कधीतरी वेड्यागात.. हा संदीप खरे यांच्या कवितांचा एक खास कार्यक्रम आहे..मुंबई मधे जो पहिला कार्यक्रम झाला तो मी अटेंड करू शकले :-)
संदीप खरे आता आपल्याला परिचित व्यक्ती आहे त्यामुळे कविता कश्या होत्या कार्यक्रमातल्या हा प्रश्नच उरत नाही..
या कार्यक्रमाचं वेगळेपण म्हणजे सगळ्या कविता संदीप, मधुरा वेलणकर आणि विभावरी देशपांडे यांनी नृत्याद्वारे सादर केल्या आहेत..
कुठला एकच विषय किंव्हा एखादी गोष्ट त्यातून उभी नाही राहत पण कविता + परफॉर्मन्स यांचा मेल खूप सही घातलाय त्यामुळे कुठेही कंटाळा येत नाही..
मला सगळ्यात जास्त मोर्चा, लव लेटर, रंग तुझा राधे, मनाचे श्लोक ह्या कविता आवडल्या..
मनाचे श्लोक ह्या कविते मधे, आपण आपल्या बुद्धीला पटलेल्या गोष्टी मनाला कशा पटउन देतो ह्याचं सुंदर चित्रं उभं केलं आहे..त्यातला शब्द न शब्द खरा आहे आणि आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात आपण अगदी तसच वागतो..
बाकी मोर्चा आणि लव लेटर ह्या आधीपासून माहीत असलेल्या कवीतांना सादरीकरणाची झालर इतकी सुंदर चढवली आहे की आपण त्या कविता खरोखर जगतो..
राधे रंग तुझा गोरा ह्या कवितेमधे मधुरा वेलणकर ने परफॉर्म केलंय आणि विभावरीने ती म्हटली आहे..
३ तास हा कार्यक्रम आपल्याला कुठल्यातरी वेगळ्याच विश्वाची सफर करून आणतो..
पण शेवटची कविता आपल्याला कुठेतरी विचार करायला भाग पाडते..वेडयागात कधीतरी वागायला हवे..लहानपणापासून आपल्याला प्रत्येक गोष्ट करतांना शिकवलं जातं की, ही गोष्ट अशीच करायची, ती गोष्ट तशीच करायची..आणि आपण जर चुकुन थोडं वेगळं करायला गेलो की लगेच आवाज कानावर येतो..'वेडयासारखं करू नकोस, हे काम असं नाही तसं करायचं!!' ..कधी विचार केलाय का..का नाही वागायचं वेडयासारखं..का कायम एखादया चाकोरी मधुनच चालायचं..का नाही घ्यायचा मोकळा श्वास!! कधीतरी वेडयागात वागायला काय हरकत आहे?? वय कितिपण वाढलं तरी आपल्या मधे एक लहान मूल लपलेलं असतं मग त्याला कधीतरी डोका वर काढू दयाना..
बाहेर पाउस पडतोय आणि आपण ऑफीस मधे बसून तो फक्त बघतोय..या पेक्षा कधीतरी बाहेर जाऊन चिंब ओलं व्हयायला काय हरकत आहे..
एखादं खूप छान पुस्तक आपलं बर्याच दिवसांपासून वाचायचं डोक्यात असतं पण रोज़ रोज़ च्या कामामुळे नाही जमत..मग कधीतरी एखादया संध्याकाळी सगळं सोडून वाचत बसा ना ते पुस्तक..
असंच मनात आलं म्हणून काहीही प्लॅनिंग न करता कुठेतरी भटकायला जा..
ह्या सगळ्या गोष्टी फक्त आपण मानातच ठेवतो, वेळ नाही या कारणाखाली किंव्हा कधी कधी अती विचार करण्याच्या सवईमुळे
..पण मनात आलेली एखादी गोष्टा करून तर बघा..
थोडा काळ का होईना खरं आयुष्य जगल्याचा अनुभव येईल..थोडं वेडयागत वागूण बघा..
या ब्लॉग वरील लिखाण कॉ्पीराईट प्रोटेक्टेड आहे, कुठेही पब्लिश करण्यापूर्वी लेखिकेची परवानगी घेणे आवश्यक आहे.
Wow, Pu...did not know you had such an emotional inclination towards poetry. Great narration. Keep up with the blog writing :)
ReplyDelete