Monday, November 16, 2009

कुठे तरी हे थांबायला हवं...

माझ्या आई, बाबांच्या लहानपणी जर कोणी बीडि ओढताना दिसलं तर मोठे लोक समजावून सांगत की ही सवय किती वाईट आहे ते!! ते जसे मोठे झाले तसं काहिंनी बीडि, सिगरेट ओढुन बघितली, त्यात त्यांना आनंद वाटला आणि त्यांची ती सवय बनली!

आताच्या काळात तर सर्रास धुम्रपान करतात लोकं, त्यात कॉलेज मधे जाणार्‍या मुलांचं आणि मुलींचं प्रमाण सगळ्यात जास्त आहे.. दुर्दैवाने शाळेतली मुलं सुद्धा त्याच वळणावर जात आहेत..

सिगरेट का ओढायची ह्याचं बहुतेकांना कारण पण माहीत नसेल..

कोणासाठी ती फॅशन आहे..कोणासाठी तो टाईमपास आहे.. कोणासाठी, ती सवय, डोक्याचा ताण कमी करायचं साधन आहे..मात्र जास्तीत जास्त लोकांची आज ती गरज बनलीए..

आधी उत्सुकता म्हणून सिगरेट ओढुन बघितली जाते आणि मग तिचं सवईत रुपांतर कधी होतं ते त्या व्यक्तीला पण कळत नाही..

सगळे जन कानी-कपाळी ओरडून सांगत असतात की smoking is injurious to health..पण काही फरक पडत नाही..उलट ती सवय असणार्याच्यां अश्या प्रतिक्रिया असतात की, एका दिवशी तर वरती जायचच आहे ना मग एक दिवस अजुन कमी झाला तर काय फरक पडणार आहे!!

मैत्रीण,आई,बायको किंव्हा सगळ्यात जवळच्या व्यक्तीने किती जरी सामजाउन सांगितलं तरी जास्तीत जास्त थोडे दिवस ह्या लोकांची सवय बंद होते पण कायमची नाही!!

आजकाल मुली सगळ्याच क्षेत्रात मुलांसोबत खांद्याला खांदा लाउन लढतायेत, मग स्मोकिंग
च्या फील्ड मधे कश्या काय मागे राहतील!! गेल्याच महिन्यात रीडर'स डाइजेस्ट मधे
भारतातलं मुलींचं स्मोकिंग चं प्रमाण वाढल्याचा वाचलं..

जे लोक स्मोक करतात त्यांना स्वत:ची काळजी नसतेच पण दुसर्‍याची पण नसते..passive smoking is dangerous than active smoking!!

गेल्यावर्षी 2 ऑक्टोबर ला एक नवा फतवा निघाला की, सार्वजनिक ठिकाणी जर धूम्रपान केलं तर दंड होईल..
पण आपल्या इथे प्रत्येक नियमाचे जसे 3-13 वाजतात तसंच ह्या पण नियमाचं झालं..
नियम निघाल्याच्या दुसर्‍याच दिवसापासून त्याला धाब्यावर बसवल गेलं..
पाट्या लावल्या गेल्या सगळ्या ऑफिसेस, माल्स, हॉटेल्स मधे पण त्यानेही धूम्रपान करणार्‍या व्यक्तींना कुठे रोख बसला नाही..

एक बाळबोध विचार असा येतो मनामधे की, सरकार तंबाखूच्या पदार्थांवर बंदी का नाही आणत..
त्याच्या विक्रीतून जितका पैसा मिळतो तो एका बाजूला खूप जास्त असेल पण तरुण, कर्तुत्ववान पिढीचं त्याच्यामुळे होणार नुकसान त्या बदल्यात किती तरी पटीने जास्त आहे!!

पण हे सगळं कुठेतरी थांबायलं हवं!!

