ब-याच दिवसांनी शनिवारची सकाळ अनुभवायला मिळाली. टेकडीवर जाऊन बसले पण सूर्योबाचं आगमन झालं नव्हतं. रोजच्या मानाने आज जरा उशीर होतोय असं वाटलं.आकाशात ढग दिसत होते अजूनही पण थंडीच्या मोसमाची बोचरी हवा नव्हती.सगळं वातावरण अगदी शांत, स्तब्ध..भवतालचा निसर्ग एका मंद लयीत श्वास घेत होता.
पाच-एक मिनिटात पूर्वेकडेची करडी छटा जरा उजळल्यासारखी झाली आणि दाट ढगांच्या दुलयीआडून एक छोटुसा किरण बाहेर आला :) :) मग पांघरून थोडंसं बाजूला करून गुलाबी-लालसर गोळा वरती डोकावला..पण आज दुलईतून बाहेर येण्याची इच्छा दिसत नव्हती सूर्योबांची मग काय परत ढगाआड लपून बसले :D :D पण दुस-याच क्षणी जणू जादू झाली आणि ढगांचं आवरण पूर्णतः बाजूला होऊन लख्ख प्रकाश सर्वत्र पसरला..बहुतेक सूर्योबाच्या आईने फॅन बंद केला होता ;) :D :D
No comments:
Post a Comment