Tuesday, January 5, 2021

#मुक्कामपोस्टUK : आणि हिमालय वितळू लागला!!

  आणि हिमालय वितळू लागला!! . . . . . . . . . . . माझ्या घरातला हो!!
झालं काय की २५ डिसेंबरच्या सकाळी आमच्या घरातला बाॅयलर गतप्राण झाला 🤪
अगदी मुहूर्त शोधून डाव साधला बघा मेल्याने 😭
बाॅयलर बंद पडणे आणि तेही ऐन ख्रिसमसच्या सुट्टीत हा केवढा दैवदुर्विलास 🤯🙈
घरातला सेंट्रल हिटर + गरम पाणी या दोन्ही अत्यावश्यक गोष्टींशिवाय आता पुढचे किती दिवस/महिने काढावे लागतील या नुसत्या विचारानेच माझा थरकाप उडाला आणि -१°से. तापमानात माझ्या कपाळावर बर्फ साचायला सुरूवात झाली!
सगळ्यात आधी मी आमच्या एजंटला फोन लावला पण ख्रिसमसची सुट्टी असल्याने अर्थातच, त्यांचं दुकान बंद 🤦
आता काय करावं म्हणून त्यांची वेबसाईट उघडली आणि अत्यावश्यक सेवा देणारा एक नंबर सापडला.लग्गेच फोन फिरवला, समोरुन एका आजोबासदृश आवाजाच्या माणसाने, 'तुमचा प्रश्न थोडक्यात सांगा आणि आमच्या फोन ची वाट बघा', अशी सुचना दिली.
त्याबरहुकूम मी सगळी रामकथा ऐकवली, फोन ठेवला आणि देवाचा धावा करत ह्या अडचणीला सामोरं कसं जायचं याचा विचार करायला सुरूवात केली!!
आमच्या घरमालकिणीला सांगावं म्हटलं तर, तिचा नंबर आमच्याकडे नाही आणि तिचा पत्ता पण माहीत नाही, कारण घराची सगळी व्यवस्था एजंटद्वारेच बघितली जाते!
त्याचमुळे गारठलेले हात हातावर चोळत बसण्याशिवाय पर्यायच उरला नव्हता आणि थंडी काय ऐन भरात होती म्हणून सांगू, जणू आम्हांला छळायला तिला आयती संधीच मिळाली होती 🙈😡
एकवेळ कदाचित हं कदाचित, तसं अशक्यच आहे म्हणा, सेंट्रल हिटर शिवाय कसंबसं निभावता येईल पण, गरम पाणीच नाही म्हणजे कहर आहे कहर!
उणे तापमानामुळे नळातून पाणी नाही बर्फच यायला लागला. त्यात मला तर अगदी दर मिनीटाला हात धुवायची सवय आहे 😳 एकवेळ ते मी कमी करेन पण स्वयंपाकाची भांडी? ती तर घासावीच लागतात ना!😤 मी हातात ग्लोव्ह्ज घालून भांडी घासते, विसळते पण बर्फाच्या पाण्यापुढे त्या बापड्या ग्लोव्ह्जचाही निभाव लागेना हो 😰😭 बर्फाचे 'चटके' पण बसू शकतात याचा प्रत्यय मला अगदी पहिल्याच दिवशी यायला सुरूवात झाली बघा!!😖
मला मुळातच थंडी जास्त वाजते त्यात ख्रिसमसची थंडी म्हणजे क्या कहने! त्यामुळे मी आता २ ऐवजी ३ ते ४ कपड्यांचे थर अंगावर चढवले आणि घरातली कामं करायला घेतली.
संध्याकाळच्या सुमारास एका बाईचा फोन आला, सकाळी जी तक्रार केली होती त्यासाठी तिने संपर्क करुन जुजबी माहिती विचारली आणि 'तक्रार नोंदवून घेतली आहे, तुमचा नंबर आला की इंजिनियरला पाठवलं जाईल', हे सांगून फोन आपटला!
झालं! म्हणजे आता आपला नंबर लागणार कधी न कधी येणार तो माणूस, बसा वाट बघत! 😰
नशिबाने हाॅल मधे एक इलेक्ट्रिक चिमणी आहे तिच्या उबेत बसून रात्रीची जेवणं आटपून पहिला दिवस कसाबसा ढकलला.
सकाळी जाग आली आणि कालपासून सुरु झालेला गोंधळ आठवून हुडहुडीच भरली, जाऊ दे आज नकोच उठायला म्हणून पांघरूणात परत दडी मारली.😛
