पर्वती उतरतांना लोक कसले भन्नाट प्रकार करतात!
जिथे मला साधं चालत उतरता येत नव्हतं रेलिंग ला धरल्याशिवाय तिथे लोक उलट चालत येत होते!! आणि असं करणारे लोक वयस्क किंवा ४०+च असावेत, मानलं ब्वा!!
आज आम्हा आय.टी. वाल्यांचा सुट्टीचा वार तेंव्हा विचार केला जरा पर्वतीवर चक्कर मारायला जावं. सकाळी छान वारा सुटला होता, काही ढग दिसत होते पण पाऊस येणार नाही हे नक्की कळत होतं त्यामुळे छत्री न-घेताच गेले. सुरूवातीला ४पाय-या चढले नसेन तर पायात गोळे यायला लागले :( मग सगळ्यात आधी तर आॅफिसमधे बैठं काम आहे त्याचा उद्धार करुन झाला, मग ४ महिने केलेलं जिम पाण्यात गेलं हा विचार येऊन मन जरा खट्टू झालं. रोज संध्याकाळी कँटीन मधे खाल्लं जाणार जंक फुड आठवून थोडी लाज वाटली पण मी नेटाने पुढे जात राहिले. ह्या सगळ्या विचारांमधे अर्ध-अधिक अंतर पार झालं होतं. मग एक ग्रुप दिसला, कदाचित एखाद्या शासकीय परिक्षेसाठी फिजिकल फिटनेस वाढवायची तयारी करत असावेत असं वाटलं. त्यांचा ट्रेनर त्यांना पर्वतीच्या पाय-यांवर हं, पर्वतीच्या पाय-यांवर धावायला लावत होता!! इथे मला चढतांना धड चालता येत नव्हतं ते लोक तर धावत होते आणि एका मागोमाग चालू होतं त्यांचं!! ते बघून मग मला पण थोडा हुरुप आला आणि मी १-२ करत चांगलं ३ वेळेस वर-खाली केलं :) :) खाली येतांना धावत पण कसाबसा तोल सांभाळत येत होते दोनेक मिनिटात पण वर चढायचा वेळ मात्र प्रत्येक खेपेला वाढत होता :| पण ठीके पहिल्यांदाच असा काहीतरी प्रयोग मी केला होता. तीन प्रदक्षिणा घातल्यावर इतकं मस्त वाटलं ना आणि मुख्य म्हणजे पाय दुखत आहेत असं अज्जिबात जाणवत नाही :) :) मस्त कार्डिओ वर्क-आऊट झालं आज,शाब्बाश रे पठ्ठे :):)

No comments:
Post a Comment