ज्या व्यक्तिंना व्यसन आहे त्यांनी कुठेतरी हा विचार करायला हवा की, क्षणिक सुखाच्या आहारी जाउन पूर्ण आयुष्य वाया घालवण्यात काही अर्थ नाही, यापेक्षा स्वत:वर जर थोडा ताबा ठेवला तर कदाचीत अश्या व्यसनांपासून सहज मुक्तता मिळू शकते.

देव अश्या लोकांना नीट विचार करण्याची बुद्धि देवो इतकीच आशा आपण ठेउ शकतो.


या ब्लॉग वरील लिखाण कॉ्पीराईट प्रोटेक्टेड आहे, कुठेही पब्लिश करण्यापूर्वी लेखिकेची परवानगी घेणे आवश्यक आहे.
Protected by Copyscape Online Plagiarism Check


Saturday, September 26, 2009

लहानपण देगा देवा..

लहानपण देगा देवा..
शाळेत असताना वाटायचं..कॉलेज मधे कधी जाणार..कॉलेज मधे किती मजा असते...गाडी मिलते..फ़क्त १च वही/ पुस्तक घेउन जायचं..जास्त अभ्यास नाही...खुप खूप मजा करायची..
कॉलेज मधे गेल्यावर वाटायचं..यारर..नोकरी कधी लागणार..इतकं शिकलोयं त्याचा फ़ायदा काय ज़र जॉब नाही मिळाला तर!!
नोकरी लागल्यावर कळतं..पैसा कमावनं काही सोपी गोष्ट नाहिए..बॉस च्या एक्सपेक्टेशन्स..कामाचा प्रेशर..उफ़फ्फ़...
खरचं आपण लहानपणी किती सुखी होतो!!
संत तुकारामांनी खरचं म्हटलय.."लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा"
कित्त्त्त्ती सुख होतं लहाणपणी..जास्त अभ्यास नाही..आई,बाबा,आजी,मामा सगळे जण लाड करणार..
कोणतीही गोष्टं हट्ट केला की मिळायची..मनसोक्तं खेळलं तरी आई जास्त रागवत नव्ह्ती..
खेलीमेलीच्या वातावारणतली स्पर्धा असायची..अभ्यास असो की दूसरं काही..
सगळ्या स्पर्धांमधे भाग घेऊन सुद्धा अभ्यासाचा वेळ वाया जायचा नाही..
सगळं करायला मिळायचं आणि ऑटोमॅटिकली सर्वांगीण विकास व्हायचा!!
2महीने उन्हाळ्याची सुट्टी, 15दिवस दीवाळीची सुट्टी मिळायची :-)
आता तर वीकेंड मिलतो तो पण कामं करण्यात कसा संपतो ते कलत नाही :'-(
कधी घरात लग्न-समारंभ असला की सुट्टी मिलायची मग सगळं सोडून फकत
भाउ-बहीनिंसोबत धम्माल करायची!!
टीव्ही होता पण 1000 चॅनेल्स नव्ह्ते..त्यामुळे इनडोर, आउटडोर गेम्स खेळायला फुल स्कोप होता..
कोणत्याच कारणासाठी शीकवणी लावायाची गरज नव्हती..
आई, बाबा नाहीतर ताई अभ्यास घ्यायची आणी दादा लोकं तर होतेच गेम्स शिकवायला...
कधी शालेत जायचा कंटाळा आला तर खोटं खोटं आजारी पड़ून घरी बस्ता येत होता..
घरी आई आणी शालेत बाई अड्जस्ट करून घ्यायच्या..आता ऑफीस मधे कोन ऐकतय???!!!!

काश...ते दिवस पुन्हा परत आले तर कीत्ति बरं होइल....

