रहायला नविन घर मिळाल्याचा आनंद झाला होता पण, जेंव्हा शिफ्टिंगची वेळ आली तेंव्हा मात्र डोळ्यासमोर तारे चमकले! सगळा प्रकार एकूणच चमत्कारिक होता. तर झालं असं की,
आम्ही ठरवलं होतं, ३१ मार्च ला रविवार आहे तर, त्या दिवशी सामान घेऊन जावं पण घरमालक म्हटला की १ तारखेच्या आधी मी तुम्हांला किल्ली देणार नाही, आम्ही मान्य केलं. मग १ तारखेपर्यंत सामानाची बांधाबांध केली आणि सगळी तयारी करून आता संध्याकाळी सामान शिफ्ट करायचं ह्या विचाराने घरी आलो तर नविन गोष्ट समोर आली. ज्या सोसायटीमधे आम्ही घर घेतलं होतं तिथे पोलिस व्हेरीफिकेशन आणि लीझ अॅग्रीमेंट दिल्याशिवाय सामान काय साधी पायरी सुध्दा चढण्याची परवानगी नव्हती. इथून सुरू झाला सगळा ड्रामा!
असा काही प्रकार आहे हे कळाल्यावर आम्ही लगेच एजंटकडे धाव घेतली तर तो म्हणतो,'हां मैडम, वो सोसायटी में ये सब देनाही पडेगा, उसके सिवा परमिशन नहीं मिलेगा!' आम्ही म्हटलं,'पण आम्ही आता संध्याकाळी हे सगळं आणायचं कुठून?' तर म्हणतो,'आज नहीं शिफ्ट करनें का फिर, कल सुबह बैंक खुलेगा तो सब करा लो और शामको शिफ्ट हो जाओ!'. आम्हांला तो पर्याय ठिक वाटला.
पण, दोन प्रश्न समोर उभे ठाकले. एक म्हणजे पोलिस व्हेरीफिकेशन, अॅग्रीमेंट हे सगळं करून आणेल कोण? आणि दूसरं म्हणजे राहत्या घराच्या मालकाने आम्हांला अजुन एक दिवस तिथे राहू द्यायला हवं होतं. मग आम्ही पहिला प्रश्न सोडवायचा ठरवलं आणि त्या एजंटलाच गळ घातली की, तू सगळे कागदपत्र तयार करून आण दूस-या दिवशी, आम्ही घरमालकाशी बोलतो. तो तयार झाला. इकडे आम्ही घरमालकाला रिक्वेस्ट केली आणि एक दिवस वाढवून घेतला.
दूस-या दिवशी दूपारी एजंटने फोन करून कळवलं की पोलिस व्हेरीफिकेशन तर झालं पण घराचं अॅग्रीमेंट आज नाही होऊ शकत कारण, रजिस्ट्रेशन ऑफिसमधे जाऊन नंबर लावावा लागेल. आम्ही परत बुचकळ्यात पडलो. त्यालाच विचारलं, मग काय करायचं रे बाबा? तर तो म्हटला की, तुम्ही नविन घरमालकाशी बोला, त्याला रिक्वेस्ट करा आणि सोसायटीमधून परमिशन घ्यायला सांगा.
मग लगेच आम्ही कामाला लागलो. नविन घरमालकाला फोन केला आणि सगळी परिस्थिती समजावून सांगितली. तो तयार झाला. बिल्डिंगच्या सेक्रेटरीशी बोलून झाल्यावर त्याने आम्हांला कळवलं की, तुम्ही सामान तर घेऊन जाऊ शकता पण त्या सेक्रेटरीला ८ वाजता भेटा आणि कागदपत्र दाखवा.
निदान आज सामान नविन घरामधे नेऊन टाकता येईल ह्या गोष्टीने आमचा जीव भांड्यात पडला. सर्वजणी संध्याकाळी ऑफिसचं काम भरभर आवरून घरी पोहोचलो. एजंटला भेटलो आणि आधी किल्ली ताब्यात घेतली. मग त्याला विचारलं की सामान हलवायला कोणी माणसं मिळतील का? त्याने एक फोन फिरवला आणि दोन जणांना समोर उभं केलं.
आम्ही त्या माणसांना कल्पना दिली एकूण किती सामान हलवायचं आहे ते. त्यांनी लगेच २०००रू. सांगितले. आम्ही ते ऐकून अवाक झालो. सामान जरी जास्त असलं तरीसुध्दा लिफ्टने खाली आणून व्हरांड्यातून फक्त दूस-या बिल्डिंगच्या लिफ्टने वर चढवायचं होतं. ह्या कामाकरता आम्हांला २०००रू. मोजावे लागतील?? मग एजंटने मध्यस्थी केली आणि कसं-बसं १५००रू वर त्यांना पटवलं.
इतक्यात मला नविन बिल्डींगच्या सेक्रेटरीचा फोन आला भेटायला या म्हणून. आम्ही सगळ्याजणी लगेच तिथे गेलो. ओळख वगैरे करून घेतली, त्याला कागदपत्र दाखवले. त्याने काही जुजबी नियम सांगितले आणि आम्हांला सामान शिफ्ट करायची परवानगी दिली.
