Saturday, January 9, 2021

#notoplastictoothbrush

 

१,०००,०००,००० = १००करोड टूथब्रश 'दरवर्षी' कच-याच्या डब्यात जातात!! 😳😳😳
ही आकडेवारी गुगलने जगातील सर्वात प्रगत देशाची आहे असं सांगितलं आहे!

मी-तुम्ही अगदी लहानपणी वापरलेला पहिला-वहिला छोट्टूसा टूथब्रश आठवतोय का?😕
तो आजही ३०-३५-४० वर्षं झाली कच-याच्या ढिगात अगदी तस्साच पडून आहे!🤪
कारण प्लास्टिक चे टूथब्रश हे अमरत्व घेऊन जन्माला आलेले असल्याने कच-याच्या ढिगाची शान वाढवायला तिथेच पडून राहतात!🤦

एक साधा टूथब्रश, जो आपण वापरून खराब झाल्यावर कच-याच्या डब्यात टाकून देतो अगदी सहजपणे, तो पूर्णपणे रिसायकल होत नाही!

याबद्दल अनेक पोस्ट्स तुम्ही वाचल्या/बघितल्या असतील पण यावर उपाय काय याचा विचार केला का कधी??🤔

पर्यावरण संवर्धनासाठी झटणाऱ्या लोकांचं म्हणणं आहे की २०२१ पासून सुरु झालेलं हे दशक मानवजातीसाठी शेवटची संधी आहे 'आपलं घर-एकमेव पृथ्वी' वाचवायला!!😐

अकाली पाऊस-अमेझाॅनच्या जंगलातला वणवा-कोरोना ये सब तो ट्रेलर्स है - जागो!! वरना पिक्चर बहोत डरावनी होगी!!!😰

नमनाला घडाभर तेल जाळून झालं, हां तर मुद्दा हा आहे की, आपण सर्वजण एक सवय जर बदलू शकलो तर आपोआप पर्यावरण संवर्धनाला फायदा होईल!

तुमचा प्लास्टिकचा टूथब्रश बदला आणि बांबूचा टूथब्रश विकत घ्या! नाही नाही मी कोणत्याही कंपनीची जाहिरात करत नाही!

मी गेले ६ महिने स्वतः बांबूचा टूथब्रश वापरत आहे.प्लास्टिकच्या ब्रशसारखाच हा ब्रश असतो, वापरायला काहीच अडचण येत नाही! मुख्य म्हणजे याची किम्मत फार अवास्तव नाही आणि लहान-मोठ्या सर्वांसाठी पर्याय उपलब्ध आहेत.

भारतामधे बांबूचं साहित्य बनवणारी bambooindia.com ही कंपनी मला सापडली तुम्ही त्यावरून आॅर्डर करु शकता किंवा 'यात वेगळा रंग नाही का?' असा प्रश्न विचारणा-यांनी अजून पर्याय शोधावेत.😜

आता तुम्ही म्हणाल, बांबूचा टूथब्रश खरंच पूर्णपणे रिसायकल होतो का? तर याचं उत्तर १००% हो, असं फक्त काहीच कंपन्यांच्या बाबतीत म्हणता येईल. कारण, बांबूचा टूथब्रश बनवणा-या बहुतांश कंपन्या, सध्यातरी 'टूथब्रश ब्रिसल्स्-ब्रशचे दात' हे प्लास्टिक पासून बनवत आहेत.त्यामुळे फक्त बांबू वापरलेला भाग पूर्णपणे पुनरुज्जिवीत होऊ शकतो प्लास्टिक नाही!

मग कशाला त्या फंदात पडायचं 😏 , जेंव्हा १००% बांबूचा ब्रश येईल तेंव्हा आम्ही घेऊ😒! - कृपा करुन असा विचार करु नका!!

नाही अख्खा टूथब्रश पण निदान काडी तर रिसायकल होते ना बांबू ब्रशची? निदान तो तरी वापरायला सुरूवात करा!!

मला युके मधे एक कंपनी अशी सापडली आहे जी बांबू पासून बनवलेलेच ब्रिसल्स टूथब्रश वर लावते जेणेकरून तो १००% रिसायकल होऊ शकतो.मी तर बदल केला आहे, तुम्ही कधी सुरु करणार 😃
#notoplastictoothbrush
#usebambootoothbrush

No comments:

Post a Comment