व्वाह! भारीच आहेत हे 'पोश्टर बॉईज'!!
होर्डिंगवर दिसणा-यांना आणि हे होर्डिंग/फ्लेक्स बनविणा-यांना १५ ऑगस्ट काय आहे आणि तो का साजरा(?) करायचा हे माहित तरी असेल काहो? आपण मारे त्यांच्यावर ताशेरे ओढतोय हा फोटो लाईक आणि शेयर करून पण त्यांना म्...हणा किंवा सिग्नल ला झेंडे विकणा-यांना म्हणा खरंच १५ ऑगस्ट किंवा २६ जानेवारीचं महत्त्व माहित आहे का? आपल्या देशामधे प्रत्येकच गोष्टीचा इव्हेंट होतोय हल्ली, तसा हा पण एक, अशीच ह्यांची समजूत असणार खात्री आहे माझी!!
सध्या व्हॉट्स अप ह्या मेसेजींग अॅपवर सुध्दा देशभक्तीचा पुळका येऊन प्रत्येकाने ग्रुपचे किंवा स्वतःचे फोटो म्हणून तिरंगा झेंड्याचा फोटो टाकला आहे आणि दुस-याने तसं करावं असं आव्हानही करत आहेत.पण मला सांगा, स्वातंत्र्यदिन हा काय 'व्हॅलेंटाईन डे' किंवा 'मदर्स डे' आहे का फक्त एक दिवस साजरा करायला आणि देशासाठी प्राण दिलेल्यांची आठवण काढून गाणे वाजवायला?? अरे आपल्या देशाचा अभिमान प्रत्येक क्षणी आपल्या वागण्या-बोलण्यातून झळकला पाहिजे!!
ते पण ठीक आहे मी म्हणेन एकवेळ पण, आपण भारतीय लोक परदेशी लोकांचं विशेषतः अमेरिकेतील लोकांचं जमेल तितकं अनुकरण करतो मग, त्यांना असलेला देशाचा अभिमान आपल्याला दिसत का नाही? ते लोक काहीही झालं तरी त्यांच्या देशाच्या झेंड्याचा अपमान होऊ देत नाहीत आणि करणा-याला जबर शिक्षा करतात आणि आपल्या देशात? आता १५ ऑगस्ट च्या एक आठवडा आधी भरभरून झेंड्यांची विक्री होईल आणि स्वातंत्र्यदिन संपला की तो एक कागदाचा कपटा होऊन रस्त्यांवर इतस्ततः पसरेल. मग त्यावर पाय देऊन आपणच चालत जाऊ आणि गाड्या नेऊन त्याची 'शान' मातीत मिसळवू!! ही आपली देशभक्ती आहे!! क्या बात है!! इसलिए मेरा देश महान है!!! जय भारतमाता! स्वातंत्र्यदिन चिरायू होवो.
ह्या देशाला स्वातंत्र्य देण्यासाठी ज्यांनी आपले प्राण वेचले त्यांना असंच मातीत गाडून त्यावर आपल्या निर्लज्जपणाचे मनोरे उभारू!!!

No comments:
Post a Comment