पण जसा काळ बदलला आहे तसं लहानपणाच्या सुखात पण बदल झाला आहे..
आज लहान बाळ जेमतेम 2.5 वर्षाचं होत नाही की सुरू होते तयारी त्याच्या इंटरव्यू ची..के.जी.साठी!!!
म लकी की मला डायरेक्ट पी.जी. साठीच इंटरव्यू दयावा लागला..
के.जी. झाला की मग थोडं पूढच्या वर्गात गेल्यावर कंपल्सरी ENGLISH मीडियम च्या आई, बाबांच्या हट्टामुळे त्या बाळाला ट्युशंस ला टाकनार..
घरी आजी, आजोबा तर नसतातच पण आई,बाबा पण नसतात..मग BEST FRIEND IS TV!!!
मैदानी खेल आसू देत की कुठलं वाद्य शिकायच असेल तर लावा क्लास..
कारण आई,बाबाना वेलच नाहीए आणी "हम २ हमारा १" मुळे ताई, दादा पण गायब झाले आहेत..
आई,बाबाना ज़र मातृभाषेतली पुस्तकं वाचायची सवय असेल तरच मूलाना कलतं की मराठी बुक्स पण वाचनिय असतात..
घरात टीव्ही विथ 1000 चॅनेल्स तर असतातच पण कंप्यूटर विथ नेट पण आसतो त्यामुळे मुलं जास्त करून कंप्यूटर गेम्स खेलत असतात..मग डोळ्यांवर लहान वयातचं चष्मा लागतो..
शाळा तर त्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी ईतका अभ्यास देते की त्या दप्तराचं ओझं वाहता वाहता लहानपणीच त्यांना पाठदुखिचा त्रास सुरू झालाय की काय अशी भिति वाटते!!

एक ना अनेक अशा किती गोष्टी बदलल्या आहेत..

हे सगळं बघून वाटतं "लहानपणीचा तरी काळ सुखाचा राहिलाय का??!!!' :-(


या ब्लॉग वरील लिखाण कॉ्पीराईट प्रोटेक्टेड आहे, कुठेही पब्लिश करण्यापूर्वी लेखिकेची परवानगी घेणे आवश्यक आहे.
Protected by Copyscape Online Plagiarism Check

Sunday, August 30, 2009

आवडलेल्या कविता - ३

न्हालेल्या जणू गर्भवतीच्या
सोज्वळ मोहकतेने बंदर
मुंबापुरीचे उजळीत येई
माघामधली प्रभात सुंदर

सचेतनांचा हुरूप शीतल
अचेतनांचा वास कोवळा
हवेत जाती मिसळुनी दोन्ही
पितात सारे गोड हिवाळा !

डोकी अलगद घरे उचलती
काळोखाच्या उशीवरुनी
पिवळे हांडे भरून गवळी
कवाड नेती, मान मोडूनी

नितळ न्याहारीस हिरवी झाडे
काळा वायू हळूच घेती
संथ-बिलंदर लाटांमधुनी
सागर-पक्षी सुर्य वेचती

गंजदार, पांढर्‍या नि काळ्या
मिरविती रांगा अन नारिंगी
धक्क्यावरच्या अजुन बोटी
साखारझोपेमधी फिरंगी

कुठे धुराचा जळका परिमल
गरम चहाचा पट्टी गंध
कुठे डांबरी रस्त्यावरच्या
भुर्‍या शांततेचा निशिगंध

ह्या सृष्टीच्या निवांत पोटी
परंतु लपली सैरवैरा
अजस्त्र धांदल, क्षणात देईल
जिवंततेचे अर्घ्य भास्करा

थांब! जरासा वेळ तोवरी -

अचेतनांचा वास कोवळा;
सचेतनांचा हुरूप शीतल;
उरे घोटभर गोड हिवाळा!

-

कवी : बा.सी.मर्ढेकर

आवडलेल्या कविता - २

कृतज्ञता

पोर खाटेवर मृत्युच्याच दारा
कुणा गरीबाचा तळमळे बिचारा
दूर आई राहिली कोकणात,
सेविकेचा आधार एक हात !

ताप त्याने भरताच तडफडावे.
पाखराने एकले तडफडावे.
हळू गोंजारी सेविका दयाळू
डॉक्टराचे वच शंतवे कृपाळू.

कधी त्याने घ्यावे न मुळी अन्न
कुठे डोळे लाउन बसे खीन्न
आणि डाक्टर येताच गोंजाराया
हाय! लागे तो घळघळा रडाया !

