लाल डब्याने प्रवास करणं जितकं त्रासदायक तितकचं एन्टरटेनींग पण असू शकतं ह्याचा अनुभव आज ब-याच दिवसांनी घेत आहे.
बसमधे गर्दी आहे, बरेचसे लोक उभ्याने प्रवास करत आहेत.माझ्यासमोर च्या सीटवर बसलेले एक म्हातारे बाबा एकदम रंगात आले आहेत.कदाचित रोजची त्यांची ही 'घेउन' बडबड करायची वेळ असावी पण आज प्रवास करत असल्यामुळे ते बाबा बहुतेक फक्त बडबडीवरच भागवत आहेत.त्यांच्या बायकोने एव्हाना २-३ वेळेस अगदी 'हळूवार'पणे सौम्य शब्दात त्यांना दम दिला आहे पण अजून तरी म्हणावा तसा परिणाम दिसत नाही.:D
मागच्या रांगेमधे कोणीतरी बाई फोनवर कुठल्यातरी अगम्य भाषेमधे पण खरपूस टोनमधे समोरच्याचा समाचार घेत आहे. जवळपास १५मिनीटे ती बाई सतत बोलत आहे :D :D :D
कोणी कोणी फोनवर जोरजोरात बोलत आहेत तर कोणाचं पोर रडगाणं आळवतंय :D :D
आणि उरली सुरली जनता कानामधे हेडफोन कोंबून ह्या सगळ्या आनंदाला मुकत आहे,असो.
खिडकीच्या बाहेर निळसर-काळी रात्र सगळ्या सृष्टीला आपल्या कवेत घेत थंडीची पखरण करत पुढे सरकत आहे..
आणि चंद्रकोर..काळ्याभोर आकाशात नाजुकशी चंद्रकोर उगवलेली आहे..रस्त्यावरच्या डोळे दिपवणा-या प्रखर प्रकाशापुढे फारच विलोभनीय,नाजूक आणि सुंदर दिसत आहे :) :)
No comments:
Post a Comment