काल माझ्या सोसायटी मधे राहणारी दोन शाळकरी मुलं आली होती. त्यांच्या शाळेमधे रेनवाॅटर हार्वेस्टिंग चा प्रोजेक्ट करणार आहेत त्याकरता त्यांना पैसे गोळा करायला सांगितलं आहे. ती मुलं कुपन्स घेऊन आली होती आणि जेंव्हा लकी-ड्राॅ होईल तेंव्हा तुम्हाला कदाचित बक्षिस लागू शकतं. मी ते कुपन्स घेतले आणि मला माझ्या लहानपणीच्या काही गोष्टी आठवल्या :) :) :)
आमच्या शाळेमधे आम्हांला असंच एक काम दिलं जायचं.प्रत्येकाला एक कागद देऊन सांगितलं जायचं की एक आठवडाभर तुम्ही शेजारी-पाजारी राहणा-या काका,काकूंना मदत करायची आणि कामाच्या स्वरूपानुसार त्यासाठी १रू.,२रू किंवा ५रू. घ्यायचे.
इयत्ता ४ किंवा ५वी मधे असतांना बहुतेक हे केलं असावं मी. आजकालच्या शाळांमधे असे उपक्रम होतात की नाही मला माहित नाही.
पैसे मिळावे ह्याकरता दुस-यांना मदत करावी ह्याहीपेक्षा दुस-यांना मदत करण्यात खूप छान वाटतं ही भावना त्या वयात रूजली गेली.:) :)
असाच एक अजून महत्त्वपूर्ण संस्कार शाळेने आमच्यावर केला - आर.डी.
इयत्ता ५वी पासून ते १०वी पर्यंत दर महिन्याला एक ठराविक रक्कम पोस्टात ठेवायची.आमच्या शाळेमधेच एक बाई हे काम करायच्या.खूप साधी गोष्ट होती ही, पण प्रत्येकाने बचत केलीच पाहिजे हा संस्कार तेंव्हा मनावर बिंबवला गेला :) :) :)
अशा छोट्या-छोट्या गोष्टीतून शाळकरी वयात जे काही शिकवलं गेलं ते आज फार महत्त्वाचं ठरतंय.:) :) :)
No comments:
Post a Comment