एक दिन तो व्याकुळ फार झला
आणि पुसिलेच त्याने डाक्टरला
''आता दादा, मरणार काय मी हो?''
तोच लागे अश्रुची धार वाहो!

ह्रदय हलूणी डोळ्यात उभे पाणी
तरी डाक्टरची वदे करूण वाणी
दोन गोष्टी सांगून धीर देई
पुन्हा गोंजरून शांतावुन जाई.

रात्र अंधारी माजली भयाण
सोसवेना जीवास आता ताण
हळूच बोलावी बाळ डाक्टराला
तोही धर्मात्मा धाऊनीच आला.

आता बाळाला टोचणार तोच
वेड वासून पाखरू दीन चोच
"नको आता ! उपकार फार झाले!
तुम्ही मजला किती..गोड..वागविले!

भीत..दादा..मरणास मुळी..नाही!
तू..म्ही..आई..!!" बोलला पुढे नाही!
क्षणी डोळे फिरविले बालकाने
आणि पुशिली लोचणे डाक्टराने.

-

कवी : गिरीष

आवडलेल्या कविता - १


या नोकरीत काय काय करावं लागत नाही?
साफसफाई.
वीनकाम.शीवनकाम.सजावट.
स्वयंपाक.
बाळसंगोपन.औषधपाणी.वृद्धसेवा.
हीशोबलेखन.बाजारहाट.खरेदी.
शृंगार.
शीकवणी.पूजा.प्रार्थना.बागकाम.
शांतता आणि सुव्यवस्था.
वाचन.गायन.लेखन.
करमणूक.संस्कृतीरक्षण.
अग्निशमन!
पॅकिंग अँड डिसपॅच.
जनसंपर्क.
वाहतुक.गुंतवणूक.बँकिंग.अर्थकारण.
पर्यावरणव्यवस्था.उर्जाबचत.
नीयोजन.कायदापलन.
इव्हेंट मॅनेजमेंट.
जलसंधारण.
बीनखात्याची सर्व कामं.
व्यवस्थापन.

ही सगळी कामं
वर्षानुवर्षा संभाळणारी व्यक्ती.
खरोखरच ग्रेट असली पाहिजे.
तशी ती आहेच.
तीचे नाव आहे -
गृहीणी

Saturday, August 29, 2009

कौतुकाचे ४ शब्द..


एक गृहस्थं एकदा सांगत होते, ''माझी आई अतीशय उत्तम स्वयंपाक करायची. अख्या पंचक्रोशीत तीचा हात धरणारं कोणी नव्हतं. गावात कोणाकडेही विषेश कार्य असलं, की स्वयंपाकासाठी तीला बोलावलं जायचं.सगळे तीच्या स्वयंपाकाची फार स्तुती करायचे. पण, मरतेवेळी आई मला म्हणाली, "बाळा,आयुष्यभर मी सगळ्या गावाकडून स्तुती ऐकली. पण, तुझे बाबा काही आयुष्यात कधी म्हणाले नाहीत, की तू चांगला स्वयंपाक करतेस म्हणून. त्यांच्याकडून हे चार शब्द ऐकायला मी आयुष्यभर आसुसलेले होते. पण म्हातारा मरेस्तोवर एकदाही हे बोलला नाही. हे शल्यं उराशी घेउनच शेवटी त्या बाई वारल्या!!"

कौतुकाचे ४ गोड शब्द, ते बोलायला ना त्रास पडतो, ना खर्च येतो. पण, प्रामाणीकपणे, वेळच्या वेळी बोलले तर केवढा आनंद नीर्माण होतो. आणि आलळापोटी वा अहंकारापोटी वा उदासीनतेपोटी ते बोलायचा टाळतो , तेंव्हा आपण अकारण किती दुख: नीर्माण करतो!!