त्याला भेटून सामान शिफ्ट करायला माणसांना २५व्या मजल्यावर घेऊन जाणार तर आमच्या राहत्या सोसायटीमधील सिक्युरिटीने आम्हांला थांबवलं, म्हटला,'तुम्ही आत्ता सामान नाही आणू शकत सर्व्हीस लिफ्टने'. आम्ही विचारलं,'का नाही?'
सिक्युरिटी: सामान शिफ्ट करायची वेळ सकाळी १० ते दुपारी ४.३० आहे फक्त.
आम्ही: पण असा तर नियम कुठे लिहीला नाहीये तुम्ही, मग ही वेळ कधी ठरली.
सिक्युरिटी: नियम लिहीला नाही, पण मी सांगतो आहे ना!
आम्ही: पण कारण काय ते तरी सांगा.
सिक्युरिटी: कारण आता सगळेजण येतात घरी तर तिन्ही लिफ्ट आम्हाला मोकळ्या ठेवाव्या लागतात. जर तुम्ही सामान आणायला सुरूवात केली तर, सर्व्हीस लिफ्ट अडकून राहणार आणि मग सगळे आम्हांला ओरडतील.
आम्ही: पण मग आम्ही सामान कधी आणायचं खाली?
सिक्युरिटी: एकदा सांगितलेलं कळत नाही का, सकाळी १० ते दुपारी ४.३० च्या मधे बास!
आम्हांला काही कळेना आता काय करावं ते. जर आज सामान हलवलं नाही तर मग उद्या सुट्टी घेऊन ते करावं लागणार म्हणजे उद्याचा पूर्ण दिवस वाया जाणार :( बरं सुट्टी कोण घेऊ शकतं ह्यावर विचार करावा तर लगेच सगळ्यांना आपापल्या महत्त्वाच्या कामांची यादी आठवली!
मग मी विचार केला की ह्या बिल्डींगच्या सेक्रेटरीशी बोलावं. मी सिक्युरिटीला त्यांचा नंबर मागितला, तसा तो खेकसलाच माझ्या अंगावर, 'ते सध्या मुंबईमधे नाहीत, त्यांच्याशी नाही बोलता येणार'. मी म्हटलं,'बरं मग चेअरमनचा नंबर दे'. त्याने कसाबसा सांगितला.
मी फोन केला तर एका बाईने उचलला. मी त्यांना माझी ओळख करून दिली आणि म्हटलं आमचा असा प्रॉब्लेम झाला आहे तर आम्ही लिफ्ट वापरू शकतो का.
तर लगेच त्या बाईंनी ओरडायला सुरूवात केली,'अभी सिक्युरिटी आया था मेरे पास, उसने तुम्हे बोला फिर भी तुम लोगों को समझ में नही आता क्या? अगर ऐसे लिफ्ट बंद कर दिया तो सब लोग मुझे ईमेल पे कंप्लेंट करेंगे. Rule is rule, I can't change it for any1 like you!' मला ते ऐकून असा राग आला ना, मी फोन आपटला आणि त्या सिक्युरिटीवरच धावून गेले. शहाणा कशाला चुगली करायला गेला होता काय माहित!
इतक्यात काय झालं की माझ्या रूममेट ने मला दोन माणसं सामान आत घेऊन जातांना दाखवले. ते लोक सर्व्हिस लिफ्ट वापरत होते. मग परत आम्ही सिक्युरिटीला घेरलं आणि केला सवाल, हे कसं काय अलाऊड १० वाजेच्या आधी?? तर तो सरळ उत्तरला, ते ओनर आहेत फ्लॅटचे त्यांना अलाऊड आहे!
आई ग! माझ्या रागाचा पारा इतका चढला की त्या माणसाच्या तोंडात माराविशी वाटली मला! खरं तर चूक आमचीच होती ह्या जागी रहायलाच नाही पाहिजे होतं. एक तर घरमालक तिरसट भेटला होता आणि आता हे चेअरमन आणि बाकी दुनिया त्रास देत होती. अर्थात त्यांचं ऐकण्याशिवाय आमच्यापुढे पर्याय नव्हता. :(
हा सगळा तमाशा, ती काम करणारी माणसं तिथेच उभं राहून बघत होती. आम्ही त्यांना विचारायला जाणार तर तेच म्हटले, की मॅडम तुम्ही आम्हांला फोन करा आम्ही पोहोचतो १० वाजता. त्यांचं शब्द ऐकून इतकं बरं वाटलं. नाहीतर हे करोडोच्या फ्लॅटमधे राहणारे मनाने दगड झालेले माणसं! आम्ही काय रोज त्यांची लिफ्ट वापरणार होतो का, पण नाही आम्ही पडलो भाडेकरी ना. आमचा घरमालक पैसे कमावतो आणि बाकीच्यांना त्याचा काही मोबदला नाही मिळत मग ते कशाला आम्हांला मदत करतील!
