Monday, July 1, 2013

’नवरा’ एक खोज - पूर्वतयारी भाग १



माझं पोस्ट-ग्रॅज्युएशन झालं, कॅम्पसमधून नोकरी लागली.मुंबईला शिफ्ट झाले, जेमतेम सहाच महिने झाले असतील माझ्या नोकरीला आणि बाबांनी एका दिवशी फोनवर सांगितलं की, आता तुझं शिक्षण, नोकरी सगळं व्यवस्थित झालंय तर आपण लग्नाचं बघू! पहिला विचार माझ्या डोक्यात आला की, ओ गॉड! लग्न!! इतक्या लवकर!! नो वे!!! मी बाबांना म्हटलं, माझी नोकरी पक्की तर होउ देत मग आपण बघू ना..

काही काळानंतर पुन्हा बाबांनी तोच विषय काढला आणि मला क्लिक झालं की, माझी नोकरी पक्की होउन सुध्दा २ महिने झाले होते, खरंच वेळ इतका भुर्रकन का पळाला :-(

ह्यावेळेला आता काय कारण द्यावं ह्याचा विचार करेपर्यंत आई-बाबांनी एक एक गोष्ट सांगायला सुरूवात केली. सगळ्यात आधी वधु-वर सूचक मंडळांची यादी वाचली गेली, कोणतं चांगलं आहे, कोणाकडे सगळ्यात जास्त स्थळं येतात, कोणाकडे जास्तीत जास्त लग्न कमीत कमी वेळात जुळविण्याचं रेकॉर्ड आहे वगैरे वगैरे.. 

मला खरं तर काही समजत नव्हतं काय चाललं आहे ते पण त्या दोघांचं मन नको दुखवायला म्हणून मी, माझ्या दोन्ही मोठया बहिणींसाठी ज्या वधु-वर सूचक मंडळात नाव नोंदवलं होतं तिथेच करूया म्हटलं. दोघेही एकदम खुश झाले आणि पहिली गोष्ट फायनल झाली.  

लगेच पुढचा प्रश्न आला, नाव नोंदणी करायची म्हणजे फोटो हवाच, हे ऎकुन माझ्या पोटात खड्डाच पडला! फोटो काढायचे आणि ते पण ते अगदी टिप्पीकल, बोअरिंग पोज मधले!! श्याss..पण, आईचं सुरूच होतं की, तू मुंबईला काढणार की घरी येउन काढणार? मी थोडा विचार केला आणि म्हणाले, ताईशी बोलून मी ठरवते

पण अजून प्रश्न संपले नव्हते, उलट आता खूप मोठ्ठा प्रश्न सुरू झाला होता आणि तो किती दिवसांनी नाही नाही किती महिन्यांनी, वर्षांनी सुटणार होता देवच जाणे!!  

मला माझ्या दोन्ही बहिणींच्या वेळेस जे काही घडलं होतं ते आठवत होतं, तेंव्हा खरं तर खुप मजा वाटली होती ते सगळं बघायला, पण म्हणतात ना जावे त्याच्या वंशा तेंव्हा कळे! आज जेंव्हा माझ्यावर ती वेळ येउ घातलीये तेंव्हा अगदी अजुन कशात काही नसतांना पण मला भिती वाटत होती, टेन्शन आलं होतं!!

आई-बाबांनी जसा हा विषय सुरू केला तसं माझ्या बहिणींनी सुध्दा ह्याच विषयावर माझ्याशी बोलायला सुरूवात केली, जवळपास रोज घरचे सगळेजण फक्त ह्या एकाच विषयावर बोलायले लागले. मला तर सुरूवातीलाच कंटाळा येत होता पण त्या सगळ्यांमधे एक सळसळता उत्साहच जणू संचारला होता आणि आता माझं लग्न हा एकच ध्यास त्यांनी घेतला होता!!

बाबांनी एका दिवशी ठरवलेल्या वधु-वरसूचक मंडळाचा फॉर्म आणला, जुजबी माहिती त्यांनी भरली आणि एका ठिकाणी ते थांबले, ’जोडीदाराबद्दल अपेक्षा.मला लगेच फोन आला की सांग तुला नवरा कसा हवा!! मला हे ऎकुन एक क्षण कळालच नाही की बाबा काय विचारत आहेत मला?? मी चक्रावून विचारलं तसं बाबांनी तोच प्रश्न पुन्हा विचारला, पण मला कुठे माहित होतं उत्तर?!! मला खरंच माहित नव्हतं की मला कसा नवरा हवाय म्हणून, माझं डोकं बधिर झालं, काहीच सुचेना :(

शेवटी मी बाबांना सांगितलं की मला थोडा वेळ द्या, लेट मी टॉक टू मायसेल्फ अबाउट ऑल धीस!! बाबा हो म्हणाले, ३ महिन्याचा वेळ मिळाला :)

क्रमशः 

12 comments:

  1. good beginning. hope you really talk to yourself and find some answers. let them be flexible, is the only thing i can say. one good parameter is there are certain things which you cannot accept at all and some which you can adjust. cannot accept may typically include smoking/nonveg/drinking, etc.
    all the best and look forward to the answers :-)

    ReplyDelete
  2. agadi barobar ahe tuza mhanana Mrinmayee, thanks for your comment :)

    ReplyDelete
  3. मस्त. वधूसंशोधन या विषयावर वाचले होते. वरसंशोधन या विषयावर लिहिणारी कदाचित तू पहिलीच असशील. छान सुरुवात.

    ReplyDelete
    Replies
    1. हम्म असेल कदाचित ;)प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद पंकज :)

      Delete
  4. पुढे काय झालं? लवकर लिही>

    ReplyDelete
    Replies
    1. सांगतो हो काका थोडा धीर धरा :p

      Delete
  5. कुतूहल म्हणून विचारतो, लग्न का करायचं असा प्रश्न पडला का तुला? की सगळे करतात मग आपणही करायचं असं काही...

    alhadmahabal.wordpress.com

    ReplyDelete
    Replies
    1. अल्हाद तुझ्या प्रश्नाचं उत्तर पुढच्या भागात मिळेल :)

      Delete
  6. gud 1,nice expression

    ReplyDelete
  7. Congooo Priyanka.. Super news.. mavshi kakana pan congo .. :)

    ReplyDelete