असंच वाचलेलं काहितरी

A lady in a faded gingham dress and her husband, dressed in a homespun threadbare suit, stepped off the train in Boston, and walked timidly without an appointment into the Harvard University President’s outer office.
The secretary could tell in a moment that such backwoods, country hicks had no business at Harvard and probably didn’t even deserve to be in Cambridge.
We want to see the president,” the man said softly.
“He’ll be busy all day,” the secretary snapped.
“We’ll wait,” the lady replied.
For hours the secretary ignored them, hoping that the couple would finally become discouraged and go away. They didn’t and the secretary grew frustrated and finally decided to disturb the president, even though it was a chore she always regretted.
‘’Maybe if you see them for a few minutes, they’ll leave,’’ she said to him.
He sighed in exasperation and nodded. Someone of his importance obviously didn’t have the time to spend with them, but he detested gingham dressed and homespun suits cluttering up his outer office. The president, stern faced and with dignity, strutted toward the couple.
The lady told him,”We had a son who attended Harvard for one year. He loved Harvard. He was happy here. But about a year ago, he was accidentally killed. My husband and I would like to erect a memorial to him, somewhere on campus.’’
The president wasn’t touched…..He was shocked.
“Madam,” he said, gruffly,”We can’t put up a status for every person who attended Harvard and died. If we did, this place would look like a cemetery.”
“Oh, no,” the lady explained quickly. ”We don’t want to erect a status. We thought we would like to give a building to Harvard.”
The president rolled his eyes. He glanced at the gingham dress and homespun suit, then exclaimed, “A building! Do you have any earthly idea?
How much a building costs? We have over seven and a half million dollars in the physical buildings here at Harvard.”

For a moment the lady was silent. The president was pleased. Maybe he could get rid of them now.

The lady turned to her husband and said quietly, “Is that all it costs to start a university? Why don’t we just start our own?’’

Her husband nodded. The president’s face wilted in confusion and bewilderment.
Mr. and Mrs. Leland Stanford got up and walked away, traveling to Palo Alto, California where they established the university that bears their name, Stanford University, a memorial to a son that Harvard no longer cared about.
You can easily judge the character of others by how they treat those who they think can do nothing.

