घाटकोपर ला ट्रेन पकडून पंख्याचा वारा कुठे मिळतोय ह्याचा शोध घेत मी एका सीटवर विराजमान झाले. हाश-हुश करत रिलॅक्स झाले.फोनची बॅटरी जेमतेम राहिलेली म्हणून गाणी ऐकण्यापेक्षा सभोवताली सुरू असणा-या रंग-बेरंगी बोलक्या चित्रपटाचा आनंद लुटायचा ठरवला. नेहमीप्रमाणे लेडीज डब्यामधे दोन-तीन बायका काही-बाही विकत होत्या.बाकी अर्ध्या-अधिक गप्पांमधे गुंग होत्या आणि उरलेल्या फोन हातात घेऊन उभ्या होत्या.
इतक्यात माझ्यासमोर एक बाई आली.तिच्यापाठोपाठ एक छोटा मुलगा पण आला.खिडकीची जागा पकडून ते दोघे बसले.त्यांच्या गप्पा सुरूच होत्या.त्या बाईने बुरका/बुरखा घातलेला होता.अगदी डोक्यापासून ते पायापर्यंत सगळं काळ्या कपड्याने झाकलेलं होतं.जागेवर बसल्यावर त्या बाईने चेह-यावरचा पडदा बाजूला सारला.गोरापान, नितळ चेहरा आणि त्याला खुलवणारं अगदी मनमोकळं हास्य.
मला का-कोण जाणे असं वाटलं की तिच्याशी बोलावं. ब-याच वर्षांपासून मनात असलेला प्रश्न तिला विचारावा.काहितरी सुरूवात करायची म्हणून मी तिला म्हटलं,
मी: आपकी स्कीन बहोत अच्छी है, बहोत सुंदर हो आप :)
अगदी मनापासून गोड हसत माझ्या वाक्याला तिने दाद दिली आणि नम्रपणे वर हात करत म्हटली,
ती: ये तो अल्ला-ताला की देन है.
मग मी हिम्मत करून माझा प्रश्न तिला विचारला,
मी: आप ये बुरका कबसे पेहन रहे हो?
ती: बचपनसे पेहनती हूं,मुझे तो याद भी नही कितने साल हो गये.
मी: लेकीन आपको तकलीफ नही होती? धूप के मौसम में? और मुंबई में तो हमेशा ही अजीब मौसम होता है!
ती: नहीं, ज्यादा कुछ महसूस नहीं होता. अब तो आदत पड गयी है, अगर ना पहनो तो अजीब लगता है!
मी ते वाक्य ऐकून पुढे काही बोलू नाही शकले. ती बाई आणि तिच्यासोबत असणारा मुलगा पुढच्या स्टेशनवर उतरले पण तिचं वाक्य मात्र माझ्या मनात घोळत राहिलं..
आदत हो गयी है! कसं ना..सवय लागली आहे त्यामुळे त्या गोष्टीचा होणारा त्रासही कुठेतरी जाणवत नाहीये तिला..
सवय मग ती कोणतीही असू देत, चांगल्या गोष्टीची,वाईट गोष्टीची..सवय ही वाईटच!
एखादी वस्तू, जागा किंवा आपल्या जवळची एखादी व्यक्ती. किती पटकन सवय होते ना आपल्याला ह्या सगळ्याची. आणि मग आयुष्याच्या एखाद्या वळणावर त्या सगळ्याला सोडून आपल्याला कुठेतरी दूसरीकडे जावं लागतं आणि मग हूरहूर वाटायला लागते..मनामधे एक पोकळी निर्माण होते..खूप काहितरी हरवल्यासारखं वाटतं..पण परत जाऊन ते घेऊन येता येत नाही की तिथे थांबता येत नाही..खूप इन्सिक्युअर फील होतं...
सवय करायची नाही म्हटलं तरी शक्य नाही आणि लागलेली सवय मोडायचं म्हटलं तरी अवघडच...कधी-कधी अशक्यच!
आदत सच में बहोत बुरी बला है :(
प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद :)
ReplyDelete