Wednesday, February 8, 2012

सा.सू. - भाग ६


त्यानंतर घरात तणावपूर्ण शांतता नांदत होती, आम्ही सगळे नियम काटेकोरपणे पाळत होतो आणि काकू नेहमीप्रमाणे आम्ही कधी चुकतो आणि त्या कधी ओरडतात ह्याचा चान्स शोधत होत्या पण, आता आम्हांला हा टॉम-न-जेरीचा खेळ खेळायला वेळ आणि इंटरेस्ट नव्हता.कॉलेजमधे फायनल एक्झाम जवळ आली होती आणि आम्ही स्वत:ला अभ्यासात पूर्णपणे गाडून घेतलं होतं.

पण, जसा अभ्यास जोरात सुरू होता तसंच नविन घराचा शोधही, आमची ५ महिन्यांची सक्तमजुरीची सजा संपत आली होती.आम्ही मित्र-मैत्रिणींना सांगून ठेवलं होतं आणि वेळात वेळ काढून पेईंग गेस्ट च्या जागा बघून येत होतो.ज्या दिवशी पहिली जागा बघितली त्या दिवशी संध्याकाळी घरी येतांना का काय माहित पण खूप धाकधूक वाटत होती, सारखं वाटत होतं की, काकूंना कळालं तर आपल्याला रागावतील.पण आश्चर्य म्हणजे माझी भिती खोटी ठरली आणि काकू काही बोलल्या नाहीत.

ब-याच जागा बघितल्यानंतर आम्ही एका आजींकडे जागा फायनल केली आणि अगदी बिनधास्त झालो.मग अभ्यासावर पूर्णपणे कॉन्सनट्रेट करायला लागलो.शेवटच्या दोन पेपर्सआधी रूमी म्हणाली की,’ काकू को बताना होगा क्या हम लोग नेक्स्ट इयर नही आयेंगे वो?’ मी म्हणाले, ’अरे, वैसे तो बतानेकी जरूरत नही है क्योंकी उन्होने ऑलरेडी हमे स्टार्टिंग मे कहा था, अगर कन्टिन्यू करना है तो नेक्स्ट इयर आके चेक करो अगर जगाह खाली है तो फिर रहने के लिये आ जाना,सो आय डोन्ट थिंक वी हॅव टू टेल हर.’ तिला ही ते पटलं.

दुस-या दिवशी नेहमीप्रमाणे रात्री ८.३०ला आम्ही जेवायला बसलो आणि काकूंना भांडायची हुक्की आली. मी तर शांतपणे जेवायच ठरवलं होतं, कारण मला अजिबात आवडत नाही जेवतांना कोणी वाद घातलेला.
तर त्यांनी सुरू केलं, ’पुढच्या वर्षी मला नाही वाटत मी तुम्हांला ठेउन घेइन ते,तुम्हांला अजिबात शिस्त नाहीये,मी आहे म्हणून तुम्हांला सांभाळून घेतलं जर दुसरं कोणी असतं तर कधीच तुम्हांला जायला सांगितलं असतं.’ बाsपरे! हे म्हणजे चोराच्या उलटया बोंबाच सुरू होत्या, म्हणे मी सांभाळून घेतलं उलट आम्ही कायम तुमचं ऎकलं, कधीही जास्त वाद घातला नाही, भांडण वाढवलं नाही आणि तुमच्याकडे पुढच्या वर्षी काय, अजुन एक मिनीटदेखील थांबायची इच्छा नाहीये इथे आमची! माझं सगळं मौन स्वगत सुरू होतं.
कसंबसं जेवण आटोपलं आणि मी माझ्या खोलीत येउन बसले.आजपर्यंत इतकं तिखट,चमचमीत जेवण मी कधीच जेवले नव्हते,छातीत एकदम जळजळ व्हायला लागली आणि मी शेवटी रडायला सुरूवात केली,आज १० महिने मी ह्या जेलमधे काढले पण कधी डोळ्यात पाणी नाही येउ दिलं पण आज माझा पेशन्स संपला होता.मग मी ठरवलं काहीही झालं तरी मी उद्या सकाळीच ह्या घरातून बाहेर पडणार,काहीही झालं तरी!

रात्री सगळा अभ्यास पूर्ण करून मी लगेच माझ्या बॅग्स भरायला सुरूवात केली तशी माझी रूमी एकदम चमकलीच, मी तिला सांगितलं की मी उद्या पेपर झाल्यावर लगेच जाणार आहे.तिला काही कळेना काय करावं ते, कारण तिची ट्रेन परवा पहाटे होती,मग आम्ही प्लॅन केला की दुस-या मैत्रिणीच्या फ्लॅटवर सामान उद्याच नेउन टाकायचं, रूमी तिच्याकडेच राहणार आणि मी घरी जाणार.त्यानंतर दोघींनी भराभर पॅकिंग कम्प्लीट केलं, काकूंचं कपाट अगदी स्वच्छ करून ठेवलं आणि झोपलो, अगदी खुश होउन, येस्स आजची ही शेवटची रात्र ह्या जेलमधली :-) :-)

