामुळे फक्त बांबू वापरलेला भाग पूर्णपणे पुनरुज्जिवीत होऊ शकतो प्लास्टिक नाही! मग कशाला त्या फंदात पडायचं 😏 , जेंव्हा १००% बांबूचा ब्रश येईल तेंव्हा आम्ही घेऊ😒! - कृपा करुन असा विचार करु नका!! नाही अख्खा टूथब्रश पण निदान काडी तर रिसायकल होते ना बांबू ब्रशची? निदान तो तरी वापरायला सुरूवात करा!! मला युके मधे एक कंपनी अशी सापडली आहे जी बांबू पासून बनवलेलेच ब्रिसल्स टूथब्रश वर लावते जेणेकरून तो १००% रिसायकल होऊ शकतो.मी तर बदल केला आहे, तुम्ही कधी सुरु करणार 😃 #notoplastictoothbrush #usebambootoothbrush
Friday, January 8, 2021
Thursday, January 7, 2021
#मुक्कामपोस्टUK : जानेवारी महिन्यातला ख्रिसमस #freezingrain
उणे ६°से. नी आज माझी सकाळ झाली आणि बाहेर बर्फच बर्फ 😍 😍 😍 अहाहा जानेवारी महिन्यातला ख्रिसमस 😄 😄 #freezingrain
Tuesday, January 5, 2021
#मुक्कामपोस्टUK : आणि हिमालय वितळू लागला!!
आणि हिमालय वितळू लागला!! . . . . . . . . . . . माझ्या घरातला हो!! झालं काय की २५ डिसेंबरच्या सकाळी आमच्या घरातला बाॅयलर गतप्राण झाला 🤪 अगदी मुहूर्त शोधून डाव साधला बघा मेल्याने 😭 बाॅयलर बंद पडणे आणि तेही ऐन ख्रिसमसच्या सुट्टीत हा केवढा दैवदुर्विलास 🤯🙈 घरातला सेंट्रल हिटर + गरम पाणी या दोन्ही अत्यावश्यक गोष्टींशिवाय आता पुढचे किती दिवस/महिने काढावे लागतील या नुसत्या विचारानेच माझा थरकाप उडाला आणि -१°से. तापमानात माझ्या कपाळावर बर्फ साचायला सुरूवात झाली! सगळ्यात आधी मी आमच्या एजंटला फोन लावला पण ख्रिसमसची सुट्टी असल्याने अर्थातच, त्यांचं दुकान बंद 🤦 आता काय करावं म्हणून त्यांची वेबसाईट उघडली आणि अत्यावश्यक सेवा देणारा एक नंबर सापडला.लग्गेच फोन फिरवला, समोरुन एका आजोबासदृश आवाजाच्या माणसाने, 'तुमचा प्रश्न थोडक्यात सांगा आणि आमच्या फोन ची वाट बघा', अशी सुचना दिली. त्याबरहुकूम मी सगळी रामकथा ऐकवली, फोन ठेवला आणि देवाचा धावा करत ह्या अडचणीला सामोरं कसं जायचं याचा विचार करायला सुरूवात केली!! आमच्या घरमालकिणीला सांगावं म्हटलं तर, तिचा नंबर आमच्याकडे नाही आणि तिचा पत्ता पण माहीत नाही, कारण घराची सगळी व्यवस्था एजंटद्वारेच बघितली जाते! त्याचमुळे गारठलेले हात हातावर चोळत बसण्याशिवाय पर्यायच उरला नव्हता आणि थंडी काय ऐन भरात होती म्हणून सांगू, जणू आम्हांला छळायला तिला आयती संधीच मिळाली होती 🙈😡 एकवेळ कदाचित हं कदाचित, तसं अशक्यच आहे म्हणा, सेंट्रल हिटर शिवाय कसंबसं निभावता येईल पण, गरम पाणीच नाही म्हणजे कहर आहे कहर! उणे तापमानामुळे नळातून पाणी नाही बर्फच यायला लागला. त्यात मला तर अगदी दर मिनीटाला हात धुवायची सवय आहे 😳 एकवेळ ते मी कमी करेन पण स्वयंपाकाची भांडी? ती तर घासावीच लागतात ना!