अगदी मनाला चटका लावणारं पुस्तक आहे ,व.पुं ची तगमग शब्दागणिक जाणवते, स्वत: च्या वडिलांना ते वेळेत ओळखू शकले नाही, त्यांना जेव्हां आवशकता होती तेव्हां व.पु. मदत करू शकले नाही ह्या सगळ्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे.
तसच वडिलांच्या कष्टाला न-मिळालेल्या मोबादल्याबद्दलचा रागही त्यांनी व्यक्त केला आहे.
व.पुं च्या नेहमीच्या साध्या-सरळ भाषेतून त्यांनी अण्णा (श्री. पुरुषोत्तम श्री. काळे) आपल्यासमोर उभे केले आहेत, खरतर व.पुं.नि स्वगतच केलं आहे ह्या पुस्तकात, हे चरित्र वगैरे अजिबात नाहीं ..अगदी कोणी रोजनिशी लिहित ना तसे फक्त प्रसंग , एकातून -दुसरा अन तिथून पुढे असं मांडलं आहे सगळ, तरीही अपूर्ण वाटतं काहीतरी ...व.पु अजूनही शोधत आहेत अण्णा ना हेच जाणवत राहत ..
अण्णा हे खूप मोठे कलाकार होतेच पण त्याहीपेक्षा खूप मोठ्या मनाचा माणूस होते , कोणत्याही परीस्थित न - डगमगता त्यांनी आयुष्याचा खडतर प्रवास अगदी हसतमुखाने पूर्ण केला ,एक स्थितप्रज्ञच जणू.
अण्णा हे खूप मोठे कलाकार होतेच पण त्याहीपेक्षा खूप मोठ्या मनाचा माणूस होते , कोणत्याही परीस्थित न - डगमगता त्यांनी आयुष्याचा खडतर प्रवास अगदी हसतमुखाने पूर्ण केला ,एक स्थितप्रज्ञच जणू.
No comments:
Post a Comment