Saturday, August 15, 2009

कधीतरी वेडयागत - संदिप खरे


कधीतरी वेड्यागात.. हा संदीप खरे यांच्या कवितांचा एक खास कार्यक्रम आहे..मुंबई मधे जो पहिला कार्यक्रम झाला तो मी अटेंड करू शकले :-)
संदीप खरे आता आपल्याला परिचित व्यक्ती आहे त्यामुळे कविता कश्या होत्या कार्यक्रमातल्या हा प्रश्नच उरत नाही..
या कार्यक्रमाचं वेगळेपण म्हणजे सगळ्या कविता संदीप, मधुरा वेलणकर आणि विभावरी देशपांडे यांनी नृत्याद्वारे सादर केल्या आहेत..
कुठला एकच विषय किंव्हा एखादी गोष्ट त्यातून उभी नाही राहत पण कविता + परफॉर्मन्स यांचा मेल खूप सही घातलाय त्यामुळे कुठेही कंटाळा येत नाही..
मला सगळ्यात जास्त मोर्चा, लव लेटर, रंग तुझा राधे, मनाचे श्लोक ह्या कविता आवडल्या..
मनाचे श्लोक ह्या कविते मधे, आपण आपल्या बुद्धीला पटलेल्या गोष्टी मनाला कशा पटउन देतो ह्याचं सुंदर चित्रं उभं केलं आहे..त्यातला शब्द न शब्द खरा आहे आणि आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात आपण अगदी तसच वागतो..
बाकी मोर्चा आणि लव लेटर ह्या आधीपासून माहीत असलेल्या कवीतांना सादरीकरणाची झालर इतकी सुंदर चढवली आहे की आपण त्या कविता खरोखर जगतो..
राधे रंग तुझा गोरा ह्या कवितेमधे मधुरा वेलणकर ने परफॉर्म केलंय आणि विभावरीने ती म्हटली आहे..
३ तास हा कार्यक्रम आपल्याला कुठल्यातरी वेगळ्याच विश्वाची सफर करून आणतो..
पण शेवटची कविता आपल्याला कुठेतरी विचार करायला भाग पाडते..वेडयागात कधीतरी वागायला हवे..लहानपणापासून आपल्याला प्रत्येक गोष्ट करतांना शिकवलं जातं की, ही गोष्ट अशीच करायची, ती गोष्ट तशीच करायची..आणि आपण जर चुकुन थोडं वेगळं करायला गेलो की लगेच आवाज कानावर येतो..'वेडयासारखं करू नकोस, हे काम असं नाही तसं करायचं!!' ..कधी विचार केलाय का..का नाही वागायचं वेडयासारखं..का कायम एखादया चाकोरी मधुनच चालायचं..का नाही घ्यायचा मोकळा श्वास!! कधीतरी वेडयागात वागायला काय हरकत आहे?? वय कितिपण वाढलं तरी आपल्या मधे एक लहान मूल लपलेलं असतं मग त्याला कधीतरी डोका वर काढू दयाना..
बाहेर पाउस पडतोय आणि आपण ऑफीस मधे बसून तो फक्त बघतोय..या पेक्षा कधीतरी बाहेर जाऊन चिंब ओलं व्हयायला काय हरकत आहे..
एखादं खूप छान पुस्तक आपलं बर्‍याच दिवसांपासून वाचायचं डोक्यात असतं पण रोज़ रोज़ च्या कामामुळे नाही जमत..मग कधीतरी एखादया संध्याकाळी सगळं सोडून वाचत बसा ना ते पुस्तक..
असंच मनात आलं म्हणून काहीही प्लॅनिंग न करता कुठेतरी भटकायला जा..
ह्या सगळ्या गोष्टी फक्त आपण मानातच ठेवतो, वेळ नाही या कारणाखाली किंव्हा कधी कधी अती विचार करण्याच्या सवईमुळे
..पण मनात आलेली एखादी गोष्टा करून तर बघा..
थोडा काळ का होईना खरं आयुष्य जगल्याचा अनुभव येईल..थोडं वेडयागत वागूण बघा..



या ब्लॉग वरील लिखाण कॉ्पीराईट प्रोटेक्टेड आहे, कुठेही पब्लिश करण्यापूर्वी लेखिकेची परवानगी घेणे आवश्यक आहे.
Protected by Copyscape Online Plagiarism Check

