Saturday, April 10, 2021

#खाण्यासाठी_जन्म_आपुला : BBQ Style Cajun Potato

  #latepost
#खाण्यासाठी_जन्म_आपुला

आॅफिसच्या काॅल्समधून डोकं वर काढावं, तोवर शुक्रवारची रात्र अवतरलेली असते!
कधी एकदा तो लॅपटाॅप बंद करते असं होऊन जातं आणि मग वाटतं, चला आता काहीतरी खास बनवावं का आज 😃

मग वाटतं, जाऊ देत आज परत काय बनवणार? रोज तिन्ही त्रिकाळ 'काही पण बनव' या जटिल प्रश्नावर काथ्याकूट करत डोक्याचा पार भूगा झालेला असतो 😖
पण तरी 'शुक्रवार'चं एक वेगळं महत्व आहे आम्हा 'आय.टी.' कामगारांच्या आयुष्यात 😜
त्यामुळे कधीही न करुन बघितलेला पदार्थ करायची खुमखुमी निदान चार महिन्यांतून एकदा तरी मला येतेच 😆
तसंच काहीसं मागच्या शुक्रवारी झालं, आम्हांला चार दिवसांची सुट्टी(?) होती म्हणून युट्युब पालथं घालून, शक्य तितक्या 'एक्स्पर्ट शेफ्स'च्या 'रेसिपीज' बघून आणि घरामधे असणाऱ्या सामानात काय बनवता येईल इतका सगळा जामानिमा करुन मी एकदाचा पदार्थ ठरवला!

भारतात असतांना BBQ Nation मधे खाल्लेले दोन-तीन पदार्थ मला प्रचंड आवडतात त्यातलाच एक BBQ Cajun Potato हा प्रकार मी करुन बघायचं ठरवलं!

युट्युब च्या रेसिपी व्हिडिओज मधे मोजून १०मिनीटांत अगदी रसरशीत दिसणारा पदार्थ तय्यार होतो, काश वो मुझे टीव्ही में से सिधा मेरे डायनिंग टेबल पे मिल जाता तो 😍 😍 😍 कल्पनाविलास पुरे!

तर मी त्या Cajun potato च्या असतील-नसतील त्या सगळ्या रेसिपीज बघून घेतल्या आणि दीर्घ श्वास घेत स्वतःला स्वयंपाकघरात घेऊन गेले!🤭

होनं, असं काही वेगळं बनवायचं असेल तर माझा स्वयंपाकातला अजिबात नसलेला काॅन्फिडंस लग्गेच पळूनच जातो बाई 😰

तर, मी काय सांगत होते हं, Cajun potato ची एक त्यातल्या त्यात सोपी रेसिपी मी करायला घेतली. फोन समोर ठेऊन तो व्हिडिओ सुरु केला आणि एकेक साहित्य गोळा करेपर्यंत तो व्हिडिओ संपला पण 🤣🤣

मग काय रिपीट मोड आॅन आणि गोंधळ पण!

सगळ्यात आधी ते पिल्लू बटाटे कुकर मधे एकच शिटी करुन उकडून घेतले. ते गार करायला ठेऊन पुढची तयारी करायला म्हणून - काॅनस्टार्च/काॅर्नफ्लाॅवर आणि मैदा घेतला. जितकं प्रमाण सांगितलं तितकंच घेतलं हं मी🙄 आणि पाणी घालून ते एकत्र केलं पण ते अगदीच पाणीदार झालं 😳 आता काय करू? हे तर व्हिडिओ सारखं बनत नाही मग? थोडा मैदा घालून बघूया, म्हणून त्यात थोडासा मैदा टाकला परत हलवलं पण अजूनही पाणी?दारच!🤔
आता थोडा काॅर्नस्टार्च घालू, हलवू, तरी घट्ट?? नाहीच!🙈
परत मैदा घातला, परत हलवलं आणि ??🤦
हे काय य्यार!!! मी तर योग्य प्रमाणात पाणी घातलं नं, तरी इतकं पाणी का आहे यात??🤯🤯
तिकडे तो व्हिडिओ १५व्यांदा Cajun potato ताटलीत छान सजवून परत एकदा रेसिपी सांगायला सज्ज झाला होता 😜

मी विचार केला जाऊ देत जे जसं आहे तसं, जाऊया पुढे! फार फार तर काय होईल ते पाणीदार जे काही आहे स्लरी की काय ते बटाट्याला चिकटणार नाही, ठीके, चालतंय की 😝

आता या पेक्षा कठीण प्रसंगाला सामोरं जायचं होतं, ते पिल्लू बटाटे त्या मिश्रणामधे घोळवून(ज्याला ते मिश्रण चिकटणं अनिवार्य आहे)तळायचे होते!😳🤫
मी परत एकदा बाह्या सरसावून तय्यार झाले, तेल चांगलं कडकडीत झालं आणि प्रयत्नपूर्वक मी एकेक बटाटा त्या मिश्रणात डूबूक डाबूक करुन तेलात सोडला, हुश्श!
अगदी बघण्यासारखा नजारा होता हों 😝 एखादा बटाटा मिश्रणाला घट्ट धरुन ठेवत होता तर एखादा मिश्रणाच्या तारा हातात घेऊन तेलात तरंगत होता तर एखाद्याने 'तू कोण?' म्हणत मिश्रणाचं आवरण चक्क भिरकावून लावलं होतं 😜
कसं-बसं करत मी ते सगळे बटाटे एकदाचे तळून घेतले आणि सुटका झाली!😤

आता कसं सोपं काम होतं, फक्त मेयोनीज आणि तिखट-मीठ एकत्र करुन जरासं साॅस सारखं बनवून त्या बटाट्यांवर टाकायचं आणि टडाss😘😘
तसं, मेयोनीजने पण जरासा त्रास दिलाचं पातळ व्हायला, पण त्या स्लरीच्या मानाने अंमळ कमीच!🤭
आणि! आणि! आणि!🎉🎊
शेवटी एकदाचे ते BBQ Style Cajun Potato सजूनधजून ताटलीमधे विराजमान झालेss 💃💃💃💃
हा बघा फोटो, छान दिसत आहेत नं 😍😋😋


नविन पदार्थ केला म्हणून आमच्या बल्लवाचार्यांना त्वरित चाखायला दिला, हो नवरा माझ्यापेक्षा चविष्ट स्वयंपाक करतो त्यामुळे त्याची 'एक्स्पर्ट' कमेंट फार महत्वाची असते बाबा पदार्थ फसला की हसला हे ठरवायला 🤭🤭

तर आमच्या बल्लवाचार्यांनी 'हम्म,चांगला झाला आहे',अशी पावती दिली आणि तीन तासांची मेहनत फळाला आली रे देवा 😃👏👏 असं म्हणत मी देवाला हात जोडले 🙏😁😁

त.टी.: युट्यूबच्या व्हिडिओमधे १० मिनिटात होणारा पदार्थ हा कधीच म्हणजे कधीच, निदान माझ्या तरी उभ्या जन्मात मला १०मिनीटात करता येणार नाही 😜 😁

#मुक्कामपोस्टUK
#खाण्यासाठी_जन्म_आपुला
#BBQCajunPotato

No comments:

Post a Comment