😤 मी हातात ग्लोव्ह्ज घालून भांडी घासते, विसळते पण बर्फाच्या पाण्यापुढे त्या बापड्या ग्लोव्ह्जचाही निभाव लागेना हो 😰😭 बर्फाचे 'चटके' पण बसू शकतात याचा प्रत्यय मला अगदी पहिल्याच दिवशी यायला सुरूवात झाली बघा!!😖 मला मुळातच थंडी जास्त वाजते त्यात ख्रिसमसची थंडी म्हणजे क्या कहने! त्यामुळे मी आता २ ऐवजी ३ ते ४ कपड्यांचे थर अंगावर चढवले आणि घरातली कामं करायला घेतली. संध्याकाळच्या सुमारास एका बाईचा फोन आला, सकाळी जी तक्रार केली होती त्यासाठी तिने संपर्क करुन जुजबी माहिती विचारली आणि 'तक्रार नोंदवून घेतली आहे, तुमचा नंबर आला की इंजिनियरला पाठवलं जाईल', हे सांगून फोन आपटला! झालं! म्हणजे आता आपला नंबर लागणार कधी न कधी येणार तो माणूस, बसा वाट बघत! 😰 नशिबाने हाॅल मधे एक इलेक्ट्रिक चिमणी आहे तिच्या उबेत बसून रात्रीची जेवणं आटपून पहिला दिवस कसाबसा ढकलला. सकाळी जाग आली आणि कालपासून सुरु झालेला गोंधळ आठवून हुडहुडीच भरली, जाऊ दे आज नकोच उठायला म्हणून पांघरूणात परत दडी मारली.😛 पण, काल ज्या बाईने आमची तक्रार नोंदवून घेतली होती तिने मला 'अजून काही माहिती पाठवा', म्हणून फोन केला.मग इच्छा नसतांनाही उठावंच लागलं! त्या डबड्या बाॅयलरचं एक फोटोसेशन केलं आणि एक व्हिडिओ करून झालेला बिघाड सांगितला आणि दिलं पाठवून. त्या माहितीच्या आधारे तिने खर्चाचा अंदाज सांगितला आणि जर तुमच्या हाताने बिघाड झाला असेल तर पैसे द्यावे लागतील हे स्पष्ट केलं. पण आमच्यासमोर असा पेच निर्माण झाला की दुरूस्तीला हो म्हणावं तर घरमालकिणीची परवानगी न-घेता केलं म्हणून ती दंड लावेल(हो आमच्या अॅग्रीमेंट मधे तसं स्पष्ट लिहून दिलंय बाईने!) आणि नाही म्हणावं तर थंडीमुळे आजारी पडायची वेळ यायची!! आता काय करावं बरं? जाऊ देत, या थंडीत मरण्यापेक्षा त्या बाईने सांगितलेला दंड भरलेला चालेल असं म्हणत मी, 'इंजिनियरला लवकरात लवकर पाठव गं बाई', अशी विनवणीच केली. दुस-या दिवशी सकाळी तो इंजिनियर आला आणि त्या डबड्याकडे बघितल्यावर म्हणतो,'हे माॅडेल ३०वर्ष जुनं आहे, आता याचे पार्ट्स कोणीच बनवत नाही आणि चुकून कोणा दुकानदाराकडे असलेच तर ४जानेवरीच्या आधी मिळूच शकत नाहीत!!' इतका मोठा बाँब आमच्यावर टाकून, त्याने शांतपणे ते डबडं तपासलं आणि बाॅयलरच्या मृत्यूवर शिक्कामोर्तब करत निघून गेला!! आता मात्र आम्ही पुरते हादरलो! ४ जानेवारी पर्यंत काहीच होऊ शकत नाही??