पण, काल ज्या बाईने आमची तक्रार नोंदवून घेतली होती तिने मला 'अजून काही माहिती पाठवा', म्हणून फोन केला.मग इच्छा नसतांनाही उठावंच लागलं! त्या डबड्या बाॅयलरचं एक फोटोसेशन केलं आणि एक व्हिडिओ करून झालेला बिघाड सांगितला आणि दिलं पाठवून. त्या माहितीच्या आधारे तिने खर्चाचा अंदाज सांगितला आणि जर तुमच्या हाताने बिघाड झाला असेल तर पैसे द्यावे लागतील हे स्पष्ट केलं.
पण आमच्यासमोर असा पेच निर्माण झाला की दुरूस्तीला हो म्हणावं तर घरमालकिणीची परवानगी न-घेता केलं म्हणून ती दंड लावेल(हो आमच्या अॅग्रीमेंट मधे तसं स्पष्ट लिहून दिलंय बाईने!) आणि नाही म्हणावं तर थंडीमुळे आजारी पडायची वेळ यायची!!
आता काय करावं बरं? जाऊ देत, या थंडीत मरण्यापेक्षा त्या बाईने सांगितलेला दंड भरलेला चालेल असं म्हणत मी, 'इंजिनियरला लवकरात लवकर पाठव गं बाई', अशी विनवणीच केली.
दुस-या दिवशी सकाळी तो इंजिनियर आला आणि त्या डबड्याकडे बघितल्यावर म्हणतो,'हे माॅडेल ३०वर्ष जुनं आहे, आता याचे पार्ट्स कोणीच बनवत नाही आणि चुकून कोणा दुकानदाराकडे असलेच तर ४जानेवरीच्या आधी मिळूच शकत नाहीत!!'
इतका मोठा बाँब आमच्यावर टाकून, त्याने शांतपणे ते डबडं तपासलं आणि बाॅयलरच्या मृत्यूवर शिक्कामोर्तब करत निघून गेला!! आता मात्र आम्ही पुरते हादरलो!
४ जानेवारी पर्यंत काहीच होऊ शकत नाही??😳
देवा रेss 😱
नहींsssssssss🤦🤦🤦
श्शी! ह्याला काय अर्थ आहे याssर!!😠🤬😤😤
पण!😨
पण!😰
पण, तेच सत्य होतं आणि त्याचा स्विकार करण्याशिवाय कुठलाच पर्याय उरला नव्हता😞😓
सगळ्यात आधी काय केलं तर एक फॅन विकत आणला.
अहो नाही नाही, गरम वारा देणारा फॅन विकत आणला हो. इथे असे गरम हवा देणारे फॅन पण असतात थंडीच्या मोसमात 😊 . छोटुसा असतो तो फॅन, कुठेपण सहज नेऊन लावता येईल असा.
तो फॅन आणल्यावर जरा कुठे मला काम करायची 'एनर्जी' म्हणजे अगदी शब्दश: एनर्जी मिळाली.😌
आता ज्या खोलीत काम करायचं त्या खोलीत तो छोटू फॅन लावायचा आणि ५-१०मिनीटांनी वातावरण जरा उबदार झालं की मग काम करायचं असा माझा दिनक्रम सुरु झाला. इथल्या घरांमधे थंडीपासून बचाव करण्यासाठी म्हणून प्रत्येक खोलीत हिटर लावलेला असतो जो गरम पाण्याच्या वाफेने तापवला जातो आणि वातावरण ऊबदार होतं. अगदी न्हाणीघरात सुद्धा लावलेला असतो बरं का.
तर आमच्या घरी सुरु झालेल्या या बाॅयलर गोंधळात न्हाणीघराकडे अंमळ दुर्लक्षच झालं आणि हिमालयात गेल्यावर काय अनुभूती येईल याचा आविष्कार दिसायला लागला! बाहेर उणे १ तापमान असेल तर न्हाणीघरात उणे २ पर्यंत मजल पोहोचली, नळ तर बर्फंच बाहेर फेकत होता आणि यासर्वांवर कडी म्हणजे जेमतेम एक लिटर पाणी मंदगतीने तापवून - 'उपकार' म्हणून बाहेर टाकणारा गिझर!🤦🙏
हाय रे कर्मा!!🙈
हात धुणं पण शिक्षा वाटायला लागली होती तिथे आंघोळ म्हणजे तर नकोच!!😳😱
घरातल्या गारढोण वातावरणाने काही म्हणजे काही करावंसं वाटेना, कसाबसा ३१ डिसेंबर साजरा केला.
२ तारखेला एजेंटने आणखीन एका इंजिनियर कडून डबड्या बाॅयलरची तपासणी करवून घेतली आणि 'घरमालकिनीला सांगतो', असं म्हणत निघून गेला.
४ तारखेला घरमालकिनीने नविन बाॅयलर बसवायची परवानगी दिली एकदाची आणि आज आमच्या घरात त्याची स्थापना झाली होsss
आणि हिमालय वितळू लागला 😌🙏
आता कसं 'गार-गार' नाही नाही 'छान-छान' वाटतंय 😊 😊
#मुक्कामपोस्टUK

No comments:

Post a Comment