वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर काही व्यक्ती आयुष्यात भेटल्या आणि एक विशेष नातं त्या प्रत्येकासोबत होतं माझं..हम्म होतं असं म्हणायची वेळ परिस्थितीने आणली माझ्यावर :( पण जेंव्हा ती नाती वर्तमान काळात होती तेंव्हा असं वाटायचं की मला समोरच्या व्यक्तीच्या मनातलं सगळं सगळं अगदी चपखल कळतं आणि कित्येकदा त्या व्यक्तीने तशी ग्वाही पण दिली. मग मला पण असं वाटायचं की त्या व्यक्तीला पण माझ्या मनातलं जसंच्या तसं कळत असेल.पण एखादा प्रसंग असा समोर यायचा की ती व्यक्ती माझ्याबाबतीत काय विचार करते ह्याचा प्रत्यय यायचा आणि चर्र व्हायचं मनात :|
पण जसजशी मोठी होत गेले तसं कळायला लागलं की समोरच्याचं सगळं लख्ख समजतं हा खुप मोठ्ठा गोड गैरसमज आपण बाळगत होतो असं काही नसतं!! फक्त एकच व्यक्ती तुम्हाला अगदी आतुन-बाहेरून स्वच्छपणे ओळखू शकते, जिला काहीही सांगायची गरज नसते आणि कोणत्याही अनपेक्षित उत्तराने ती व्यक्ती तुम्हांला दुखवू शकत नाही!!!
स्वतःचं मन, स्वत्वाचा आवाज हाच तुम्हांला आंतर्बाह्य ओळखतो. बाकी जे असं म्हणतात ना की मी मनकवडी आहे आणि तुझ्या मनातलं सगळं मला कळतं - सब साफ झूठ होता है!!!!
पण गोम अशी आहे की स्वतःचं मन जे बोलतं ते पटत नाही आणि अनपेक्षितपणे दुखावलं गेल्यावर त्याला कसं सावरावं हे आपल्याला कळत नाही :(
No comments:
Post a Comment