Saturday, April 17, 2021

Straight/Hetro couple : A NEW Minority!!

 Disclaimer : I am not at all against anyone's sexual preference & LGBTQ+ community

But being an audience this is my humble request to all the writers & directors of 'Bollywood' especially, to stop portraying each couple in a film/webseries to be either a gay or lesbo!

It's irritating beyond imagination now!!

Can't you write a simple story where a heterosexual couple is shown?? Are such stories outdated?

I understand LGBTQ+ community's stories are required to be shown, to be seen, understood n appreciated!

But are you really showing what their life is like? Or it's just their sex routine n rotation of partners?

I like to watch different content on OTT by investing my time but if you are offering just 1 storyline every now n then, then I am sorry!

I obviously HATE IT!!!😖😖😖😖😖

This bombardment has caused such a weird change in my thinking pattern that, if I am watching any advertisement n see 2 girls then my automatic reaction would be, now they'll kiss each other! Oh crap 🤦

मराठी मधे एक म्हण आहे - अति तिथे माती!

आजवर LGBTQ+ लोकांबद्दल आपल्या समाजात अज्जिबात माहिती नव्हती, त्यांना होणारे मानसिक, शारीरिक त्रास हे वेगळे असू शकतात हे लोकांच्या खिजगणतीतही नव्हतं, म्हणून चित्रपट निर्मात्यांनी त्यांच्यावर बेतलेल्या गोष्टी दाखवायला सुरूवात केली. पण आताशा फक्त त्यांच्या शारीरिक संबंधांबद्दल दाखविणे हाच 'मुख्य' मुद्दा बनत चालला आहे! आणि तो मुद्दा पडद्यावर रंगवण्यासाठी सगळ्या (स्वतःला) दिग्गज समजणा-या कलाकारांची चढाओढ सुरु झाली आहे! असं वाटायला लागलं आहे की प्रत्येक कलाकार फक्त आणि फक्त 'तोच' रोल मिळावा याकडे नजर लाऊन बसला आहे!

तुम्हांला जर 'जनजागृती'च करायची आहे नं समाजामधल्या या लोकांबाबत तर ती जीवनशैली असणाऱ्यांना घ्या ना तुमच्या चित्रपटामधे, वेबसिरिज मधे!

जी 'गंगा' नामक कलाकार झी मराठीच्या माध्यमातून आपल्यासमोर आली आहे तिला तर लोकांनी स्वीकारलं नाही, मारहाण केली!

मग तुम्ही आमच्यावर सतत या गोष्टींचा मारा करुन काही साध्य करु शकला आहात का, यापुढे करु शकाल का??

फक्त शारीरिक संबंध इतकंच आयुष्य नाही त्या लोकांचं! साधी-सरळ माणसं आहेत ती पण!
त्यांच्यापैकी असणारे कित्येक जण प्रयत्न पूर्वक तुमच्या आमच्यासारखं सुख-दुःखाचं आयुष्य जगतात!
पण, ते जर दाखवलं तर TRP कसा मिळेलं नं तुमच्या सिरिअल/वेबसिरीज ला!

याउपर, अधिक काय बोलावे, असो!

- एक हताश प्रेक्षक!!

No comments:

Post a Comment