आपल्या आयुष्यात पहिलं असं काहितरी जे घडतं त्याला किती महत्त्व असतं नाइ...
आपल्याला कळायला लागल्यानंतर साजरा झालेला पहिला वाढदिवस...
आपली पहिली शाळा...
पहिली मैत्रिण किंवा मित्र...
पहिलं मिळालेलं बक्षिस...
प्रत्येक पावसाळ्याच्या सुरूवातीला अनुभवलेला पहिल्या पावसाचा पहिला थेंब...
कोल्हापुरच्या महालक्ष्मीच्या मुखकमलावर पडलेलं सूर्याचं पहिलं किरण...
नविन वर्षाचा पहिला दिवस...
शाळा-कॉलेजात आवडलेली पहिली व्यक्ती...
सुचलेली पहिली कविता...
पहिलं प्रेम...
कॅम्पसमधुन लागलेली पहिली नोकरी...
आईच्या हातावर ठेवलेला पहिला पगार...
आवडत्या हिरो किंवा हिरोईनचा फस्ट डे फस्ट शो बघितलेला सिनेमा...
वर्तमानपत्रात किंवा कुठेही प्रसिद्ध झालेला पहिला लेख किंवा ब्लॉग...
घरात आलेलं पहिलं बाळ...
पहिला अपघात (अर्थात, त्या अपघातामधुन पूर्णपणे बरं वाटल्यावर )...
आपण लावलेल्या रोपटयाला आलेली पहिली कळी...
स्वयंपाक शिकुन यशस्वीपणे बनविलेला पहिला पदार्थ...
स्वकमाईतून घेतलेलं पहिलं घर...
पहिली गाडी...
ह्या आणि अशा असंख्य गोष्टी आपल्या आयुष्यात पहिल्यांदा येतात आणि आपल्या मनावर छाप सोडून जातात, तर कधी आयुष्यही बदलून जातात.कधी-कधी काही कडू अनुभवही पहिल्यांदाच येतात पण अशा गोष्टींमधुनच तर आपण शिकत पुढे जाउ शकतो...
या ब्लॉग वरील लिखाण कॉ्पीराईट प्रोटेक्टेड आहे, कुठेही पब्लिश करण्यापूर्वी लेखिकेची परवानगी घेणे आवश्यक आहे.
या ब्लॉग वरील लिखाण कॉ्पीराईट प्रोटेक्टेड आहे, कुठेही पब्लिश करण्यापूर्वी लेखिकेची परवानगी घेणे आवश्यक आहे.
Priyanka!!!! ur Simply great>>>
ReplyDeletekhup chann lihetes...me pan mazi paheli list liheto...keep it up...realy wounderful!!!!
प्रियांका,
ReplyDeleteआणि मी पहिल्यांदाच येथे ह्या ब्लॉगला भेट देतोय,छान आहे.... ह्या आणि अशा असंख्य गोष्टी आपल्या आयुष्यात पहिल्यांदा येतात आणि आपल्या मनावर छाप सोडून जातात :)
शुभेच्छा सह!
true :-)
ReplyDeleteधन्यवाद तुम्हां सगळ्यांच्या प्रतिक्रियांबद्दल
ReplyDelete