अशोक भाटिया यांची रिश्ते ही लघुकथा
वह आम बस थी और सरूप सिंह आम ड्राइवर था। सवारियों ने सोचा था कि भीड़–भाड़ से बाहर आकर बस तेज हो जाएगी, पर ऐसा नहीं हुआ। सरूपसिंह के हाथ आज सख्त ही नहीं, मुलायम भी थे। भारी ही नहीं, हल्के भी थे। उसका दिल आज बहुत पिघल रहा था। वह कभी बस को, कभी सवारियों को और कभी बाहर पेड़ों को देखने लगता, जैसे वहाँ कुछ खास बात हो। कंडक्टर इस राज को जानता था। लेकिन सवारियाँ बस की धीमी गति से परेशान हो उठीं।
‘ड्राइवर साहब, ज़रा तेज चलाओ, आगे भी जाना है।’ एक ने तीखेपन से कहा।
सरूप सिंह ने मिठास घोलते हुए कहा–‘आज तक मेरी बस का एक्सीडेंट नहीं हुआ।’
इस पर सवारियाँ और उत्तेजित हो गई। दो–चार ने आगे–पीछे कहा–‘इसका मतलब यह नहीं कि बीस–बीस पे ढीचम–ढीचम चलाओ।’
कोशिश करके भी सरूप सिंह बस तेज़ नहीं कर पा रहा था। उसने बढ़ते हुए शोर में बस रोक दी। अपना छलकता चेहरा घुमाकर बोला–‘बात यह है कि इस रास्ते से मेरा तीस सालों का रिश्ता है। आज मैं यह आखिरी बार बस चला रहा हूँ। बस के मुकाम पर पहुँचते ही मैं रिटायर हो जाऊँगा, इसलिए......’
वर दिलेली कथा वाचल्यावर मनात एक विचार आला की खरंच एखाद्या बस चालकाला अशी भावना येईल का मनात त्याच्या नोकरीच्या शेवटच्या दिवशी?
मी मुंबई मध्ये असतांना बेस्ट नावाच्या ख-या अर्थाने बेस्ट अशा बस मधून प्रवास केला,त्या बसेस ला खरंच खूप चांगल्या रीतीने ठेवलेलं आहे त्यामुळे बस चालकाला पण कामावर असतांना जास्त त्रास होत नसेल,अर्थातच त्या लोकांचे जे काही प्रश्न असतील ते त्यांना माहित पण एक प्रवासी म्हणून मी ४ वर्ष जे अनुभवलं त्यातून तरी असंच वाटलं की ते बस चालक निदान समाधानी असतील की त्यांना बेस्ट मध्ये काम करायला मिळत आहे,कदाचित त्यापैकी ब-याच लोकांना नोकरीच्या शेवटच्या दिवशी वरील कथेत मांडल्याप्रमाणे वाटू शकतं ...
पण मी पुण्यामध्ये बस चालकांची जी अवस्था बघितली आहे ती प्रत्येक वेळा बघतांना खूप वाईट वाटतं.पुण्यामध्ये बस ची सेवा इतकी का विचित्र आहे कळत नाही,तिची परिस्थिती गेल्या काही वर्षात खालावली आहे की सुरुवातीपासूनच ती तशी होती माहित नाही.ते बस चालक कशी काय बस चालवतात त्या धगधगत्या इंजिन वर बसून , हो ते लोक अगदी शब्दश: इंजिन वरच बसलेले असतात, कधी समोरच्या दारात उभा राहून अनुभव आला असेल तुम्हाला की बाहेरच्या वातावरणापेक्षा सुद्धा त्या बस चालकाच्या आजूबाजूला २ डिग्री तरी तापमान जास्तच असतं. बस ची अवस्था अतिशय दयनीय असते तरी सुद्धा तो बिचारा अगदी कसाबसा तिला एखाद्या पुलावर चढवत असतो किंव्हा उतारावरून आणताना सांभाळत असतो ..बसमध्ये कोंबून भरलेली माणसं ,बाहेर असणारी गर्दी ,बेशिस्त वाहतूक ह्या
सगळ्यामधून त्याला बसमध्ये असलेल्यांचा जीव धोक्यात न-घालता ती बस चालवायची असते , ह्या परिस्थितीमध्ये पावसाळा आणि उन्हाळा हे ऋतू देखील आपापल्या परीने हातभार लावतात ...तर अश्या दिव्यातून रोज जाणा-या त्या बस चालकाला शेवटच्या दिवशी कसं वाटत असेल ? नरकातून सुटल्यासारखं की वरील कथेत नमूद केल्यासारखं ?
या ब्लॉग वरील लिखाण कॉ्पीराईट प्रोटेक्टेड आहे, कुठेही पब्लिश करण्यापूर्वी लेखिकेची परवानगी घेणे आवश्यक आहे.
No comments:
Post a Comment