पी.एच.डी स्पेशल कांदा-पोहे कार्यक्रमानंतर माझ्या घरातल्या सगळ्या मामी-मावशी,आत्या,आजी-
आजोबा,चुलत-मालत अगदी सगळ्यांना कळालं की आमच्या घरात 'यंदा कर्तव्य आहे'
मग काय घरी भेटायला येणारा जो-तो मला उपदेशाचे डोस आय मीन मार्गदर्शन करू लागला अगदी माझ्या मामाची इयत्ता ९वी मधे शिकणारी मुलगी सुध्दा मला म्हणाली की,'तुला जो मनापासून आवडेल ना त्याच्याशीच लग्न कर.तो तुझ्या आयुष्याचा प्रश्न आहे!' मी तर बघतच बसले तिच्याकडे
काय ना हल्लीची मुलं, सरकारने मान्य केलेल्या वयाच्या आधीच कित्ती सुजाण होतात.मला तर इयत्ता ९वी मधे काही कळतही नव्हतं,असो.
तर असे घरातून, दारातून, शेजा-या-पाजा-यांकडून 'मुलगा कसा शोधावा' इथपासून ते 'सासरी गेल्यावर मुलीने कसं वागावं' इथपर्यंत वेगवेगळ्या पध्दतीने मार्गदर्शन करणं सुरू झालं होतं.
स्थळ शोधणे मोहीम जोरदारपणे सुरू होतीच अशातच एक स्थळ आलं,घरच्यांना ठीक वाटलं म्हणून मला चेक करायला सांगितलं,मी भेटण्यासाठी ग्रीन सिग्नल दिला.
ठरलेल्या दिवशी मी अन बाबा त्यांच्या घरी जायला निघालो.रस्ता माहीत नसल्यामुळे ते लोक अर्ध्या वाटेत आम्हांला न्यायला आले होते.घरी पोहोचेपर्यंत जेवायची वेळ झाली होती म्हणून त्या काकूंनी आम्हांला जेवायलाच वाढलं.जेवण सुध्दा अगदी सणा-सुदीचं गोडाचं केलेलं होतं.जेवणानंतर त्या काकांनी मगई पान हातावर ठेवलं अन ते खाऊन होत नाही की लगेच समोर आईस्क्रीमने भरलेल्या डिशेस!!
मी तर थक्कच झाले ते सगळं आदरातिथ्य बघून!!
जेवतांना सगळ्यांची ओळख झाली होती नंतर मग मी आणि तो मुलगा वेगळं बोलायला म्हणून एका खोलीत गेलो.त्या मुलाने त्याच्या अपेक्षा नीट मांडल्या अन माझं म्हणणं पण अगदी व्यवस्थितपणे ऐकून घेतलं.थोडक्यात महत्त्वाची माहिती एकमेकांना देऊन आम्ही बाहेर येऊन बसलो.ती सगळी मंडळी खुप साधी अन चांगली वाटली.पुन्हा एकदा चहा-पाणी होऊन आम्ही त्यांचा निरोप घेतला,दोन दिवसांनी कळवितो असं त्यांनी सांगितलं अन आम्हांला अर्ध्या वाटेत त्यांच्या कारमधून ड्रॉप केलं उन्हाची वेळ होती म्हणून!
मी तर विचारातच पडले, इतकी साधी-सरळ माणसं पण असू शकतात मुलाकडची मंडळी? ग्रेट यारss
ह्या विचारांसरशी सुखद गारव्याची लहर स्पर्शून गेल्याचा भास त्या टळटळत्या उन्हातही मला झाला
दोन दिवसांनी त्यांनी फोन करून 'योग नाही' असा निरोप दिला, माशी कुठे शिंकली होती कोणास ठाऊक!!
आलेला पहिलाच 'नकार' पचवायला थोडं जड गेलं मला
स्वतःशी विचार सुरू झाला,कुठे अन काय बरं चुकलं असेल? आपण बोललो त्यात तर काही चुकलं नाही ना? काय माहित काय कारण आहे ते.विचारावं का त्या मुलाला तसं?नाही नको,बाबा रागावतील अन असं विचारणं योग्य आहे का?
काही कळत नव्हतं म्हणून मी ताईला फोन केला अन माझ्या डोक्यातले सगळे विचार तिच्यासमोर मांडले.तिला एकूण परिस्थितीची कल्पना होतीच ती लगेच म्हणाली की,'त्या मुलाने तुला नकार का दिला ह्याचं खरं कारण तर आपल्याला कळू शकणार नाही पण हे मात्र नक्की की तुझ्यामधे काही कमी आहे म्हणूनच त्याने असं केलं हे मात्र समजू नकोस.प्रत्येक व्यक्ती ही आपापल्या परीने पूर्णच असते पण म्हणून कोणत्याही दोन व्यक्ती एकमेकांसाठी योग्य असतील असं जरूरी नाहीये.त्यामुळे तू उगाच मूड ऑफ करून घेऊ नकोस आपण तुझ्यासाठी पुन्हा एखादा चांगला मुलगा शोधू,डोन्ट वरी '
ते ऐकून माझ्या डोक्यावरचं टेन्शन एकदम पळूनच गेलं

पुढे काय झालं? लिही लव्कर
ReplyDeleteकाका मी शक्यतो एका आठवड्याच्या गॅपने पुढचा भाग प्रकाशित करत आहे तेंव्हा थोडंसं थांबा प्लीज :)
Delete