ह्या पुस्तकामध्ये अनिल अवचट ह्यांनी त्यांच्या आयुष्यात घडलेल्या काही ठळक घटनांबद्दल मांडलं आहे , त्यांच्या म्हणण्यानुसार हे आत्मचरित्र नक्कीच नाहि पण ह्या
प्रमुख घटनांमुळे त्यांचं आयुष्य कसं बिघडलं आणि पुन्हा कसं घडलं हे नमूद केलं आहे. त्यांच्या हातून झालेल्या चुका त्यांनी अगदी प्रांजळपणे मांडल्या आहेत .अवचटांनी स्वत:शीच
मारलेल्या गप्पा आपल्याला त्यांच्या आयुष्यात घडलेल्या ४ महत्वाच्या
घटनांची सफर करून आणतात; शाळकरी वय (दहावी), तारुण्याच्या उंबरठ्यावर आयुष्य सर्वार्थाने बदलणारी डॉक्टरकी (डॉक्टरकी ), स्वकीयांपासून दुरावून स्वहिमतीवर मांडलेला संसार (नानापेठ ) आणि
घराला पुर्नार्थ देणा-या दोन चिमण्यांचM संगोपन (संगोपन ) ह्या
दीर्घ -लेखांमधून साधे -सरळ अनिल अवचट आपल्यासमोर उभे राहतात .
खूप वेगळ्या पद्धतीने अवचट ह्यांनी त्यांची ओळख ह्या पुस्तकातून करून दिली आहे , एखाद्या माणसाच्या जडण -घडणीमध्ये आजूबाजूला असणारे सजीव -निर्जीव घटक कसे कारणीभूत असू शकतात आणि त्या गोष्टींचा किती खोलवर
परिणाम आपल्या मनावर होतो ह्याची अनुभूती वाचताना नक्कीच येते .या ब्लॉग वरील लिखाण कॉ्पीराईट प्रोटेक्टेड आहे, कुठेही पब्लिश करण्यापूर्वी लेखिकेची परवानगी घेणे आवश्यक आहे.
No comments:
Post a Comment