गॉड! भणभणत्या डोक्याने आणि भुकेल्या पोटने आम्ही घरामधे आलो. पटकन जेवणं आटोपली आणि सगळं सामान घराबाहेर काढायला सुरूवात केली.
जसे १० वाजले तसं लिफ्टने सामान खाली पाठवायला सुरूवात केली. ती माणसं सुध्दा आम्हांला मदत करायला वेळेवर पोहोचली.
एक तासभर झाला असेल आणि नविन बिल्डिंगच्या सेक्रेटरीने मला फोन केला.
नविन बिल्डींग सेक्रेटरी : क्या चल रहा है आपका ये सब?
मी : क्या हुआ सर? हम लोग तो समान शिफ्ट कर रहे हैं.
नविन बिल्डींग सेक्रेटरी : ये वक्त है क्या शिफ्टींग का? तुम लोग मुझसे मिले ८ बजे तब समान शिफ्टींग की बात हुयी थी. फिर अब तक
क्यों नही हुआ??
मी : अरे सर नेपच्युन वाले हमें १० बजेसे पेहले लिफ्ट यूझ नहीं करने दे रहे थे, तो हम कब समान लाते २५वे माले से :(
नविन बिल्डींग सेक्रेटरी : लेकीन हमारे यहां पे १० बजे के बाद अलाऊड नहीं है शिफ्टींग!!
मी : मला काय बोलावं तेच सुचेना. शेवटी मी ओरडलेच,वाह सर, एक बिल्डींग हमे १० बजे से पेहले लिफ्ट यूझ नहीं
करने देती, आपकी बिल्डींग १० बजे के बाद शिफ्टींग नहीं करने देती. तो हम लोग करे तो क्या करे?? कोई भी हमारी प्रॉब्लेम नहीं
समझ सकता क्या??
नविन बिल्डींग सेक्रेटरी : ठीके, लेकीन अब बहोत देर हो गयी है, मुझे लिफ्ट बंद करनी पडेगी. तुम लोग स्टेअर्स यूझ करो.
मी : लेकीन हमांरा हेवी समान अभी ले जाना बाकी है. वो लोग नहीं ले जा पायेंगे!
नविन बिल्डींग सेक्रेटरी : मुझे वो नहीं पता, तुम्हे करना है तो स्टेअर्ससे समान ले जाओ. नहीं तो बाहर रखो. और हां आवाज बिल्कुल भी नहीं होनी चाहिए. अगर किसीको डिस्टर्ब हुआ और मेरे पास कंप्लेंट आयी, तो मुझे इमिडीअटली आपका यहां पे रहना रोकना होगा.
मी : क्या?? क्या बोल रहें है आप??
नविन बिल्डींग सेक्रेटरी : हां. हमारे यहां पे भी कुछ रूल्स हैं. अगर आपने दूसरोंको तकलीफ दी, आपका केस कमीटी के सामने पूट अप करना पडेगा और फिर आपको यहां रेहनेकी परमिशन देनी है या नहीं ये डिसाईड होगा! दॅट्झ इट.
मी : काही बोलायच्या आतच खट् ..फोन बंद झाला होता!
मी धावतच खाली गेले. सगळ्यांना गोळा केलं आणि नुकतंच झालेलं संभाषण ऐकवलं. आम्हा पोरींमधली ताकद आता संपली होती, जवळपास रडकुंडीला आलो होतो आम्ही.पण, परत सामान हलवणा-या त्या माणसांनी आम्हांला धीर दिला की, काही का़ळजी करू नका इथला गार्ड आमच्या ओळखीचा आहे तो वापरू देईल आपल्याला लिफ्ट. तुम्ही फक्त आवाज करून नका.
असं करत मग आम्ही शेवटी रात्री १२.३० ला सगळं सामान एकदाचं नव्या घरात नेऊन ठेवलं!! त्या माणसांना पैसे दिले आणि खुप मोठ्ठं थॅंक्स बोलून बाय केलं.
माझं डोकं बधीर झालं होतं घडलेल्या सगळ्या ड्रामामुळे!
किती कोत्या मनाची असतात काही माणसं. जे साध्या कामगार लोकांना कळत होतें ते करोडोच्या घरांमधे राहणा-या आणि लाखोचे पगार असणा-या लोकांना कळू नये?? श्शी! काय तर म्हणे रूल्स! मान्य आहे मला की नियम हे गरजेचे असतात पण त्यांत कधी एक्ससेप्शन होऊ नाही का शकत?? माणूसकी दाखवू नाही शकत हे लोक थोडीसुध्दा!!
अचानक ओरडण्याचा आवाज आला तशी मी माझ्या विचारांमधून जागी झाले, माझ्या रूममेट्स सेलीब्रेट करत होत्या नविन घरात शिफ्ट झाल्याबद्दल :) मग मीही त्यांत मिसळून गेले
Yeh hai mumbai meri jaan..............
ReplyDeletehmm ala lakshat ;-), thanks Santosh Malavade :-)
ReplyDelete