😳 देवा रेss 😱 नहींsssssssss🤦🤦🤦 श्शी! ह्याला काय अर्थ आहे याssर!!😠🤬😤😤 पण!😨 पण!😰 पण, तेच सत्य होतं आणि त्याचा स्विकार करण्याशिवाय कुठलाच पर्याय उरला नव्हता😞😓 सगळ्यात आधी काय केलं तर एक फॅन विकत आणला. अहो नाही नाही, गरम वारा देणारा फॅन विकत आणला हो. इथे असे गरम हवा देणारे फॅन पण असतात थंडीच्या मोसमात 😊 . छोटुसा असतो तो फॅन, कुठेपण सहज नेऊन लावता येईल असा. तो फॅन आणल्यावर जरा कुठे मला काम करायची 'एनर्जी' म्हणजे अगदी शब्दश: एनर्जी मिळाली.😌 आता ज्या खोलीत काम करायचं त्या खोलीत तो छोटू फॅन लावायचा आणि ५-१०मिनीटांनी वातावरण जरा उबदार झालं की मग काम करायचं असा माझा दिनक्रम सुरु झाला. इथल्या घरांमधे थंडीपासून बचाव करण्यासाठी म्हणून प्रत्येक खोलीत हिटर लावलेला असतो जो गरम पाण्याच्या वाफेने तापवला जातो आणि वातावरण ऊबदार होतं. अगदी न्हाणीघरात सुद्धा लावलेला असतो बरं का. तर आमच्या घरी सुरु झालेल्या या बाॅयलर गोंधळात न्हाणीघराकडे अंमळ दुर्लक्षच झालं आणि हिमालयात गेल्यावर काय अनुभूती येईल याचा आविष्कार दिसायला लागला! बाहेर उणे १ तापमान असेल तर न्हाणीघरात उणे २ पर्यंत मजल पोहोचली, नळ तर बर्फंच बाहेर फेकत होता आणि यासर्वांवर कडी म्हणजे जेमतेम एक लिटर पाणी मंदगतीने तापवून - 'उपकार' म्हणून बाहेर टाकणारा गिझर!🤦🙏 हाय रे कर्मा!!🙈 हात धुणं पण शिक्षा वाटायला लागली होती तिथे आंघोळ म्हणजे तर नकोच!!😳😱 घरातल्या गारढोण वातावरणाने काही म्हणजे काही करावंसं वाटेना, कसाबसा ३१ डिसेंबर साजरा केला. २ तारखेला एजेंटने आणखीन एका इंजिनियर कडून डबड्या बाॅयलरची तपासणी करवून घेतली आणि 'घरमालकिनीला सांगतो', असं म्हणत निघून गेला. ४ तारखेला घरमालकिनीने नविन बाॅयलर बसवायची परवानगी दिली एकदाची आणि आज आमच्या घरात त्याची स्थापना झाली होsss आणि हिमालय वितळू लागला 😌🙏 आता कसं 'गार-गार' नाही नाही 'छान-छान' वाटतंय 😊 😊 #मुक्कामपोस्टUK
Sunday, January 3, 2021
#नवीनदशकाचापहिलाधडा
तुमच्या ओळखीतल्या एखाद्या मुलीने जर, 'माझं लग्न ठरलं 😁' असा मेसेज केला तर तुम्ही अभिनंदन करत साहजिकच, 'कोण आहे मुलगा, काय करतो?', तत्सम प्रश्न विचाराल नं? इथेच चुकलं माझं 🤪🤦 जमाना बदल गया है! आता इतकं सरळ नाही राहिलं हो, काहीच! आपल्या वेळी, आपल्या आधीच्या पिढ्यांच्या काळात हे असं 'रोखठोक'/ 'काळं-पांढरं' करता येत होतं!! आता सगळा 'सावळा' गोंधळ झाला आहे 😐 तेंव्हा यानंतर जर असा मेसेज मला आला तर, 'कोण आहे पार्टनर?' असा एक सरधोपट सवाल केलेला बरा राहिल असं मला वाटतं. तुम्हांला काय वाटतं 🤔 #नवीनदशकाचापहिलाधडा