दुस-या दिवशी सकाळी लवकर उठुन दोघींनीपण आवरून सामान घेउन बाहेर पडायचं ठरवलं होतं पण अचानक काकूंनी आवाज दिला,मला पुन्हा एकदा भिती वाटली,पुन्हा एकदा काकू वाद घालणार,काल त्यांचं पोट भरलं नव्हतं बहुतेक! थोडं वैतागतच आम्ही किचनमधे गेलो.तिथे काकू अगदी शांतपणे उभ्या होत्या, त्यांच्या चेह-यावर भांडण करण्याचे हावभाव अजिबात नव्हते,मला काही कळेना.
त्यांनी बोलायला सुरूवात केली, ’काल माझं चुकलचं गं पोरींनो, मी उगाच खुप बोलले तुम्हांला दोघींना.आय अ‍ॅम सॉरी गं, तुम्ही इथे राहू शकता, माझी काही हरकत नाहीये!’.
मी एकदम चक्रावूनच गेले, ये क्या हो रहा था? अचानक रात्रीतून काकूंना कोणत्या देवाने बुद्धी दिली आणि हा चमत्कार झाला?? काकू चक्क आम्हांला सॉरी म्हणत आहेत? काहीतरी काळंबेरं आहे ह्यामधे नक्कीच. माझ्या लगेच लक्षात आलं की, जर आम्ही दोघी निघून गेलो तर त्यांचं चांगलच नुकसान होणार आहे आणि आम्ही कानाखालच्या होतो म्हणून निभावून नेलं पण दुसरं कोणी आलं तर त्यांचं काही ऎकुन घेणार नाही, हां हेच कारण असणार म्हणूनच आज इतके गोड शब्द ह्या कारल्याच्या तोंडून निघत आहेत पण, मी माझ्या निर्णयावर ठाम होते,काहिही झालं तरी मी ह्यापुढे इथे राहणं शक्यच नव्हतं.
मी मग काकूंना सांगणार तेवढयात रूमी म्हणाली,’काकू, आप सॉरी मत कहिये प्लीज.हमारी मजबूरी है, हम यहां पे नही रेह सकते नेक्स्ट इयर.’ मी मनामधे एकदम मिठीच घातली माझ्या रूमीला आणि लगेच तिचं वाक्य पुढे कन्टिन्यू केलं, ’काकू आम्हांला दोघींना पुढच्या वर्षीपासून कम्प्युटर लागणारच आहे, आपल्या रूममधे दोघींचे कम्प्युटर्स मावणार नाहीत आणि लाईटबिल पण खुप येइल तेंव्हा आम्ही इथे काही परत येणार नाही’ आणि मी तिथुन माझ्या खोलीत आले. रूमी अजुन तिथेच उभी होती, काकू काहितरी बडबडत होत्या पण, मी अजिबात लक्ष नाही दिलं आणि सामान उचलुन बाहेर गेले, रूमीला एकदाच आवाज दिला ती पण लगेच सामान घेउन धावत आली आणि आम्ही त्या घराच्या छोटयाशा गेटमधून कायमचं बाहेर पडलो!!  

-----------------------------------------------------------------------------------------------------------

मला अजूनही अगदी व्यवस्थित आठवतय माझी छाती कित्ती धडधडत होती त्या दिवशी सामान घेउन त्या गेटच्या बाहेर पडतांना, त्या लेनच्या बाहेर पडल्यानंतर मात्र इतकं रिलॅक्स फील झालं ना,अगदी स्वर्ग गाठल्यासारखं वाटलं मला.

पण, आज ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केल्यावर वाटतं की, काकूंनी फोर्सफुली म्हणा पण आम्हांला त्यांच्या सूचनांमधून,नियमावलीतून एक शिस्त लावली ज्याचा मला अजुनही खुप फायदा होतो. काकू जे पण टेन्शनवाले प्रसंग आमच्यासमोर टाकत होत्या त्यातही आम्ही दोघी काहितरी चांगलं,आमच्यासाठी उपयोगी असं शोधायचो ज्यातून कुठेतरी लाईफ चा एक फंडा मला नव्याने कळाला,कांईड ऑफ स्ट्रेस मॅनेजमेंट ट्रेनिंग वी हॅड इन दोझ टेन मंथ्स....
आत्ता मी त्या परिस्थितीमधून बाहेर आले आहे म्हणून मला असे छान छान विचार सुचत आहेत 
पण, खरं सांगू, 
माझ्या नशिबात ख-या सासूचा छळ असेल-नसेल माहित नाही पण, सासूरवास काय असतो ह्याचा व्यवस्थित अनुभव मात्र मी त्या १० महिन्यांमधे घेतला.

समाप्त

या ब्लॉग वरील लिखाण कॉ्पीराईट प्रोटेक्टेड आहे, कुठेही पब्लिश करण्यापूर्वी लेखिकेची परवानगी घेणे आवश्यक आहे.
Protected by Copyscape Online Plagiarism Check

No comments:

Post a Comment