राजमाची - एक अविस्मरणीय अनुभव





धूक्यातून जाणारी वाट..हिरवागार निसर्ग..पाउलवाटेवर खळाळत जाणारे छोटे झरे...हे सगळं जर अनुभवायचं असेल तर राजमाची ला जरूर भेट द्या..
मला ट्रेक करायला खूप आवडतं..आणि अगदी भर पावसाळ्यात मला राजमाची ला जायची संधी मिळाली..
राजमाची ला जाण्यासाठी 2 रस्ते आहेत..एक तुंगर्ली गावातून आहे आणि दुसरा कर्जत हून..जर तुम्ही सराईत ट्रेकर नसाल तर हा रस्ता अगदी योग्य आहे तुमच्यासाठी..
जाताना आम्ही तुंगर्ली च्या रस्त्याने निघालो..सुरुवातीचा १-२किमी चा रस्ता सोडला तर पुढे पूर्ण वाट ढगातून जाते..१६किमी चा हा पूर्णा रस्ता आहे..
निसर्ग बघत बघत, पाउस अंगावर झेलत आम्ही चालायला सुरूवात केली..प्रत्येक झ-या जवळ थांबून पाणी खेळावं की समोर दिसणारं दृष्य डोळ्यात सामाउन घ्यावा हेच कळत नव्हतं...
क्षणा क्षणाला नवीन काहितरी दिसत होतं..अचानक खूप काळे ढग समोर यायचे तर दुस-या डोंगरावर उन दिसायचं...
हे सगळं बघत बघत आम्ही पुढे चालत होतो आणि एका वळणावर आम्हाला निसर्गाचा एक चमत्कार दिसला..
आजपर्यंत सगळ्यांनी फक्त वॉटर फॉल बघितला आहे पण आम्ही पाणी वर उडताना बघितला!!
वा-याचा वेग इतका जास्त होता की डोंगरावरून पाणी खाली पडुच शकत नव्हतं..
खूप मजा आली ते बघताना..
हा रस्ता बर्‍यापैकी सपाट आहे त्यामुळे पटापट पुढे चालता येतं..
जितका जास्त पाउस पडला असेल तितके मोठे धबधबे बघायला मिळतात..आणि मोठे ओहोळ सुद्धा..
आम्ही मग मजल-दरमजल करत असेच पुढे जात होतो आणि एके ठिकाणी आम्हाला कोणत्या रस्त्याने जावं हे कळत नव्हतं..
आम्हाला कधी इतकं चालायची सवय नाही त्यामुळे १०किमी झाल्यावर सगळ्यांना थकवा आला पण एकमेकांना आधार देत देत आम्ही पुढे जात होतो..
पण जेंव्हा रस्ता समजेना तेंव्हा काहिजण म्हणाले चला परत जाउ,
इथून पुढे उगाचच कुठे भटकलो तर बाहेर येणं खूप अवघड होईल..
दुसरा विचार हा पण आला की इतक्या दूर आलो आहोत तर असं अर्ध्या वाटेवरून परत नाही फिरायचं, बघू, रस्ता चुकलो तर चुकलो पण जायचच!!
आणि आमचा पुढचा प्रवास सुरू झाला..सारखा पाउस सुरू असल्यामुळे खूप चिखल झाला होता सगळीकडे..तरीही वाट काढत..एकमेकांना आधार देत..मधेच कुठेतरी फोटो काढत काढत आम्ही जात होतो..
अचानक आम्हाला खूप जोरात पाण्याचा आवाज यायला लागला..आम्ही पुढे जात होतो तर तो आवाज आणखीनच वाढला..थोड्याच वेळात आमच्या समोर एक खूप मोठा ओढा आम्हाला दिसला..
पाणी जास्त खोल नाहीये त्या ओढयाला पण वेग खूप आहे पाण्याला..
हा शेवटचा टप्पा राजमाची च्या रस्त्यावरचा..
ओढा ओलांडलात की अगदी अर्ध्या तासात तुम्ही राजमची ला पोहचता..
आम्ही सगळ्यांनी ओढा ओलांडला आणि अगदी हायसं वाटलं की चला आता अजून थोडाच वेळ आणि आपण ठरवलेल्या ठिकाणी पोहचणार..
थोड्याच वेळात आम्ही सपाट जागेवर आलो आणि समोरचा देखावा बघून डोळ्याचे पारणे फिटले..
3 मोठे मोठे धबधबे कोसळत होते..पांढरं शुभ्रं पाणी खळखळ आवाज करत वाहत होतं..
दाट धुकं पसरलं होतं..धुकं कसलं ढगच होते ते..हे ३ धबधबे बघितल्यावर इतक्या सगळ्या कष्टाचं चीझ झाल्यासारखं वाटलं..
खूप खोल दरी आहे समोर आणि त्यात ढगांचा लपंडाव सुरू होता..
पाउस सुरू झाला आणि आम्ही सगळे चिंब भिजत भिजत एका टपरीवर आलो..गरमा गरम मक्याचं कणिस तिथे मिळालं आम्हाला..मग काय अगदी सगळे तुटून पडलो त्यावर..
राजमाची ला एकदा पोहोचलो की तिथे राहायची व्यवस्था खूप स्वस्तात आणि मस्त होते..
तिथे उंबरे नावाचे लोक राहतात ज्यांचे साधारण 20 घरं आहेत..तेच तुमची खाण्या,पिण्याची व्यवस्था करतात..
आम्ही पण असच एका काकांकडे राहायला गेलो..घर तर एकदम जुन्या पद्धतीचं बांधलेलं पण खूप उबदार होतं..वीज (इलेक्ट्रीसिटी), मोबाइल असे प्रकार तिथे चालत नाहीत..पाणी आहे कारण पावसाळ्यात सारखा पाउसच पडत असतो..
आम्ही खूप थकलो होतो आणि त्या काकानी आम्हाला मस्त भाकरी,पिठलं जेवायला दिलं..चुलिवरची खरपूस भाजलेली भाकरी आणि पिठलं मिळायला नशीब लागतं..
राजमाची ला २ गड आहेत, श्रीवर्धन आणि मनोरंजन..कालभैरवाचं मंदीर आहे जिथून दोन्ही गडांसाठी रस्ते जातात..
श्रीवर्धन उजवीकडे आहे आणि मनोरंजन डावीकडे..
दुस-या दिवशी सकाळी आम्ही निघालो गड बघण्या करता..गडाचा रस्ता बर्‍यापैकी कठीण आहे आणि वा-याचा वेग खूप जास्त असल्याने वरती जायला खूप त्रास होतो..
वरती चढताना एकच विचार सगळ्यांच्या डोक्यात येत होता..आज चढायला निदान रस्ता तरी आहे..ज्या काळात हा गड बांधला असेल तेंव्हा लोक घोड्यांवर कसे येत असतील..खरंच शिवाजी महाराज खूप ग्रेट होते..
गडावर जातांना सगळीकडे लुसलुशित गवत दिसत होतं..हिरव्या रंगाचे इतके शेड्स मी आजपर्यंत कधीच बघितले नव्हते..
अगदी ढग हातात घेऊन पाउस कसा पडतो ते गडावर पोहचल्यावर आम्हाला बघायला मिळाला..खूप मजा आली..
गड बघून झल्यावर आम्ही परतीचा प्रवास कर्जत च्या रस्त्याने करायचा ठरवला..
आमच्या सगळ्यांकडे ओझं बरच होतं आणि रस्त्याचा अजिबात अंदाज नव्हता..
गावक-यांना विचारून तर निघालो पण जेंव्हा खरोखर त्या रस्त्याने उतरत होतो तेंव्हा खूप वाट लागली..खरा ट्रेक कशाला म्हणतात ते कळत होतं...
सगळीकडे चिखलामुळे निसरडॆ झालेले दगड आणि त्यातून जाणार्‍या वाटा..कुठे कुठे तर माणूस जेम तेम एक पाय ठेऊ शकेल एव्हढाच रस्ता होता..
कुठे काटेरी झाडं डोळ्यासमोर येत होते तर कुठे पाय घसरत होता..पण मजा पण तितकीच येत होती..असं करत करत आम्ही पुन्हा एकदा एका ओढयाजवळ आलो..जो शेवटचा टप्पा होता खाली उतरतांनाचा..मनसोक्त पाण्यात खेळलो..उडया मारल्या..खूप मजा केली आणि शेवटच्या टप्प्यावरचा प्रवास सुरू केला...
शारीरिक थकवा खूप आला होता पण मन खूप ताजंतवानं झालं होतं..
खूप खूप मजा करून आम्ही मुंबईला परत आलो..
दुस-या दिवशी रस्त्यावरून चालताना सुद्धा भास होत होते की वरती कुठेतरी डोंगर दिसेल..झरा दिसेल..आपण धूक्यातून चालतोय..
रोजच्या धका-धकीच्या जीवनाला कुठेतरी एक स्वल्पविराम देऊन राजमाची ला भेट देऊन याच..

chk out here nature's wonder : http://www.youtube.com/watch?v=R5IA5_Uj4vI


या ब्लॉग वरील लिखाण कॉ्पीराईट प्रोटेक्टेड आहे, कुठेही पब्लिश करण्यापूर्वी लेखिकेची परवानगी घेणे आवश्यक आहे.
Protected by Copyscape Online Plagiarism Check